संत तुकाराम
संत तुकाराम
तुका तोचि हा परब्रह्मा ठेवा
तुका भासला मानवी वेषधारी।परि हा लिला विग्रहीनिविर्कारी।।स्वयें श्रीहरी व्यापकु सर्व जीवा।तुका तोचि हा परब्रह्मा ठेवा।।
संतश्रेष्ठांचे सांसारिक व आध्यात्मिक जीवन सामान्य माणसाला मार्गदर्शक व सन्मार्गाकडे घेऊन जाणाऱ्या दीपस्तंभासारखे असते. ज्यांचे जीवन सर्वांगीण अनुभवांनी समृद्ध होते, अशा जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या चरित्राचा अल्पसा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपा प्रसादाने आपण करू या.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज भागवत संप्रदायाच्या मंदिराचा कळस झाले, त्या कळसाच्या उंचीपर्यंत जाणे आम्हाला अनेक जन्म घेतले, तरी अशक्य आहे. तरीपण या जन्मी त्या तेजोमय कळसाचे दुरून जरी दर्शन घेता आले, तरी 'घेतलिया जन्माचे सार्थक झाले' असे आपण मानू.
ज्ञानेश्वरीमध्ये भगवान म्हणतात,
तेणेंसी आम्हां मैत्र। एथ कायसें विचित्र।परि तयाचें चरित्र। ऐकती जे ।। 12/226तेही प्राणा परौते। आवडती हें निरुते।जे भक्त चरित्रातें। प्रशंसिती।। 12/227पै प्रेमळाची वार्ता। जे अनुवादती पांडुसुता।ते मानूं परमदेवता। आपुली आम्ही।। 12/228
असे भक्त आमचे परममित्र आहेत, यात आश्चर्य ते काय? परंतु त्यांचे चरित्र जे ऐकतात, जे त्यांच्या चरित्राची प्रशंसा करतात, तेही मला प्राणापलीकडे आवडतात आणि माझ्या प्रेमळ भक्तांच्या कथा जे गातात, ती तर आमची परमदेवता असेच आम्ही समजतो.
जगद्गुरू तुकोबाराय हे विठुरायाचे प्रेमळ भक्त व जगदोद्धार करणारे महान सत्पुरुष होते. सर्व अवतारांचे ते कळस असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ज्ञान, भक्ती व वैराग्य परिपूर्णतेने पाहावयास मिळते. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, 'जे जे झाले अवतार। तुका त्याचे बरोबर।' महाराजांच्या अवतारपरंपरेचा मागोवा घेत असताना, आपल्याला अंबऋषीपर्यंत मागे जावे लागते.
अंबऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामया व त्यानंतर तुकोबारायांच्या रूपाने अवतारांचा कळसच झाला. अंबऋषी राजा हा मोठा भगवद्भक्त होता. तो एकादशी व्रत करून जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरिता श्ाीहरिची उपासना अत्यंत निष्ठेने करत असे. त्याची सप्रेमळ भक्ती पाहून श्ाीहरिला असे वाटले की, हा मुक्तीच्या मागे लागला आहे, हे अयोग्य आहे. त्याने अनेक जन्म घेऊन भक्तीप्रेमामध्ये रंगून जावे व मलाही रंगवावे. याचा परिणाम म्हणून की काय, दुर्वास ऋषींना त्याचे एकादशी व्रत भंग करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते एकादशीच्या दिवशी राजाला मुद्दाम भेटायला आले.
त्यांनी द्वादशीला पहाटे राजाला उठून सांगितले की, 'मी नदीवर जाऊन स्नान करून येतो, पारणे सोडण्यासाठी माझी वाट पहा.' दुर्वास ऋषींना राजाचा व्रतभंग करायचा असल्याने सूयोर्दय झाला तरी ते मुद्दाम आले नाहीत. सूयोर्दयाच्या समयास राजाने आपल्या नेमाप्रमाणे तुलसीचे तीर्थ घेऊन पारणे सोडले व ते दुर्वास ऋषींची वाट पाहू लागले. दुर्वास ऋषी आल्यावर त्यांना राजाने पारणे सोडल्याचे कळले. आपला अपमान झाला म्हणून दुर्वास ऋषींनी क्रोधाने राजाला दहा गर्भवास सोसावे लागतील, असा शाप दिला.
हे व्रत जन्म-मरण चुकवण्यासाठी केले; पण हा दहा गर्भवासांचा शाप ऐकून राजा अत्यंत व्यथित झाला. त्यावेळी श्ाीविष्णू तेथे प्रगट झाले व त्यांनी अंबऋषीला आश्वासन दिले की, तुझ्याबरोबर मीही अवतार घेईन, तू काळजी करू नकोस. अंबऋषींच्या अवतारामध्ये जन्म-मरण चुकवण्यासाठी त्यांनी साधना केली आणि तुकोबारायांच्या अवतारामध्ये ते स्वत:च म्हणतात, 'घेईन मी जन्म याजसाठी देवा। तुझी चरणसेवा साधावया।' दुसऱ्या अभंगामधून आपली निर्भयता प्रगट करताना ते सांगतात, 'जन्म-मरणाची विसरलो चिंता। तूं माझ्या अनंता मायबापा।'
अंबऋषीच्या अवतारानंतर प्रल्हादाचा अवतार झाला. या अवतारामध्ये सर्व ठिकाणी नारायण भरून आहे, ही निश्चिंती होती. शरीर आणि आत्मसत्ता यांच्यातील भेद नाहीसा झाला होता. त्याची अवस्था 'हरि येथे रे हरि तेथे रे। हरिवांचूनी न दिसे रिते रे।' अशी झाली होती. स्वाभाविकच प्रल्हादाच्या मुखातून सतत 'नारायण' नामाचा उद्घोष होत असे. सर्व ठिकाणी हरि दिसत असल्यामुळे त्याला पंचमहाभूतांपासून त्रास झाला नाही. अग्नी त्याला जाळू शकला नाही.
डोंगरावरून टाकूनही त्याला लागले नाही. नारायणाचा ध्यास बघून हिरण्यकश्यपू त्याला म्हणाला, 'तुझा देव कोठे आहे ते दाखव. या खांबात तो आहे का?' असे त्याने विचारल्यावर प्रल्हादाने आत्मान-भवावरील निर्धारामुळे निश्चयाने 'हो' असे सांगितले. हे ऐकताच खांबातून गुरगुर असा आवाज येऊ लागला व त्या खांबातूनच नरसिंह भगवान प्रगट झाले.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
नको सांडू अन्न नको सेवू वन। चिंती नारायण सर्वभोगीं।। नको गुंफो भोगीं नको पडों त्यागीं। लावुनि सरें अंगीं देवाचिया।। असे म्हणून आता ' नको पुसो वेळोवेळा ' या परता उपदेश मला करायचा नाही , असे ते निक्षून सांगतात. विश्वाला कल्याणकारक अशी तुकाराम महाराजांची उपदेशवाणी राजाच्या हृदयापर्यंत जाऊन भिडली. त्यांना खऱ्या संतबोधाची जाणीव झाली. तुकोबारायांचा मनोदय त्यांच्या लक्षात आला , त्यांची राज्यकारभारापासून विन्मुख झालेली वृत्ती त्याकडे सन्मुख झाली. त्यांची मूळची क्षात्रवृत्ती जागी झाली , आणि नव्या दमाने कर्तव्याला सामोरे जायला ते उद्युक्त झाले. हा इष्ट बदल पाहून जिजामातेला खूप आनंद झाला आणि त्यांनी कृतज्ञतेने तुकोबारायांना वंदन केले. मग शिवाजी राजयाची आई । तुकोबाच्या लागतसें पायीं।। म्हणे तुमचे उतराई व्हावे कायी। तो पदार्थ काहीं दिसेना।। महिपती तुकोबारायांनी शिवाजी महाराजांच्या पत्ररूप भेटीतून किंवा प्रत्यक्ष भेटीतून जो उपदेश केला त्यातून तुकोबारायांची थोरवी लक्षात येते. एक सच्चा वारकरी , एक सद्गुरू एक संतश्ाेष्ठ म्हणून त्यांचा महिमा थोर आहेच पण या उपदेशाच्या निमित्ताने ध्यानी येते की , गुरू-शिष्य संबंधाबद्दलची त्यांची जाणीवकळा अतिशय तेज:पुंज आणि उदात्त आहे. यामागे ' विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ। ' अशी तुकोबारायांची भक्कम तात्त्विक बैठक आहे. त्यांच्या जीवन यात्रेत पावलोपावली त्यांच्या आचार-उच्चारातून या तत्त्वज्ञानाचे उन्मेष प्रकट होत राहिलेले आहेत. अर्थात त्यांच्या निखळ-निर्मळ विचारधारेची गंगोत्री म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचे प्रेमबोधाचे तत्त्वज्ञान. माऊलींनी भूतमात्रांत भगवंत पाहिला , विश्व हे आपले घर मानले. भंगवंताच्या ठिकाणी उच्च नीच भाव नाही हे त्यांचे आधारसूत्र. म्हणूनच ' कुल जाती वर्ण ते आघवेचि गा अप्रमाण ' असा बंडखोर पुकारा त्यांनी केला. ' उत्तमापासून अंत्यजावरी मुक्तीची सेल मागावी रे ' असे त्यांचे आश्वासन आहे. पुढे एकनाथ महाराजांनीही ' ज्ञानाचा एका ' या एकनिष्ठेने हाच मार्ग चोखाळला , तो कृतीत , उक्तीत उतरवला , समदृष्टीचा डांगोरा पिटवला. उच्च नीच भावांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात ते म्हणतात , ' सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान । एक पूज्य एक हीन । विकू जाता मोल समान । निंद्य वंद्य आत्मत्वीं तैसे। ' नामदेव महाराजही आपल्या अभंगामधून ऐक्यतेची प्रतितीच प्रगट करतात. ते म्हणतात , " विश्वीं विश्वंभर कोंदलासे एक । भेदाचे कवतुक कैसे सांगा। " पुढे तुकोबारायांनीही याच दृष्टीकोणाचा अंगिकार केला , गुरु-शिष्य संबंधाबद्दल शिवरायांना उपदेश करताना याच अधिष्ठानावरून तुकोबाराय बोलतात. तसे पाहिले तर शास्त्रअधिष्ठित परंपरेमध्ये उच्चवणिर्यांनी नीचवणिर्यांना नमस्कार करायचा नाही असा दण्डक आहे. पण वारकरी परंपरेत ' पंढरीच्या लोकां नाहीं अभिमान ' अशी धारणा असल्यामुळे ' पाया पडे जन एकमेंका ' असे दृश्य आहे. ' पाया पडावे हे माझंे भांडवल ' अशी विनीत विश्वस्पशीर् समदृष्टी हा स्थायीभाव असल्यामुळे , जो उच्चनीचभाव विरहित तोच श्ाेष्ठ संत अशी त्यांची श्ाद्धा आहे. तशीच त्यांची शिकवण आहे. म्हणूनच ' वर्णाभिमान विसरली याती। एक एका लोटांगणी जाती रे। ' अशी भक्तीच्या अध्यात्माच्या क्षेत्रातली लोकशाही प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न वारकरी संतपरंपरेने केला. तुकोबारायांचेही या स्वरूपाचे प्रयत्न अत्यंत गौरवास्पद आहेत. याती शूद असे स्वत:बद्दल सांगणाऱ्या तुकोबारायांच्या अनुयायांमध्ये कित्येक उच्चवणीर्य आहेत , हा त्यांच्या या प्रयत्नाच्या स्तंभावर फडकत राहिलेला यशोध्वज आहे.
तुका तोचि हा परब्रह्मा ठेवा
तुका भासला मानवी वेषधारी।परि हा लिला विग्रहीनिविर्कारी।।स्वयें श्रीहरी व्यापकु सर्व जीवा।तुका तोचि हा परब्रह्मा ठेवा।।
संतश्रेष्ठांचे सांसारिक व आध्यात्मिक जीवन सामान्य माणसाला मार्गदर्शक व सन्मार्गाकडे घेऊन जाणाऱ्या दीपस्तंभासारखे असते. ज्यांचे जीवन सर्वांगीण अनुभवांनी समृद्ध होते, अशा जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या चरित्राचा अल्पसा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपा प्रसादाने आपण करू या.
जगद्गुरू श्री तुकाराम महाराज भागवत संप्रदायाच्या मंदिराचा कळस झाले, त्या कळसाच्या उंचीपर्यंत जाणे आम्हाला अनेक जन्म घेतले, तरी अशक्य आहे. तरीपण या जन्मी त्या तेजोमय कळसाचे दुरून जरी दर्शन घेता आले, तरी 'घेतलिया जन्माचे सार्थक झाले' असे आपण मानू.
ज्ञानेश्वरीमध्ये भगवान म्हणतात,
तेणेंसी आम्हां मैत्र। एथ कायसें विचित्र।परि तयाचें चरित्र। ऐकती जे ।। 12/226तेही प्राणा परौते। आवडती हें निरुते।जे भक्त चरित्रातें। प्रशंसिती।। 12/227पै प्रेमळाची वार्ता। जे अनुवादती पांडुसुता।ते मानूं परमदेवता। आपुली आम्ही।। 12/228
असे भक्त आमचे परममित्र आहेत, यात आश्चर्य ते काय? परंतु त्यांचे चरित्र जे ऐकतात, जे त्यांच्या चरित्राची प्रशंसा करतात, तेही मला प्राणापलीकडे आवडतात आणि माझ्या प्रेमळ भक्तांच्या कथा जे गातात, ती तर आमची परमदेवता असेच आम्ही समजतो.
जगद्गुरू तुकोबाराय हे विठुरायाचे प्रेमळ भक्त व जगदोद्धार करणारे महान सत्पुरुष होते. सर्व अवतारांचे ते कळस असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी ज्ञान, भक्ती व वैराग्य परिपूर्णतेने पाहावयास मिळते. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, 'जे जे झाले अवतार। तुका त्याचे बरोबर।' महाराजांच्या अवतारपरंपरेचा मागोवा घेत असताना, आपल्याला अंबऋषीपर्यंत मागे जावे लागते.
अंबऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामया व त्यानंतर तुकोबारायांच्या रूपाने अवतारांचा कळसच झाला. अंबऋषी राजा हा मोठा भगवद्भक्त होता. तो एकादशी व्रत करून जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरिता श्ाीहरिची उपासना अत्यंत निष्ठेने करत असे. त्याची सप्रेमळ भक्ती पाहून श्ाीहरिला असे वाटले की, हा मुक्तीच्या मागे लागला आहे, हे अयोग्य आहे. त्याने अनेक जन्म घेऊन भक्तीप्रेमामध्ये रंगून जावे व मलाही रंगवावे. याचा परिणाम म्हणून की काय, दुर्वास ऋषींना त्याचे एकादशी व्रत भंग करण्याची इच्छा निर्माण झाली आणि ते एकादशीच्या दिवशी राजाला मुद्दाम भेटायला आले.
त्यांनी द्वादशीला पहाटे राजाला उठून सांगितले की, 'मी नदीवर जाऊन स्नान करून येतो, पारणे सोडण्यासाठी माझी वाट पहा.' दुर्वास ऋषींना राजाचा व्रतभंग करायचा असल्याने सूयोर्दय झाला तरी ते मुद्दाम आले नाहीत. सूयोर्दयाच्या समयास राजाने आपल्या नेमाप्रमाणे तुलसीचे तीर्थ घेऊन पारणे सोडले व ते दुर्वास ऋषींची वाट पाहू लागले. दुर्वास ऋषी आल्यावर त्यांना राजाने पारणे सोडल्याचे कळले. आपला अपमान झाला म्हणून दुर्वास ऋषींनी क्रोधाने राजाला दहा गर्भवास सोसावे लागतील, असा शाप दिला.
हे व्रत जन्म-मरण चुकवण्यासाठी केले; पण हा दहा गर्भवासांचा शाप ऐकून राजा अत्यंत व्यथित झाला. त्यावेळी श्ाीविष्णू तेथे प्रगट झाले व त्यांनी अंबऋषीला आश्वासन दिले की, तुझ्याबरोबर मीही अवतार घेईन, तू काळजी करू नकोस. अंबऋषींच्या अवतारामध्ये जन्म-मरण चुकवण्यासाठी त्यांनी साधना केली आणि तुकोबारायांच्या अवतारामध्ये ते स्वत:च म्हणतात, 'घेईन मी जन्म याजसाठी देवा। तुझी चरणसेवा साधावया।' दुसऱ्या अभंगामधून आपली निर्भयता प्रगट करताना ते सांगतात, 'जन्म-मरणाची विसरलो चिंता। तूं माझ्या अनंता मायबापा।'
अंबऋषीच्या अवतारानंतर प्रल्हादाचा अवतार झाला. या अवतारामध्ये सर्व ठिकाणी नारायण भरून आहे, ही निश्चिंती होती. शरीर आणि आत्मसत्ता यांच्यातील भेद नाहीसा झाला होता. त्याची अवस्था 'हरि येथे रे हरि तेथे रे। हरिवांचूनी न दिसे रिते रे।' अशी झाली होती. स्वाभाविकच प्रल्हादाच्या मुखातून सतत 'नारायण' नामाचा उद्घोष होत असे. सर्व ठिकाणी हरि दिसत असल्यामुळे त्याला पंचमहाभूतांपासून त्रास झाला नाही. अग्नी त्याला जाळू शकला नाही.
डोंगरावरून टाकूनही त्याला लागले नाही. नारायणाचा ध्यास बघून हिरण्यकश्यपू त्याला म्हणाला, 'तुझा देव कोठे आहे ते दाखव. या खांबात तो आहे का?' असे त्याने विचारल्यावर प्रल्हादाने आत्मान-भवावरील निर्धारामुळे निश्चयाने 'हो' असे सांगितले. हे ऐकताच खांबातून गुरगुर असा आवाज येऊ लागला व त्या खांबातूनच नरसिंह भगवान प्रगट झाले.
महाराज हा जन्मला मृत्यूलोकी
तुकाराम महाराजांचे वडील बोल्होबा यांनी श्री पांडुरंगाला तुकोबारायाच्या बारशाचे निमंत्रण दिले. बारशाचे आमंत्रण मिळाल्यावर पांडुरंगाने मुद्दाम आईसाहेबांना बारशाला पाठवले. आईसाहेब सर्व बाळंतविडा घेऊन बारशाला आल्या. आईसाहेबांच्या केवळ आगमनाने सर्व परिसर ऐश्वर्यसंपन्न झाला.
भक्तराजच्या बारशाकरीता दारामध्ये ऋद्धी-सिद्धी हात जोडून उभ्या राहिल्या. जगन्माताही आपल्या सर्व ऐश्वर्यासहित भक्तरायाचे नाव ठेवण्याकरीता तेथे आल्या. रुक्मिणीमातेला बघून सर्व महिला मंडळी चकित झाली. कोण आले आहे हेच कळेना, पण प्रत्यक्ष विचारण्याचे धाडसही होईना.
सर्व नात्यागोत्यातील बायका बाजूला सारून कनकाईने बाळाला रुक्मिणी आईसाहेबांकडे दिले आणि त्यांना नाव ठेवण्याचा आग्रह केला. बालभक्ताला पाहून आईसाहेबांना खूप आनंद झाला. त्यांनी भक्तरायाला हृदयाशी धरून बाळाच्या गालावर गाल ठेवला. बाळाला पाळण्यात घातले व बाळाचे नाव 'तुकाराम' ठेवले. महिपती या सोहळ्याचे वर्णन करताना म्हणतात.
जेथे आली रुक्मिनीबाळा।तेथे सर्वासिद्धी अनुकूळा।।सुवासिनी मेळवूनि सकळा।घातले बाळा पालखांत।।।सुंदर स्त्रीचे रूप धरूनी ।हळदीकुंकुमें लेववीत रुक्मिणी ।।मग बाळकासी तये क्षणीं । जो जो म्हणोनि हालवीत।।
ज्या प्रेम प्रतितीमध्ये राम तुकला गेला त्याचे नाव 'तुकाराम.' बारसे आटोपल्यावर आईसाहेब राऊळामध्ये परत आल्या व पांडुरंगाजवळ तुकोबारायाचे गुणगान गाऊ लागल्या. जेव्हा भक्तीप्रेमाच्या त्या मूतिर्मंत पुतळ्याला भगवंतांनी पाहिले तेव्हा त्यांचे डोळे पाणावले.
देवाची व या तान्ह्या भक्ताची भेट अलौकिक आनंद देणारी होती. चौदाव्या दिवशी पंढरीनाथ जोश्याचे रूप घेऊन भेटावयास आले. घरातील महिला मंडळींना त्यांनी विचारले, 'आपल्या घरात मुलगा झाला की, मुलगी झाली हे आम्हाला सांगावे, म्हणजे आम्ही त्याची जन्मराशी व पुढील ज्योतिष सांगू.' देवाचे शब्द ऐकून पाळण्यातले बाळ हसू लागले.
ऐकोनियां शब्द हांसे बाजेवरी ।विस्मय करिती नारी घरातील।शिरी ठेवी हस्त चिरंजीव होसी।देहासुद्धां जासी वैकुंठासी।तुका म्हणे दिली बाळपणी भेटी।आता कां जगजेठी उपेक्षिता।तु. त. 14
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा जन्म शके 1530 सन 1608 माघ शु. पंचमीचे दिवशी झाला. तो कोणत्या जातीमध्ये कोणत्या कुळामध्ये, कोणत्या समाजामध्ये झाला, याबाबत काही ठिकाणी वाद निर्माण झाल्याचे दिसून येते. संत हे कोणत्याही एका जातीचे किंवा कुळाचे नसतात. ते या सर्वांच्या पलीकडे गेलेले असतात, म्हणून सर्व जाती जमाती त्यांच्याठिकाणी ऐक्यतेने व प्रेमभावाने नांदू शकतात. म्हणूनच तुकोबारायांच्या शिष्यसमुदायामध्ये ब्राह्माणांपासून अतिशूदापर्यंत सर्वांचाच समावेश झालेला दिसून येतो. ते आपल्या एका अभंगामधून प्रश्न विचारतात.
वर्णाभिमानें कोण झाले पावन।ऐसें द्या सांगून मजपाशी।अंत्यजादि योनी तरल्या हरिभजनें।तयांची पुराणे भाट झाली।।यातायातीमर्ध नाहीं विष्णुदासा ।निर्णय हा ऐसा वेदशास्त्री।।तुका म्हणे तुम्हीं विचारावे ग्रंथ।तारिले पतित नेणों किती ।।
संसाराचे अंगी
श्री तुकाराम महाराजांनी वयाच्या 13 व्या वषीर्च संसाराचा सर्व भार उचलला. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नी रखुमाई हिला दम्याचा आजार असल्यामुळे पुण्याचे आप्पाजी गुळवे या श्रीमंत सावकारांची कन्या जिजाऊ यांच्याबरोबर तुकोबारायांच्या वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले आणि तुकोबारायांचा संसार सुखाने सुरू झाला. तुकोबारायांचा उत्तम चाललेला संसार पाहून माता-पित्यांना आनंद झाला, पण लवकरच दोघेही वैकुंठवासी झाले. माता-पित्यांच्या चिरवियोगामुळे सर्वांनाच अतिशय दु:ख झाले. त्यात काही काळातच सावजींची पत्नीही वारल्यामुळे आणि सावजींची वृत्ती मुळातच उदासीन असल्यामुळे ते तीर्थाटनाला निघून गेले. वयाच्या 17 व्या वषीर्च आई-वडिलांचे छत्र गेल्याकारणाने, सर्व संसाराची जबाबदारी तुकोबारायांवर येऊन पडली. संसाराची जबाबदारी पेलत असताना सर्वांच्याच जीवनामध्ये अडीअडचणी येतात.
तुकोबारायांच्या जीवनामध्येही ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला. संसाराची चक्रे उलट फिरू लागली. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरचे पाणी आटते, तसे संसाराच्या तापामुळे होते ते धन संपून गेले. दैनंदिन खर्च चालूच होता, पण व्यापार मात्र नीट चालत नव्हता. मेहनत घेऊन तुकोबाराय धंदा करू लागले, पण कोठे यश दिसेना. कर्ज काढून प्रपंच करण्याचा प्रयत्न केला, तोही असफल झाला. तुकाराम महाराज म्हणतात, 'संसारतापें तापलो मी देवा। करिता या सेवा कुटुंबाची।' या अनुभवामुळे त्यांनी पूवीर्पेक्षाही अत्यंत अट्टहासाने प्रभूचे भजन सुरू केले. धंदा-उद्योग करत असतानाही महाराजांच्या मुखामध्ये सतत हरीचे नाम होते. तुकाराम महाराजांच्या संसाराला उतरती कळा लागल्यानंतर अनेकांनी त्यांना उपदेश करण्याची संधी सोडली नाही.
तुकाराम महाराजांना त्यांनी भजनाचा नाद सोडून देण्याचा सल्ला दिला. तसे न कराल, तर अजूनही ऋणात अडकाल, असे सांगितले. आजूबाजूच्या लोकांचे ऐकून घरातल्या स्त्रियाही तसेच बोलू लागल्या. संसारात जसजसे नुकसान होऊ लागले, तसतशी परमार्थाची ओढ वाढत गेली. या अनुरोधानेच तुकाराम महाराज म्हणतात,
बरे जालीयाचे अवघे सांगाती।वाईटाचे अंती कोणी नाही।नोहे मातापिता नोहे कांतासुत।इतरांची मात काय सांगो।घरातील वाद टाळण्यासाठी तुकाराम महाराज चार बैल घेऊन त्यावर माल टाकून व्यापाराला निघाले. पण असे घडले की, त्यातील तीन बैल रस्त्यातच मेले. तुकाराम महाराजांना वाटले की, देव आपण भजन करतो का टाकतो, याची कसोटी पाहत आहे. जेव्हा संसारात उलट बाजू येते, तेव्हा आजूबाजूची माणसे या सर्वांचे खापर त्या संसारिकाच्या परमार्थावर फोडायला तयारच असतात. त्यांच्या विचारांची बैठक व श्रद्धा परिपक्व नसेल, तर त्यालाही वाटते की, आपण देवाचे इतके केले, मग देवाने आपले असे का केले? जीवनातील परिस्थिती जेव्हा उलट फिरते, तेव्हाच परमार्थाची खरी गरज भासते. प्रतिकूल परिस्थितीमध्येही देवाचे भजन न सुटणे हीच त्याची खरी कृपा. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्येही तुकाराम महाराजांचे भजन रात्रंदिन चालू असे व त्यातच त्यांच्या चित्ताला समाधान वाटत असे.
रात्रंदिवस चाललेल्या या भजनाला कंटाळून त्यांचे सोबती मात्र त्यांना सोडून गेले. अशाच एका रात्रीच्या समयी अरण्यात कोणीच नव्हते आणि तशातच बैलावरची गोण खाली पडली. आकाशामध्ये मेघ दाटून आले. धुळीमुळे आजूबाजूचे काही दिसेना. विजेचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडू लागला. तुकोबारायांना वाटले, आता या वेळेला आपल्याबरोबर कोण आहे? सर्व सोडून गेले. घरातील सर्व माणसे आपल्याला कंटाळली. ज्यांच्या सोबतीने व्यापाराला निघालो, तेही टाकून केले. माता, पिता, बंधू सर्व सोडून गेले हे जाणूनच ते पांडुरंगाला म्हणाले,तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत।तूंचि माझे हित करिता देवा।तूंचि माझा देव तूंचि माझा जीव।तूचि माझा भाव पांडुरंग।तुका म्हणे तुज विकला जीव भाव।तूंचि उपाव करी आता।
तुकोबारायांची हाक ऐकून एका वाटसरूचे रूप घेऊन पांडुरंग तेथे प्रगट झाले.
ऐसा सप्रेम धावा ऐकोनि कानीं।पांथस्थाचे रूप धरूनी।तत्काळ पावले चक्रपाणी।तुकया लागीं पुसताती।
महिपती आणि तुकोबारायांना ती गोण बैलाच्या पाठीवर ठेवण्याकरिता त्यांनी मदत केली. त्या गडद अंध:कारामध्ये पुढची वाटही दिसत नव्हती. श्रीहरी पुढे व तुकोबाराय मागे असे करत करत ते इंदायणीच्या काठावर आले व श्रीहरीने आपल्या सार्मथ्याने त्यांना पैलतीराला नेऊन सोडले. पैलतीराला गेल्यावर तुकोबारायांना कळून आले की, पांडुरंगच त्यांना मदत करण्याकरिता धावून आले होते. त्या वाटसरूच्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडले. या घटनेला चमत्कार म्हणण्यापेक्षा तुकोबारायांनी आपल्या आराध्य देवतेला जी कळवळून हाक मारली, त्या भक्तीसाठी पांडुरंग प्रगट झाले.
श्री तुकोबारायांना मिरच्यांचा व्यापार करून परत येत असताना वाटेत एक ठग भेटला. त्याने पितळेच्या कडीला सोन्याचा मुलामा देऊन तुकाराम महाराजांना फसवले व जी मिरच्यांची वसुली होती , ती सोन्याच्या बदल्यात घेतली. बाकीचे पैसे सावकाश दिले , तरी चालतील असे सांगितले. गावातील सावकार मंडळी तुकोबारायांची वाटच बघत होती. त्यांनी सावकाराचे हातात
ती सोन्याची कडी दिली व स्वत:चे पैसे काढून घेऊन बाकीचे घरात देण्यास सांगितले. पण ती कडी सोन्याची नसून पितळेची आहे हे कळताच , सर्वांनी कपाळावर हात मारून घेतले. तुकोबारायांबरोबर आपणही बुडालो , हे जाणवताच ते अतिशय संतप्त झाले. तुकोबारांच्या पत्नी जिजाई या सुद्धा त्यांना वेडेवाकडे बोलू लागल्या.
शेवटी जिजाई वैतागून सावकाराकडे गेल्या व त्यांनी त्यांच्याकडे आपल्या नावावर कर्ज मागितले. जिजाईची माहेरची श्रीमंती असल्याकारणाने सावकाराला तिला नाही म्हणता येईना व त्याने दोनशे चांदीचे रुपये जिजाईला दिले. जिजाईने ते पैसे तुकोबारायांना आणून दिले. तुकोबारायांनी त्या पैशाने मीठाचा व्यापार करण्याचे ठरवले. तुकोबारायांनी मिठाचा व्यापार उत्तम करून त्याचा गूळ खरेदी केला. बरोबरची जी व्यापारी मंडळी होती त्यांना तुकोबारायांचे श्रेष्ठत्व कधीच कळले नाही. काचेच्या खड्यांमध्ये जसा हिरा पडावा किंवा धूलीकणांमध्ये मोती हरवून जावा तसेच खोटा-नाटा व्यापार करणाऱ्या मंडळींच्या संगतीत तुकोबाराय सापडले गेले. सबंध दिवस धंदा व्यापार केल्यावर महाराज रात्रभर भजन करत असत. महाराजांना कुणाशीही व्यर्थ बडबड करायला आवडत नव्हते. त्यांनी मुखाने कोणाचीही निंदा केली नाही व कानाने कोणाचीही निंदा ऐकली नाही. सामान्य संसारी जीवाला एकमेकांची निंदानालस्ती करण्यात , ऐकण्यातच आनंद असतो. हीच गोष्ट तुकोबारायांना अत्यंत अप्रिय होती. म्हणूनच ते आपल्या अभंगात म्हणतात , ' कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सवेर्श्वर पूजनाचे। ' असा व्यापार करत , पुढच्या गावात आपला सर्व गूळ विकून तुकोबाराया गावी परत येण्यासाठी निघाले. येताना एक अद्भुत घटना घडली. लाकडाचा नांगर गळ्यात घातलेला , दाढी-मिश्या वाढवलेला एक ब्राह्माण बाजारामध्ये दव्य मागत असलेला त्यांना दिसला. सर्वजण त्याची हेटाळणी करत होते. त्याला पाहताच तुकोबारायांच्या मनात करुणा उत्पन्न झाली व त्याच्या या अवस्थेचे कारण विचारले.
ब्राह्माण त्यांना सांगू लागला , " आमचे पाटीलकीचे वतन होते , ते भाऊबंदांनी दिवाणाला लाच देऊन लुबाडले व मला बंदिखान्यात घातले. आमच्या गावच्या अविवेकी राजाने माझ्यावर तीनशे रुपये कर बसवला. त्यातले पन्नास रुपये मी दिले. उरलेल्या अडीचशे रुपयांकरिता मी भीक मागत आहे. माझ्याबरोबर राजाने एक शिपाई ठेवला आहे. " ही करुण कहाणी ऐकून कारुण्यमूर्ती तुकोबारायांनी एका क्षणाचाही विचार न करता आपल्याजवळचे दोनशे पन्नास रुपये त्या ब्राह्माणाला काढून दिले.
तो ब्राह्माण बारा वषेर् भीक मागत होता. आपले धन सत्कारणी लागले असे वाटून , तुकोबारायांना खूप आनंद झाला. पण मनामध्ये असे आले की , आता घरी जाऊन आवलीला काय बरे सांगावे ? तुकोबारायांच्या अंतर्यामी वसलेल्या पांडुरंगाने हे सर्व जाणले. पांडुरंगाने तुकोबारायाचे रूप घेतले व सावकाराचे सर्व ऋण फेडून टाकले. वर पाच होन त्या सावकाराजवळ दिले व ते आवलीला नेऊन देण्यासाठी सांगितले. अशा तऱ्हेने भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या भक्ताची लाज राखली. तुकोबारायांनी आपले पैसे दान केल्याचे कळल्यानंतर कुणीही सावकार त्यांना मदत करण्यास तयार होईना. त्यातच भर म्हणून मोठा दुष्काळ पडला. पाऊस नसल्याने गुरांना चारा मिळेना , घरात होते ते सर्व धान्य संपले. शेवटी घरातील भांडीकुंडी विकली. त्या पैशांचे जे धान्य आले त्याच्या पेजेवर घरातील माणसे दिवस काढू लागली. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नी रखुमाई यांनी अन्न अन्न करून प्राण सोडला. तुकोबाराया आपल्या एका अभंगात म्हणतात , ' दुष्काळें आटिले दव्यें नेला मान। स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली ' दहा जन्मात कोणी दु:ख अनुभवणार नाही ते तुकोबारायांनी एका जन्मातच अनुभवले. तुकोबारायांच्या येथपर्यंतच्या आयुष्याचा आढावा पाहता , महिपती महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे तेराव्या वषीर् वडिलांच्या आज्ञेने त्यांनी व्यापारास सुरुवात केली व तो उत्तम तऱ्हेने सांभाळला. सतराव्या वर्षी आई-वडिल व वडिल बंधूंची पत्नी गेली. ज्येष्ठ बंधू सावजी तीर्थाटनाला निघून गेले.
विसाव्या वर्षी तुकोबारायांची पत्नी आणि पुत्र दुष्काळामध्ये गेली. संसार येशस्वी करण्याकरिता जी जी खटपट करावी त्याचे रूपांतर जेव्हा अपयशात होऊ लागले , तेव्हा तुकोबारायांनी जाणतेपणानेच श्रीहरिची इच्छा म्हणून संसारातून अंग काढून घेतले. या काळानंतर तुकोबारायांची परमार्थाची ओढ अधिकच वाढली व त्यांनी आपले सर्व आयुष्य हरिभजनामध्ये घालवण्याचा निर्धार केला.
भक्ती आम्ही केली सांडुनि उद्वेग
जीवनामध्ये जे-जे घडले ते ईश्वरी इच्छेने घडले, या निश्चयाने तुकोबाराय जीवनाकडे पाहत असल्याने ओघानेच ते संसारातून बाहेर पडले व त्यांनी प्रभूच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून दिले. 'आपुलें जें साचें तें कल्पांतीही न वेचें। हे जाणोनिया गताचें न शोची जो.' तुकोबारायांनी संसार टाकला, या शब्दांचा अर्थ प्रपंचाची जी वाढ होती, ती थांबवली. पण इतर सर्व परिस्थितीला तोंड देऊनही अन्न-वस्त्रापुरते धन त्यांच्या घरामध्ये होतेच. एका अभंगात ते म्हणतात,सहज सरलें होतें कांहीं। दव्य थोडे बहु तेंही। त्याग केलें नाहीं। दिलें द्विजा याचकां।। संसारी जीवनापासून अलिप्त झाल्यामुळे कुणाला भेटण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून महाराज एकांतवासामध्ये जाऊन श्रीहरीचे चिंतन करू लागले. त्यांनी मनात विचार केला की, आता आपले किती आयुष्य राहिले आहे, जे आयुष्य शिल्लक आहे, ते हरिचिंतनात घालवावे. म्हणून तुकाराममहाराज भामनाथ पर्वतावर गेले. श्री पांडुरंगाची मूतीर् मनामध्ये आणून त्याची उपासना सुरू केली. पांडुरंगालाच गुरूस्थानी मानून आराधना सुरू केली.माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरू। पढियें देहभाव पुरवीं वासना। अंतीं तें आपणापाशीं न्यावें।। पारमाथिर्क साधना करत असताना, जे जे प्रश्न निर्माण व्हावेत ते पांडुरंगालाच विचारू लागले. "हे प्रभू, तुझी पूजा कशी करू? तुझे ध्यान कसे करू? इंदियाला बंधन कसे घालू? माझे चित्त एकाग्र कसे होईल? तुझे प्रेमा माझ्या अंत:करणात कसा प्रगट होईल? हे देवादि देवा, तूच मला वाट दाखव." अशी त्या प्रभूची प्रार्थना करू लागले. त्यांनीच लिहिलेल्या अभंगाप्रमाणे त्यांच्या मनाची अवस्था झाली होतीे.एक वेळ करीं या दु:खावेगळें। दुरितांचे जाळे उगवुनि।। आठविन पाय हा माझा नवस। रात्री आणी दिवस पांडुरंगा।। बहु दूरवरि भोगविलें भोगा। आतां पांडुरंगा सोडवावें।। तुका म्हणे काया करीन कुरवंडी। ओंवाळुनि सांडीं मस्तक हें।। अशा अवस्थेतच रात्रंदिवस प्रभूच्या भावसमाधीमध्ये ते रंगून गेले. काया, वाचा आणि मन एकरूप झाल्याकारणाने 'देहींच विदेही भोगू दशा' अशी त्यांची अवस्था झाली. त्या वेळी सर्प, विंचू त्यांना त्रास देऊ लागले. 'सर्प विंचू व्याघ्र अंगासी झोंबले। पीडू जे लागले सकाळीक।' अशी नामसाधना पंधरा दिवस केल्यानंतर त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. 'पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला। विठोबा भेटला निराकार।'
महिपतींनी आपल्या चरित्रामध्ये असे वर्णन केले आहे की, अतिविशाल काळ्या सर्पाचे रूप घेऊन रुक्मिणीरमण तुकोबारायांभोवती फिरू लागला. आपला विशाल फणा उभारून तो सर्प फुत्कार टाकू लागला. पण तुकाराम महाराज ध्यानस्थ बसले होते. तेवढ्यात अचानक आकाशवाणी झाली व सर्परूपाने आलेले रुक्मिणीकांत म्हणाले, 'हे प्रेमळ भक्ता घाबरू नकोस. आता डोळे उघडून मला बघ.' तेव्हा तुकोबाराय म्हणाले, 'अनेक रूपांत दिसण्यापेक्षा तू मला पांडुरंगरूपात दर्शन दे.' त्यावेळी तुकोबारायाला 'सगुण निर्गुण जयाचिये अंगें। तोचि आम्हासंगे क्रीडा करी।' हाच बोध झाला.तुकोबाराय घरातून बाहेर पडल्यावर त्यांचे बंधू कान्होबा त्यांना शोधत भामनाथगिरी पर्वतावर आले. तिथे त्यांनी देव आणि भक्त एकरूप झाल्याचे पाहिले. पांडुरंगाच्या साक्षात्कारानंतर तुकोबाराय व कान्होबा देहूगावी परत आले. महाराजांनी संसार टाकला नाही, तर संसारच त्यांना सोडून गेला. त्यांच्या पूर्वायुष्याकडे बघितले, तर असे दिसून येईल की, वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी उत्तम प्रपंच केला.'जोडोनिया धन उत्तम व्यवहारें। उदास विचारे वेची करा।'
या अभंगामध्येच त्यांनी प्रपंच व परमार्थाची सांगड घातली आहे. उत्तम व्यवहार करून धन जोडावे व उदास विचाराने धन खर्च करावे, असे त्यांनी सांगितले. तुकोबारायांना संसार कसा करावा, हे जसे माहीत होते, तसे त्या संसारापासून अलिप्त कसे राहावे, हेही ज्ञात होते.मंदिराच्या बाहेर बसून तुकोबारायांनी कान्होबांना घरातील कर्जरोखे घेऊन यायला सांगितले. तुकोबारायांनी असा विचार केला की, दुष्काळाने अनेक घरांतील अन्नधान्य आटले आहे, अनेक घरातील माणसेही गेली. सर्वांचीच दुर्दशा झाली असताना कोणाकडे किती पैसे मागावेत व तो तरी किती पैसे परत देणार? उगीचच व्यर्थ आशेवर का जगावे? जीवनामध्ये मनुष्य व्यर्थ आशेमुळेच दु:खी होतो. म्हणून महाराजांनी सर्व खते इंदायणीच्या डोहात बुडवायचे ठरवले. कान्होबा म्हणाले, 'तुम्ही संसार सोडून विरक्त झालात, पण मला असे करून कसे चालेल? कान्होबांची खते बुडविण्याची अनिच्छा पाहून तुकोबाराय म्हणाले, 'तुझी तू अधीर् खते घे, मी माझी अधीर् खते बुडवून टाकतो. मला जे आहे त्यात समाधान आहे.' त्यानंतर तुकोबारायांनी प्रभूचे भजन-कीर्तन हेच जीवनाचे अंतिम ध्येय ठरवले.
संसारातून अलिप्त झाल्यानंतर तुकोबाराया एकांतामध्ये जाऊन हरीचे चिंतन करू लागले. रोज सकाळी इंदायणीचे स्नान करावे, पांडुरंगाची पूजा करावी आणि देहूजवळ चार-पाच मैलांवर असलेल्या भंडारा डोंगरावर जाऊन प्रभूचे भजन करावे, असा तुकोबारायांचा दिनक्रम सुरू झाला. 'दिनरजनी हाचि धंदा। गोविंदासी आळवू।' असे त्यांचे जीवन सुरू झाले. तुकोबारायांनी आपल्या अभंगात लिहिल्याप्रमाणे श्री पांडुरंगापायी आपले जीवन वाहिले.
माझें मज आतां न देखे निरसता म्हणवूनि आधार केला।।संसाराची आस सांडूनि लौकिक जीवभाव तुज दिला।।नव्हती माझी कोणी मी कवणाचा अर्थ मोहो सांडवला।।तारीं मारीं करीं भलतें दातारा होऊन तुझा आतां ठेलों रे।।असो माझें कोडें तुज हें सांकडे मी असेन निवाडें सुखरूप।।बाळकासी चिंता काय पोटव्यथा जया शिरीं मायबाप।।
तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनाचा ओघ उलटा फिरवला. सरळ वाहते ती धारा पण, जेव्हा ती उलटी फिरते ती राधा. संसाराकडे वाहत जाते ती धारा आणि उलटी फिरून प्रभूकडे वाहू लागते ती राधा. एकदा राधा झाल्यावर पुन्हा धारा होणे अशक्यच आहे. तुकोबारायांनी आपल्या आयुष्यातील सर्व सुखदु:खे प्रभूशी एकरूप करून टाकली. जीवनाच्या ओघात दु:ख वाटणीला आले, तर प्रभूने मला दु:ख का दिले, म्हणून माणूस आक्रोश करतो. पण जीवनभर प्रभुने जे सुख दिले, त्याचा विचार कधीच कोणी करत नाही. दु:ख देवाने दिले आणि सुख हे आपल्या कर्तृत्वाचे फळ आहे, असे माणसाला नेहमी वाटते. सुखदु:खाचा विचार करण्यापेक्षा सुखदु:खाच्या मागे कोण आहे कळल्यावर त्याची बोच आपोआपच कमी होते.
एक व्यक्ती रस्त्यातून चालली असताना मागून कोणीतरी पाठीवर जोरात थाप मारली. ज्याला लागले तो एका क्षणात इतका तापला की, त्याने त्या माणसाला मारायला हात उगारला. पण मागे वळून पाहिले तर आपल्या जिवलग मित्रानेच थाप मारली, असे त्याच्या लक्षात आले आणि एका क्षणातच त्याचा राग मावळला व तो त्या मित्राला म्हणाला, 'अरे, तुला काही कळतं की नाही रे, लागलं ना रे मला.' तसंच जीवनामध्ये जेव्हा दु:ख येत, तेव्हा संत प्रभूलाच हाक मारतात. कारण ते दु:ख पाठवणारा प्रभू आहे, याची संतांना पूर्णपणे जाणीव असते. म्हणून आई आपल्या बाळाला मारत असते; पण ते बाळ मारणाऱ्या आईलाच बिलगते.
माझें जीवन तुझे पाय। कृपाळू तूं माझी माय।।नेदीं दिसो किविलवाणें। पांडुरंग तुझें तान्हें।।जन्ममरण तुजसाठीं। आणीक नेणें दुजी गोष्टी।।तुका म्हणे तुजविण। कोण हरिल माझा सीण।।
तुकाराम महाराज प्रपंचात असून नसल्यासारखे होते. ते म्हणतात : 'प्रपंच ओसरो। चित्त तुझे पायी मुरो।' काही जण 'ओसरो' शब्दाचा अर्थ 'आटो' असा करतात. आपण म्हणतो की आता नदीचे पाणी ओसरले, म्हणजे नदीचे पाणी आटले असे नव्हे, तर नदीचे पाणी इतपत आहे की, आपण त्यातून पलीकडच्या तीरावर जाऊ शकतो. तसे तुकाराम महाराजांनी 'प्रपंच आटो' असे म्हटले नाही, तर 'प्रपंच ओसरो' अशी ते पांडुरंगाजवळ प्रार्थना करतात. प्रपंच इतपत असावा की, ज्याच्यामधून देवाकडे येण्याला अडसर नसावा. खरे तर ज्याला पोट आहे, त्याला संसार आहे, मग तो घरात राहो अथवा मठात राहो. कारण केवळ बायकामुले एवढाच संसार नव्हे! ज्याने प्रकृती धारण केली आहे, त्याला संसार टाकता येत नाही, हे तुकाराम महाराजांना बरोबर माहीत होते. त्याचप्रमाणे 'संसाराचे अंगी अवघींच व्यसने' हेही ते जाणून होते. म्हणून तुकाराम महाराज प्रपंचापासून अलिप्त राहिले. याचा अर्थ बायकामुले सोडून त्यांनी काही संन्यास घेतला नाही. धोतर, अंगरखा टाकून कफनी घातली नाही अथवा लंगोटीही लावली नाही. कारण पारमाथिर्क केवळ बाह्य अंगाने संन्यास घेतात; पण वृत्ती मात्र भोगाच्या ठिकाणी अडकलेली असते. निळोबारायांनी तुकोबारायांचे आपल्या आरतीत वर्णन केले आहे, 'प्रपंचरचना सर्वही भोगूनि त्यागिली' त्यांनी संसारातील खते बुडवली, मात्र भिक्षा मागण्याचा उपदेश केला नाही. उलट भिक्षेचा त्यांनी निषेधच केला आहे. ते आपल्या एका अभंगात म्हणतात,
भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे।।ऐसियासी नारायणे। उपेक्षिजे सर्वथा।।देवापायी नाही भाव। भक्ती वरीवरी वाव।।
ढोंगबाजी करीत फुकट उदरभरण करणे त्यांना नामंजूर होते.
सोयरी वनचरे
एकदा तुकोबाराया इंदायणीच्या काठी करंजाया मावल्या गावाजवळ भजन करत बसले होते. तुकोबारायांना बघून एक शेतकरी तेथे आला व त्यांना म्हणाला, "माझ्या शेतात बसून तुम्ही पाखरांची राखण करा. त्या बदल्यात मी तुम्हाला अर्धा मण धान्य देईन." तुकोबारायांनी ते मान्य केले व मचाणावर शेताची राखण करायला बसले.
तुकोबाराय सर्व कर्मामध्ये एकरूप होत असत. कोणत्या कर्माबद्दल अट्टहास न करता जे ओघाने घडेल, त्यात आनंद मानत असत. राखण करताना तुकोबारायांना अनेक पक्षी कणसांवर येऊन बसलेले दिसले. पक्ष्यांना पाहून त्यांना खूप आनंद वाटला. हे पक्षी म्हणजे प्रभूचेच रूप आहेत, असे त्यांना वाटले.
बिचाऱ्यांना खूप भूक लागली असेल, तर खाईनात का बिचारे, असा विचार करून तुकोबाराया कौतुकाने त्यांच्याकडे पाहत बसले. शेतीकडे, पक्ष्यांकडे पाहत तुकोबारायांचे नामस्मरण मात्र मनोभावे चालू होते. तुकोबाराया शेताची राखण करावयास बसले आहेत व त्या बदल्यात अर्धा मण धान्य मिळणार आहे, हे ऐकून जिजाईलाही बरे वाटले.
त्या मुलीच्या हातून शेतातच त्यांच्याकरिता जेवण पाठवू लागल्या. तुकोबारायांच्या अंत:करणातील निर्झर पक्ष्यांनाही जाणवल्यामुळे त्यांनाही तुकोबारायांची भीती वाटेनाशी झाली.
अशारीतीने एक महिनाभर पक्ष्यांची प्रेमाने राखण चालू होती. एक महिन्याने तो शेतकरी परत आला. शेतात येऊन बघतो, तर दाण्यांनी भरलेल्या कणसांऐवजी काळ्या पिशाच त्याच्या दृष्टीस पडल्या. ते बघून शेतकऱ्याचे डोके गरगरू लागले व त्याचा क्रोध अनावर झाला.
इकडे तुकोबाराया मात्र भजनात रंगून गेले होते. "तुझ्यावर विश्वास ठेवून मी गेलो, पण तू मात्र माझा विश्वासघात केलास", असे म्हणून त्याने रागाने महाराजांना मनगटाला धरून ओढले व गावच्या पंचायतीसमोर उभे केले. त्या शेतकऱ्याने मोठ्याने अकांडतांडव करून पंचांना सर्व वृत्तांत सांगितला. याबद्दल पंचांनी तुकोबारायांना विचारताच ते म्हणाले, "शेतकऱ्याने मला माळावर बसून पक्ष्यांची राखण करायला सांगितले होते. मग ती पाखरे मी उडवून लावली असती, तर ती सर्व मेली नसती का? सर्व पक्षी घरी काहीही न नेता, इथेच बसून दाणे खात असत.
मला पक्ष्यांची राखण करायला सांगितली होती, म्हणून मी त्यांची काळजी घेतली." तुकोबारायांचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागले. शेतकरी अधिकच संतापला व पंचांना म्हणाला, "मी आता गाव सोडून निघून जातो. तुम्हीच हे शेत सांभाळा. पंचांना वाटले, हा शेतकरी निघून गेला, तर शेतसारा कोणी भरायचा? म्हणून त्यांनी शेतकऱ्याला त्याच्या शेतात किती धान्य पिकत होते ते विचारले. शेतकऱ्याने त्याच्या शेतात दोन खंडी धान्य येत असल्याचे सांगितले.
पाटील तुकोबारायाला म्हणाले, "तुम्ही स्वत:च यांचे शेतातील धान्य पाखरांनी खाल्ले असे सांगत आहात. याचे नुकसान भरून देण्याइतकी तुमची परिस्थिती नाही तुम्ही त्या दोन खंडी धान्याबद्दल शेतकऱ्याला खत लिहून द्या व राहिलेल्या पिशा आपल्या घरी घेऊन जा." हे ऐकल्यावर तुकोबारायांनी आनंदाने तसे खत लिहून दिले. ते खत पाहून शेतकऱ्याचे समाधान झाले.
तुकोबारायांनी खत लिहून दिल्यावर पंच मंडळी त्या शेतकऱ्याचे किती नुकसान झाले आहे, हे पाहण्याकरिता त्याच्या शेतात गेली. महाराजांचा सतत सांभाळ करणाऱ्या पांडुरंगाने चमत्कार घडवून आणला. सर्व पंच व ग्रामस्थ तिथे जाऊन पाहतात, तर पहिल्यापेक्षा दसपट कणसे लागली होती. प्रत्येक कणीस दाण्यांनी भरपूर भरलेले होते. त्या कणसाला पक्ष्यांनी चोच मारली आहे का, हे सर्वजण बघू लागले; पण कोठेही तसे न दिसल्याने सर्वजण विस्मित झाले.
ती दाण्यांनी भरलेली कणसे पाहून शेतकरी पंचांना म्हणाला, "ते खत तुकोबारायांना परत द्यावे व माझे शेत माझ्या स्वाधीन करावे." पंच म्हणाले, "एकदा पंचायतीमध्ये निर्णय दिल्यावर तो आता बदलता येणार नाही. तुला राशीवरचे धान्य मिळेल." देवाला तुकोबारायाची चिंता आहे याची सर्वांना प्रचीती आली.
पंच तुकोबारायांना म्हणाले, "आता तुम्ही तुमच्या शेताची राखण करा." तुकाराम महाराज म्हणाले, "आम्ही काहीच घेतलं नसताना आम्हाला इतका त्रास झाला, मग सर्व शेत घेतल्यास किती त्रास होईल?" असे म्हणून विरक्त तुकोबाराय भजन करण्याकरता भंडारा डोंगरावर निघून गेले. गावच्या लोकांनी मजुराकरवी शेताची राखण केली व कणसे काढून धान्याची रास केली. ज्या शेतात दोन खंडी धान्य पिकत होते, तेथे सतरा खंडी धान्य पिकले.
तुकोबारायांना गावकरी म्हणाले, "हे धान्य तुम्ही घरी नेऊन साठवून ठेवा." पण निरपेक्ष तुकोबारायांनी त्या धान्याकडे ढुंकूनही बघितले नाही व नेहमीच्या सहजतेने ते भजन करत करत तिथून निघून गेले. त्यांची वृत्ती अशी निरिच्छ होती म्हणूनच पांडुरंग सर्व बाजूने त्यांचे रक्षण करत होता. जिजाबाईला हा सर्व प्रकार ऐकून अतिशय वाईट वाटले.
दैवाने दिले, पण कर्माने नेले, हीच त्यांची खंत होती. त्यानंतर गावातील महादजीपंत कुळकर्णी यांनी ते धान्य आपल्या घरी नेऊन ठेवले व देवाने दिलेल्या धान्याचा विनियोग देवाच्याच कार्याकरिता करण्याचा विचार त्यांनी केला.
वारकरी संप्रदायाचा कळस
देवाचे देऊळ होते ते भंगले।चित्तासी जे आले करावेसे ।।
आपल्या घरात पूर्वापार पांडुरंगाचे मंदिर आहे. ते जर नीटनेटके झाले तर, भजनकीर्तनास त्याचा चांगला उपयोग होईल. हा संकल्प मनात उठल्याबरोबर तुकोबारायांनी देवळाचा जीर्णाेद्धार करण्याचा निर्धार केला. महाराजांनी दुसऱ्या कोणाला हे काम सांगण्यापेक्षा, ते स्वत:च करावे असे ठरवून, कुदळ-फावडे घेऊन, दगड-माती जमा करून, कामास एकट्याने सुरुवात केली.
तुकोबाराय एकटेच देवळाचे काम करत आहेत, आता हे काम कसं बरं पूर्ण होईल? म्हणून देवाने महादजीपंतांना दृष्टांत देऊन सांगितले की, 'तू जे धान्य साठवून ठेवले आहेस, ते या देवळाच्या कामाला लाव.' महादजीपंतांनी हे स्वप्न गावकऱ्यांना सांगितले व मंदिराजवळ येऊन पाहतात तर तुकोबाराय एकटेच मंदिराचे काम करत आहेत असे बघून, दृष्टांताबद्दल खात्री पटली व देवाने आपल्याला योग्यवेळी मार्गदर्शन केले याचा आनंदही वाटला.
महादजीपंतांनी मजूर व साहित्य गोळा करून देऊळ लवकरच पूर्ण केले. काम तर उत्तम झाले. त्यातच सर्व धान्याचे पैसे संपले. पण आता देवळाचे उद्यापन करण्याचे शिल्लक राहिले. त्याकरिता पूजा-अर्चा करणे आवश्यक होते. देवाने महादजीपंतांना पुन्हा स्वप्नात जाऊन सांगितले की, 'तुम्ही पंचायत बरोबर केली नाही. तुम्ही पातकी आहात, तुम्ही शेतकऱ्याला दोन खंडी धान्य दिलेत, पण तुकाराम महाराजांना राखणीबद्दल जे अर्धा मण धान्य द्यायचं होतं, ते का दिले नाही? तेव्हा झालेली चूक त्वरित सुधारावी.' महादजीपंतांनी त्वरित गावकऱ्यांना हे स्वप्न सांगितले.
देवाचा न्यायनिवाडा योग्य आहे व आपली चूक झाल्यानेच पंढरीनाथ आपल्यावर रागावले आहेत हे कबूल केले. पंचांनी त्या शेतकऱ्याला बोलावून घेतले व राखणीचे अर्धा मण धान्य तुकोबारायांना देण्याची आज्ञा केली. तो म्हणाला, 'इंदायणीच्या काठी पांडुरंगाची मूर्ती मी बघितली. ती माझ्यावर रागावली आहे, असे मला वाटले,' असे सांगून त्याने धान्य आणून दिले. हा घडलेला प्रकार पाहून सर्व ग्रामस्थ व पंच मंडळी चकित होऊन त्यांनी या धर्मकार्याकरता भराभर साहित्य आणून जमा केले. अशा रीतीने उद्यापनाचा सोहळा थाटात पार पडला.
या अलौकिक घटनेनंतर महादजीपंतांना तुकोबारायांबद्दल खूपच आदर वाटू लागला. तुकाराम महाराजांची संसारातील अलिप्तता पाहून त्यांना असे वाटले की, ज्या मायबापांची सेवा प्रत्यक्ष पांडुरंग करतो, त्यांची आपल्या हातूनही काही तरी सेवा घडावी. मग या हेतूने त्यांनी घरी जेवण तयार झाल्यानंतर पहिले ताट तुकोबारायांच्या घरी नैवेध म्हणून पाठवण्यास सुरवात केली व त्यानंतरच स्वत: भोजन करायचे, असा नेम त्यांनी ठेवला.
यावरून एक गोष्ट निश्चित कळते की, जेवणाची चिंता महाराजांच्या घरी पडली नाही. याचा उल्लेख तुकोबारायांचे वंशज गोपाळबुवा यांनी लिहिलेल्या तुकाराम महाराजांच्या चरित्रात केला आहे, 'तुकयाचे घरीचा परामर्ष करून । मग भोजन करी महादजीपंत जाण।' (तु. ता. मो. गा.) त्यामुळे दुष्काळाच्या काळामध्ये तुकोबारायांच्या घरी कमतरता पडली असेल तेवढीच, पण त्यानंतरच्या काळात जेवणाखाण्याची तरी कमतरता नव्हती हे तर सिद्ध होतेच, पण त्याबरोबरच तुकोबारायांचा जनमानसावरील ठसाही ध्यानी येतो.
मंदिराचे बांधकाम झाल्यानंतर पांडुरंगाला तुकोबारायांचे कीर्तन ऐकण्याची इच्छा झाली. त्या इच्छेनुसार तुकोबारायांनी दर एकादशीला कीर्तन करण्यास सुरवात केली. ते आपल्या अभंगात म्हणतात, 'आरंभी कीर्तन करीं एकादशी। नव्हती अभ्यासीं चित्त आधी।' कीर्तन करण्यासाठी लागणारे पाठांतर त्यांच्याजवळ नव्हते. ज्या नामदेव महाराजांचे ते अवतार होते त्यांचे अभंग ते पाठ करू लागले.
कांही पाठ केली संतांची उतारें। विश्वासे आदरे करोनियां।गाती पुढे त्यांचे धरावें धृपद। भावे चित्त शुद्ध करोनिया।
यानंतर तुकोबारायांनी ज्ञानेश्वरीचे अध्ययन सुरू केले. त्याच्याबरोबरच एकनाथी भागवताचे पारायणही सुरू केले. असे सांगतात की, तुकोबारायांनी एकनाथी भागवताची एक हजार पारायणे केली. या साधनेकरिता भंडारा डोंगरावर महाराज बसू लागले. महाराजांवर जन्माच्या पूवीर्पासूनच पांडुरंगाचा वरदहस्त असल्याकारणाने संतवचने त्यांच्या मुखावर पटकन चढत होती व ती बुद्धीमध्ये उदित होऊन कृतीमधून प्रगट होऊ लागली. त्यांचा आचार सर्वांना मार्गदर्शक ठरू लागला. विद्वान मंडळींकडे उत्तम विचार असतील, पण त्या विचारासारखी कृती त्यांच्या हातून घडेल, असे संागता येत नाही. काही जणांकडे उत्तम विचाराबरोबर उत्तम आचारही असतो. अशा मंडळींना सज्जन, सात्त्विक व सत्शील म्हणून जगामध्ये मान मिळते. पण आचार, विचार व प्रभूचा साक्षात्कार हे तिन्ही ज्यांच्या ठिकाणी एकवटत,े त्यांना संत म्हणावे. आधी केले मग सांगितले, अशा बाण्याच्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये या तिन्हीचा संगम झालेला दिसतो. म्हणूनच ते वारकरी संप्रदायाचा कळस झाले.
सद् गुरू भेटला सदानंद
श्री ज्ञानेश्वरी, भागवत, नामदेव महाराजांची गाथा या संत वाङ्मयाबरोबर तुकोबारायांनी भागवत कथा, संतकथा व नाथांचे भावार्थ रामायण, ज्ञानेश्वर महाराजांचा अमृतानुभव, विवेकसिंधू, कबीर आदी संतांच्या वाङ्मयाचेही खूप अध्ययन केले. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांनी ग्रंथवाचन सुरू केले, त्याबरोबर गळ्यात वीणा घालून ते भजन करू लागले व प्रेमप्रीतीने प्रभूला आळवू लागले.
सुरुवातीच्या काळात तुकोबाराय प्रभूला देव म्हणून बघत होते. कालांतराने ते प्रभूकडे मायबाप, जीवीचा जिवलग, सखा म्हणून बघू लागले. महाराज ज्ञानेश्वरीचे चिंतन-मनन करू लागले, तेव्हा त्यांना असे जाणवले की, इतर ग्रंथांमध्ये जीवात्मा, जडात्मा, साक्षी आत्मा, कुटस्थ आत्मा हे शब्द व घटापटाच्या शुष्क पांडित्याची खूपच चर्चा दिसली. ते आपल्या अभंगात म्हणतात, 'घटापटा डहुळ मन। होय शीण न करू तो।'
देवाची सेवा करावी हे त्यांना ठाऊक होते; पण ज्ञानेश्वरीतून देवच जीवाची सेवा कशी करत आहे, याची प्रचीती विशेषत्वाने उदित होऊ लागली. प्रियत्वाची परमसीमा हीच माऊली. आत्म्याची भेट याची खूणगाठ त्यांच्या मनात बांधली गेली. बाळच आईकरिता रडते असे नव्हे, तर आईसुद्धा बाळाकरिता कशी तळमळत असते, याची जाणीव ज्ञानेश्वरीतून झाली. अर्जुनाला मोह झाला, यापेक्षा देवच अर्जुनाच्या मोहात अडकला आहे हे कळून आले.
जे अमृताची वोतली। की प्रेमचि पिऊनि मातली।
म्हणौनि अर्जुन मोहें गुंतली। निघों नेणें।। ज्ञाने. अ. 5 ओ. 175
गीता ही मोक्षदायिनी आहे; पण ज्ञानेश्वरी ही प्रेमदायिनी आहे. ही भूमिका ज्ञानेश्वरीच्या अध्ययनातूनच त्यांच्या मनात प्रगट झाली. अमुक एक गोष्ट घडावी का न घडावी, ते हे विश्व ज्याच्या सत्तेने चालते तो परमात्माच एकमेव जाणतो. कर्मामध्ये जर काही कमी अधिक घडले तर त्याविषयी विचार करू नकोस.
जीवन त्या प्रभूशी एकरूप करून टाक. माळी जिकडे त्या पाण्याला घेऊन जातो तिकडे ते पाणी विनातक्रार जाते, तसे तू निराभिमानी होऊन त्या पाण्यासारखा हो व ईश्वरी सत्तेच्या ओघाशी एकरूप हो. तसेच प्रवृत्ती व निवृत्ती हे ओझे तू आपल्यावर घेऊ नकोस व निरंतर त्या परमात्म्याला भज. हा ज्ञानेश्वरीचा बोध त्यांच्या जिव्हारी ठरला म्हणून या ओवीला त्यांनी ज्ञानेश्वरीचा कळस म्हटले आहे. 'माळीयें जेवूंतें नेलें। तेवूतें उगेचि निवांत गेले।। हा तो ज्ञानेश्वरीचा कळस। पिका आला ब्रह्मारस।।' मोक्षापेक्षा भक्ती श्ाेष्ठ हा बोध सकळ जीवाला सनाथ करणाऱ्या नाथ महाराजांचे भागवत वाचून त्यांच्या मनामध्ये अधिकच ठसला. मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ याचे त्यांनी आपल्या अभंगात वर्णन केले आहे व भागवताचा कळस काय हेही सांगितले आहे. 'मुक्तिवरिल गुरूभक्ति। उद्धवे मागितली प्रेमप्रीती।। हाचि भागवताचा कळस। पिका आला ब्रह्मारस।।' अशी साधना करत करत त्यांच्या अंत:करणामध्ये जेव्हा अद्वैत बोध परिपूर्णतेला आला, तेव्हा तुकोबाराया आकाशाएवढे व्यापक होऊन अणूपेक्षाही सूक्ष्म झाले. या अद्वैत ज्ञानाच्या सिद्धांतावर उभे राहून ते म्हणतात, 'तुज मज ऐशी परी। जैसे तरंग सागरी।।'
'सद्गुरू भेटला सदानंद'मानियला स्वप्नी गुरूचा उपदेश।धरिला विश्वास दृढ नामीं।यावरी जाली कवित्वाची स्फूतिर्।पाय धरिले चित्तीं विठोबाचे।
ज्ञानसत्ता आपल्या सर्व षड्गुण ऐश्वर्यासहित या जगामध्ये अवतीर्ण होते, तेव्हा त्याला देवाचा अवतार म्हणावा. ते ज्ञान जेव्हा कर्मरूपाने प्रगट झालेले दिसते, तेव्हाच तो जीवाचा जन्म होय. जेव्हा तेच ज्ञान प्रेमबोधरूपाने प्रगट होते, तेव्हा तो संतांचा अथवा सद्गुरूंचा अवतार होय. देवाच्या कृपेने जीवाचा जन्म होतो आणि सद्गुरू कृपेने त्याला आकार प्राप्त होतो.
सद्गुरू कृपेशिवाय माणसाचे जीवन एका अनघड दगडासारखे आहे. माणसाच्या जीवनातील प्रत्येक कर्मामध्ये त्या-त्या अवस्थेतला गुरू भेटतोच. प्रथम आई गुरू होते, बाप गुरू होतो, शाळेतले गुरुजन आहेत, संसारामध्ये अनेक वेळा मार्गदर्शन करणारे निरनिराळे गुरू आहेत. चांगल्या मार्गाकडे नेणारे गुरू भेटतात तसेच वाममार्गाकडे नेणारे गुरू भेटतात.
मंत्रतंत्र उपदेशिती। घरोघरी गुरू आहेत आइती। शिष्यातें मेळवी सद्वस्तूतें। सद्गुरू त्याते श्रीकृष्ण मानी।। ना.भ.
म्हणून जो सत्स्वरूपाची ओळख करून देतो तो खरा सद्गुरू. अध्यात्मज्ञान आपल्यामध्ये उदित व्हायचे असेल तर सद्गुरूंची भेट ही व्हावीच लागते. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,
थोर थोरांची गती। गुरुवांचूनि नाही मूतिर्।। नारद मूनीं शिष्य भला। त्याचा गुरु ब्रह्माा झाला।। गुरु ज्ञानेश्वर दातार। त्याला निवृत्ती आधार।। तुकया सम स्वर्गा गेला। त्याचा गुरू तोचि झाला।। श्ाी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 'मज हृदयीं सद्गुरू। तेणें तारिलो हा संसार पुरू।' तुकोबारायांचे सद्गुरु त्यांच्या हृदयातून प्रगट झाले. तुकोबारायांचे गुरू व देव भिन्न नव्हते. म्हणूनच ते म्हणतात, 'माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव। आपणचि देव होय गुरू।'
अभंगवाणी हा देवाचा प्रसाद
वारकरी संप्रदायाची परंपरा मूळ चैतन्य सत्तेपासूनच आहे. निळोबाराय या पंरपरेचे वर्णन करताना म्हणतात,
मुख्य महाविष्णु चैतन्याचे मूळ । सांप्रदाय फळ तेथोनिया।।राघवाचरणी केशव शरण । बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची ।।बाबाजीनें स्वप्नीं येउनि तुकयाला । अनुग्रह दिला निजप्रीती ।।जगद्गुरु तुका अवतार नामयाचा । सांप्रदाय सकळांचा येथूनियां।।
बाबाजींनी तुकोबारायाला जो मंत्र दिला, तो सिद्ध व बीज मंत्र म्हणजेच, 'जय जय रामकृष्णहरि' तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या आवडीचा मंत्र गुरुरायांनी सांगितला.
माझिये मनींची जाणोनियां भाव । तो करी उपवा गुरुरावो ।।आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंफा कांहीं कोठें ।।
'रामकृष्णहरि' हा बीज मंत्र आहे. काही लोकांना हा मंत्र साधा आहे व आम्हाला माहित आहे, असे वाटते. म्हणूनच त्यांना त्याचे महत्त्व लक्षात येत नाही. लोकांना मंत्र कानात सांगून हा गुह्य मंत्र कोणाला सांगू नकोस, असे सांगितले की, त्या मंत्राचे महत्त्व वाटते. काहीजण असेही सांगतात, 'तुम्हाला 'रामकृष्णहरि' मंत्र दिला? हा मंत्र तर जगाला ठाऊक आहे.
तुम्ही आमच्याकडून गुह्य मंत्र घ्या, म्हणजे तुमचा उद्धार होईल.' काही सांप्रदायिक मंडळी असा विरुद्ध प्रचार करून जगाची दिशाभूल करत असतात. पण बीजावरून फळाची जशी. कल्पना येत नाही, तसे केवळ 'रामकृष्णहरि' हा मंत्री आम्हाला ठाऊक आले, असे म्हणून जमत नाही.
त्या मंत्राचा नित्यनेमाने जप करावा लागतो. तसा तो फलदुप होतो. भोपळ्याच्या अथवा काकडीच्या बीला, जसे जसे पाणी घालावे, तसे तसे त्याचे रोप वाढवून बीजातून भोपळा किंवा काकडीचे फळ निर्माण होते. तसेच नित्य जपाचे खतपाणी जेव्हा घातले जाते, तेव्हाच हा मंत्र फलदुप होतो.
तात्त्विक अर्थ असा आहे की, 'राम रमयन्ति । कृष्ण कर्षति।' आणि 'ऐक्यानंद तो हरि' हा गुह्य मंत्र नाही, पण जप साधनेशिवाय हे गुह्य प्रगट होत नाही. म्हणून तुकोबारायांनी मेघवृष्टीने सर्व जगाला उपदेश केला, 'गात जातो तुका । हाचि उपदेश लोकां । नाहीं विचारित मेघ । हागिनदारी शेत' म्हणूनच या मंत्रावर पूर्ण श्ाद्धा ठेऊन तुकोबारायांनी या मंत्राचा जप केला व जगालाही हाच मंत्र अत्यंत आवडीने दिला. या व्यतिरिक्त वारकरी संप्रदायाचा दुसरा मंत्र नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 'रामकृष्ण नामें ही दोन्ही साजिरी । हृदयमंदिरी स्मरा का रे,'
सद्गुरु अनुग्रहानंतर नामदेवरायांनी तुकोबारायांच्या स्वप्नात येऊन कवित्व करण्याची आज्ञा केली.
नामदेवें केले स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगा येऊनियां ।।सांगितलें काम करावें कवित्व । वाडगें निमित्य बोलों नको ।।
मंत्र जपाने तुकोबारायांची वाणी पवित्र झाली. बुद्धीमध्ये विचार प्रगट होत होते, हृदयामध्ये भावतरंग उठत होते. पण त्यांना शब्दरूपी आकार देण्याचे सार्मथ्य गुरु-अनुग्रहानंतरच प्राप्त झाले.
आवली नव्हे अवलिया
एखादा अवलिया सत्पुरुष जसा आपल्या बोधाच्या ऐश्वर्यामध्ये मस्तीत वावरतो, देवाची-जगाची किंबहुना कुणाचीच पर्वा करत नाही, तशाच आमच्या आवली ऊर्फ जिजाबाई आपल्या थाटातच वावरत होत्या. म्हणूनच जिजाबाई अनेकवेळा देवाला शिव्यांची लाखोली वाहात असत.
देव आहे का नाही, याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका असते, पण जिजाबाई शिव्यासुद्धा ज्या निश्चयाने देत होत्या, त्यातून ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव त्यांना किती प्रकर्षाने होती, हेच प्रगट होते. देवाची स्तुती करतानासुद्धा एखादा शब्द अशुद्ध आला, तर माणसे घाबरून जातात आणि जिजाबाई तर देवावर कडाडून अपशब्दांचा हल्ला करीत असत.
मातोश्री जिजाबाई या फणसासारख्या होत्या. फणसाला बाहेरून काटे असले, तरी आतील गरे अतिशय रुचकर व गोड असतात. जिजाबाई देवाशी व जगाशी वागताना कडक वागल्या तरी तुकोबारायांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत प्रेम होते. म्हणूनच त्या देहूपासून तीन मैलांवर असलेल्या भंडारा डोंगरावर रोज तुकोबारायांकरिता भाजी-भाकरी व पाणी घेऊन जात असत. महिपती म्हणतात,
पंचप्राण भ्रतारापासीं। परी विरोध चालवी देवासी।दर्शना न जाय देवळासी। म्हणे काळा दृष्टीसी न पडावा।।
'आमचे पूर्वज विश्वंभरबुवा यांनीच हा दावेदार आपल्या घरी आणून ठेवला आहे. या काळ्याच्या नादी लागून माझा नवरा बिघडला. माझ्यावर सर्व प्रपंचाचा भार टाकून आपण मात्र रात्ररात्र देवळात भजन करीत असतात.
कोणत्या जन्मीचं ऋण आम्ही फेडीत आहोत, हे काही कळत नाही. गावात जवळ कुठे भजन करीत असते तर बरं झालं असतं. लांब डोंगरावर जाऊन भजन करीत बसतात. त्यामुळे मला मात्र सारखी त्यांची काळजी करावी लागते. एवढ्या लांब मला रोज पाणी व भाकरी घेऊन जावं लागतं.
तुकोबारायांच्या घरामध्ये पंढरीचे दैवत नांदायलाच आले होते. याचा उल्लेख दोन ठिकाणी आला आहे. 'धन्य देहू गांव पूण्यभूमि ठाव। तेथे नांदे देव पांडुरंग।' तर दुसऱ्या अभंगात ते म्हणतात, 'धन्य आजि दिन दरूशन संतांचे। नांदे तया घरीं दैवत पंढरींचे।'
सर्व विश्वाला नांदविणारा परमात्मा तुकोबारायांच्या घरात मात्र नांदत होता, हेच तुकोबारायांच्या अवताराचे वैशिष्ट्य आहे. स्वत:चे अस्तित्व नसणे म्हणजेच नांदणे. जेथे मनाला, बु्द्धीला, आचार-विचाराला मुरड घालावी लागते, त्यालाच नांदणे म्हणतात. सर्व विश्वावर नियंत्रण करणारा परमात्मा जिजाबाईंपुढे मात्र काकुळतीस येत होता. जिजाबाईंना तुकोबा-रायांबद्दल नितांत प्रेम होते.
त्यांना असे वाटायचे की, पांडुरंग तुकोबारायांच्या मागे लागत असताना तुकोबारायांनं त्याच्या मागे जाण्याची गरज काय? एवढे रात्रंदिवस भजन करून शरीराला त्रास करून घेण्याची, सतत त्याच्या नावाने टाहो फोडत बसण्याची त्यांना आवश्यकता नाही असेच जिजाबाईंना वाटे तुकोबारायांची पांडुरंगावर निस्सीम प्रेम-भक्ती होती तर जिजाबाईंची कट्टर विरोधी भक्ती होती. 'स्नेहें द्वेषें अथवा वैरें। दृढ ध्यान जेणें होयें। तेणेंचि पावे। तदुपता।' या विरोध भक्तीमुळेच पांडुरंगाने जिजाबाईंच्या हृदयांत शिरण्याकरता मोठ्या कौतुकाने एक लाघव केले.
एकदा असे घडले की, जिजाबाई भंडारा डोंगरावर तुकोबारायांकरिता दुपारचे जेवण व पाणी घेऊन निघाल्या. भर दुपारची वेळ असल्याकारणाने जिजाबाई उन्हामुळे थकून गेल्या. उन्हाबरोबरच मनामधील पांडुरंगाबद्दलचा रागही वाढत होता.
अनवाणी पायांनी डोंगर चढता-चढता करवंदीचा काटा त्यांच्या पायात खोलवर रुतला. जिजाबाई अत्यंत कासावीस होऊन मुर्च्छा येऊन पडल्या. थोड्या वेळाने सावध होऊन बघतात, तर पायातून रक्त येत होते व तुकोबारायांना पिण्याकरिता जे पाणी आणले होते, तेही सांडून गेले हाते. आता तुकोबारायांना जेवण व पाणी कोण देईल, याची त्यांना काळजी पडली.
मनात आले, त्यांना तर जेवणाची शुद्धच नसते आणि जन्मजन्मांतरीच्या माझ्या दावेदाराने योग्य वेळी दावा साधला. जिजाबाईंचे म्हणणे असे की, तुकोबारायांना इतक्या लांब भंडारा डोंगरावर जाऊन भजन करण्याची बुद्धी त्या काळ्यानेच दिली. तुकोबारायांच्या मुखातून पांडुरंगाच्या रूपाच्या वर्णनाचे अभंग जसे धडाधड बाहेर पडत होते, त्याहीपेक्षा दुप्पट वेगाने जिजाबाईंच्या मुखातून शिव्यांची मालिका बाहेर पडत होती.
व्यवहारही असाच आहे की, जास्त गोड खाल्ल्यानंतर थोडेसे तिखट-आंबट बरे वाटते. तसेच देवाला सर्व साधुंची स्तुती-सुमने ऐकल्यावर जनाबाई, जिजाबाई यांच्या शिव्यासुद्धा मिष्टान्नासारख्या गोड लागत होत्या. 'मेल्या', 'काळ्या' म्हणून का होईना जिजाबाईने देवाला कळवळून हाक मारल्याने देवाने निर्गुण स्वरूप टाकून सगुण रूप धारण केले.
जिजाबाईंच्या मनात धाकधूक होतीच की, 'एखाद्या वेळेस हा मुद्दाम मला अडचणीत लोटून देईल आणि पुन्हा मदत करायला धावत येईल, पण मी त्या मेल्याचे नावच घेणार नाही,' असे म्हणून पाय हातात धरून त्या रडू लागल्या. कितीही प्रयत्न केला तरी काटा पायातून निघेना. हे सर्व श्रीहरीने जाणले. पांडुरंगाला वाटले, जिजाबाई इथेच बसून राहिल्या तर माझा तुका उपाशी राहील. म्हणून भक्तवत्सल पांडुरंग तेथे धावत आले.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे
जगद्गुरू तुकोबारायांकरिता भंडारा डोंगरावर जेवण घेऊन जात असताना जिजाऊच्या पायात काटा रुतला. तिच्या मनात आले की, हे सर्व त्या 'काळ्या'चेच काम आणि आता अगदी माझ्या मदतीला धावून येईल. असं म्हणून जिजाऊ समोर पाहातात तो, 'राज सुकुमार मदनाचा पुतळा,' घननीळ सावळा' तिच्यासमोर उभा होता.
जिजाऊंना जो समोर नको होता, तोच समोर उभा? त्या मनात म्हणाल्या, 'हा मेला आता इथे कुठे उगवला?' बोलावले नसताना येऊन लोचटपणा करण्याची याला सवयच लागली आहे.' असं म्हणून त्या तोंड फिरवून बसल्या; पण हा लीला-नाटकी, नटखट परमात्मा असल्यामुळे ज्या ज्या बाजूला जिजाऊ तोंड फिरवू लागल्या, त्या त्या बाजूला तो चक्रपाणि प्रगट होऊ लागला.
शेवटी "हा वैरी, माझ्या मागे का लागला आहे?" असे म्हणून थकलेल्या जिजाऊने डोळे झाकून घेतले तो काय? आतही तोच दिसू लागला! जिजाऊ आपल्याला दाद देत नाही, हे ओळखून पांडुरंग तिच्याजवळ गेले व म्हणाले, "बाई, मी तुमच्या पायातला काटा काढतो," जिजाऊ म्हणाल्या, "माझ्या पायातच काटा मोडला नाहीस, तर माझ्या आयुष्यातच तू काटा होऊन राहिला आहेस.
तू आमच्या चांगल्या चाललेल्या संसारात विष कालवलंस." तुकोबाराय डोंगरावर जेवणासाठी तळमळत असतील, या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या होत्या. कारण जिजाबाई महान पतिव्रता होत्या. तुकोबारायांना जेऊ घातल्याशिवाय त्या अन्नाचा कणसुद्धा घेत नसत.
पांडुरंगाने जवळ येऊन जिजाऊचा पाय आपल्या हातामध्ये घेतला. दुसरा पर्यायच न राहिल्याने जिजाऊंनीही पांडुरंगाला पायाला हात लावू दिला. 'आवली' म्हणजे तुकोबारायांची प्रेम-प्रतिती आहे, हे जाणून पांडुरंगाने पाय मांडीवर घेऊन अत्यंत हळुवारपणे काटा काढला. एका क्षणात जिजाऊंच्या पायाची संपूर्ण वेदनाच नष्ट झाली.
देवाने एवढे सर्व करूनही त्यांच्या मनात पांडुरंगाने उपकार केले, अशी यत्किंचितही भावना नव्हती त्या ठसक्यात म्हणाल्या, "काटा काढून माझ्यावर मोठा उपकार करायला आला होता. याने अगोदर माझ्या पायात काटा मोडलाच का?" या विचाराने त्या आपल्या थाटातच चालल्या होत्या.
विश्वामध्ये जीव परतंत्र आहे. ईश्वर स्वतंत्र आहे. पण भक्तीच्या प्रांगणात जीव स्वतंत्र आहे व ईश्वर परतंत्र आहे, असे दिसून येते. देवाकडे न बघताच त्या म्हणाल्या, "काटा काढलास, पण आता पाणी कोठून आणू?" हे जिजाऊचे शब्द ऐकून आज्ञाधारक सेवकाप्रमाणे विठूराया धावत गेले आणि एक दगड बाजूला सारला आणि तिथेच कधी नव्हता, तो पाण्याचा झरा प्रगट झाला. त्याला पाण्याचा झरा म्हणावा, की प्रेमाचा झरा म्हणावा की, प्रभूच्या कृपेने प्रगट झालेल्या अमृताचा कुंभ म्हणावा?
तो झरा आजही आपल्याला भंडारा डोंगरावर पाहायला मिळतो. प्रभूच्या प्रेमस्पर्शाने निर्माण झालेल्या जीवनधारेमधून जिजाऊंनी पाणी भरून घेतले. ते घेऊन जिजाऊंच्या मागोमाग श्ाीहरीही भंडारा डोंगरावर जाऊ लागले. पांंडुरंंग व जिजाऊ एकत्र येताना पाहून तुकोबारायांना एकदम आश्चर्य वाटले.
जिजाऊंनी भाकरीची टोपली समोर ठेवली व देवाने पायात काटा कसा मोडला, ते पायातील काटा कसा काढला इथपर्यंत सर्व वृत्तान्त सांगितला. जिवीच्या जिवलगाची जिजाऊने रागारागाने सांगितलेली ही कथा ऐकून तुकोबारायांचे मन आनंदित झाले. ते आवलीला एवढेच म्हणाले, ' बघ, माझ्या प्रभूचा किती जीव आहे तुझ्यावर. तू त्याला उगीच शिव्या देतेस. चल लवकर, माझा प्रभू दमला असेल, त्याला जेवायला वाढ. तूही दमली असशील, तूही बस आमच्याबरोबर. तिघेही बरोबरच जेऊ."
आता आवडी कां ठेवूं! बैसोनिया संगे जेवूं।।मागें नको ठेऊ उरी । माझी आण तुजवरी।।
तुकोबारायांना देवाबरोबर जेवायचा जो प्रस्ताव मांडला तो जिजाऊंना आवडला नाही. त्या म्हणाल्या, "मी काही भाकऱ्या जास्त आणल्या नाहीत. तुमच्या-माझ्यापुरतीच भाकरी आणली आहे. याला कळत नाही का की, बोलावल्याशिवाय कोणाकडे जेवायला जाऊ नये. खंडीभर बाायका त्याच्या घरी पडल्यात आणि आम्हाला येऊन रिकामा त्रास देतो." तुकोबाराय म्हणाले, "अग आवले, असं बोलू नये. तो परमात्मा, विश्वाचा जनिता आहे. त्याला काही कमी आहे का? अग विश्व निर्माण करणाऱ्याला भाकरीचा तुकडा मिळणार नाही का? रोज लाखो माणसं त्याच्यापुढे नैवेद्याचे ताट घेऊन उभी असतात. अग, तो प्रेमाचा भुकेला आहे. म्हणून तो आपल्याकडे येतो. बाकीची माणसं देवाकडे जातात. देव आपल्याकडे चालत आला आहे. अग आवले, हे तुला केव्हा समजायचं? हे बघ, उगीच जेवायच्या वेळेला भांडण काढू नकोस. माझ्या प्रभूला वाढलं नाहीत, तर मीही जेवणार नाही.' आता मात्र जिजाऊचा नाईलाज झाला व त्यांनी पांडुरंगाला आणि तुकोबारायांना जेवायला वाढले
श्री पांडुरंगाचे व तुकोबारायांचे जेवण झाल्यावर जिजाबाई तुकोबारायांच्या ताटात जेवायला बसल्या. टोपल्यातली भाजी-भाकरी तुकोबारायांनी आपल्या हाताने आवलीला वाढली आणि आवलीचा राग शांत झाला. तो संतप्रसाद सेवन करता करता, आतून बाहेरून तापलेली आवली शांत व तृप्त झाली. असे अत्यंत प्रेमाने तिघांचे जेवण झाले. देवाने दृढ आलिंगन देऊन तुकोबारायांवर पूर्ण कृपा केली व त्यांच्या अंत:करणात ऐक्यानंदाचा बोध प्रगट करून ते तुकोबारायाला म्हणाले, 'आजपासून तू भंडारा डोंगरावर भजनासाठी येऊ नकोस, कारण त्यामुळे आवलीला येण्या-जाण्याचा खूप त्रास होतो.' देवाने असेही सांगितले की, 'तू या ठिकाणी कीर्तन करशील तेथे मी प्रगट होईन.'
त्यावेळची सांसारिक परिस्थिती तुकोबारायांच्या दृष्टीने चांगली होती. पण जिजाबाईंच्या दृष्टिकोणातून ती चांगली नव्हती. हा भिन्न प्रवृत्तीचा व भिन्न स्वभावाचा भाग आहे. तुकोबाराय सर्व जगाला आपले सोयरे मानत होते. ज्यांनी टोकाचा विरोध करून वह्या बुडविल्या, त्यांनाही त्यांनी आपले जिवलग केले. मंबाजीने काठीने मारले, तरीही त्याच्याबद्दल प्रेमच होते. मग देवा-ब्राम्हणाच्या साक्षीने जिचा हात हातात, घेतला, तिच्याबद्दल व मुलांबद्दल अप्रियता कशी असेल? गंगा व भागिरथी या दोन्ही मुलींवर त्यांचे अपार प्रेम होते. त्या मुलींची लग्नेही त्यांनी उत्तम स्थळे पाहून करून दिली. यावरून असे दिसून येते की, काही चरित्रकारांनी तुकोबारायांची परिस्थिती जितकी हलाखीची रंगवली आहे तितकी ती नव्हती. दुष्काळाचा त्रास जसा इतरांना झाला, तसाच तो त्यांच्याही कुटुंबाला झाला असेल. तो काळ सोडून बाकीच्या वेळी खाण्यापिण्याची कमतरता होती, असे दिसून येत नाही. आपल्या मुलाबाळांबाबत सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, 'कन्या पुत्र बंधुजन नारायण स्मरवित्ती.'
कोणताही विषय मर्यादित सेवन करणे, यालाच ते वैराग्य म्हणत होते व त्या विषयाची मर्यादा उल्लंघन करणे यालाच ते भोग मानत होते. उदाहरणार्थ, आपल्या अंगामध्ये 97।। ताप असतोच. आरोग्यमय जीवन जगण्यासाठी तेवढा ताप असणे आवश्यक आहे. पण त्यापुढे 98।।-99 पर्यंत तर आपण म्हणतो 'ताप' आला. किंवा लग्नसमारंभात आपण मंडळींना जेवायला बोलावतो. एखाद्याने 1-2 लाडू खाल्ले तर ते कोणाच्या लक्षात येत नाही. पण एखाद्याने 20-25 लाडू खाल्ले, तर त्याची चर्चा होते. कोणत्याही विषयाने मर्यादा उल्लंघन केली, तरच त्याचे रूपांतर भोगामध्ये होते. परस्त्रीशी संबंध ठेवला, तरच त्याला व्यभिचारी म्हटले जाते. पण कुलपरंपरा वाढवण्याकरताच लग्न करून दिले जाते. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही. उलट मुलं झाल्यावर आनेदोत्सव साजरा केला जातो.
याचा अर्थ वारकरी संप्रदायाने मर्यादित भोग त्याज मानलेला नाही. भोगाने जर मर्यादा उल्लंघन केली, तर तो निषिद्ध मानला आहे. तुकोबाराया आपल्या एका अभंगात म्हणतात, 'पराविया नारी रुक्मिणी समाज!' तुकाराम महाराजांनी धनाचाही निषेध केलेला नाही. पण ते धन वाममार्गाने आले तर ते निषिद्ध आहे. ते स्वत:च म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेचि करा।'
तुकोबारायांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे प्रभूची प्रीत मनामध्ये ठसल्यावर विषयांचा आपोआपच विसर पडतो. 'विषयी विसर पडीला नि:शेष । अंगी ब्रह्मारस ठसावला.' तुकोबारायांनी आपली सांसारिक जबाबदारी कधीही झटकली नाही. त्यांनी जिजाबाईंशी काडीमोडही घेतली नाही, अथवा त्यांना सोडून संन्यासही घेतला नाही. तुकाराम महाराज भिक्षेचाही निषेध करतात. कुणाकडेही भिक्षा न मागता त्यांचा संसार त्यांच्या परीने उत्तम चालू होता. म्हणूनच संतांचा दृष्टिकोण समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. महाराजांना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे ते बरोबर माहीत होते. आपल्या एका अभंगामध्ये त्यांनी शरीराच्या उत्तम व वाईट या दोन्हीही बाजू मांडल्या आहेत.
शरीर दु:खाचे कोठार । शरीर सुखाचे धोसुके ।।शरीर विठाळाचे आळे। शरीर सकळही शुद्ध ।।
असे शरीराचे गुण व अवगुण दाखवून शेवटी ते आपला सिद्धांत असा करतात,
शरीरा सुख नेदावा भोग। न द्यावें दु:ख न करीं त्याग .नव्हे वोखटें ना चांग । तुका म्हणे वेग करीं हरिभजनी ।।
चांगले आणि वाईट याचा विचार करण्यापेक्षा प्रभूने जे शरीर दिले, त्याचा उपयोग हरिभजनाकरता कर, हाच तुकोबारायांचा साधा सरळ उपदेश आहे.
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ।।डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबांचे मुख ।।
वरील त्यांच्याच उक्तीप्रमाणे तुकोबारायांचे जीवन प्रभूला आळविण्यामध्ये जाऊ लागले. त्या समयासच ते कीर्तनामध्ये ध्रुपदही धरू लागले. संतवचने पाठ करू लागले. अशातऱ्हेने तुकोबारायांच्या अंगामध्ये भक्ती मोहरून येऊ लागली.
तोच साधू ओळखावा
श्री तुकोबारायांच्या अंगभूतच लोककल्याणाची वृत्ती होती. सर्वांगाने लोकांचे कल्याण करावे, हीच त्यांची तळमळ होती. महाराजांचा स्वभाव परोपकारी होता आणि भूतदया तर त्यांच्या रोमारोमामध्ये भिनली होती. 'भूतांची दया हे भांडवल संता' या त्यांनी लिहिलेल्या अभंगाचे कडवे ते आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष जगत होते.
देहू गावातील लोकांनी एखादे काम सांगितले, तर ते काम तुकोबाराय अत्यंत आवडीने करत असत. संतसेवेबरोबरच लोकसेवाही ते आवडीने करू लागले. तुकोबारायांनी संतसेवा व लोकसेवा करताना कोणतेही काम निंद्य मानले नाही. किंबहुना आपल्याला सेवा करायला संधी मिळत आहे, यातच त्यांनी आनंद मानला.
तोंडाने 'सर्वम खल्विद ब्रह्मा' हा सिद्धांत अट्टहासाने मांडायचा, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये पदोपदी भेदभाव करावयाचा, अशी विसंगती त्यांच्या आचारविचारात नव्हती. तुकोबारायांनी जातीचा व वर्णाचा विचार करून कधी सेवा केली नाही. सर्व भूतमात्रांबद्दल त्यांच्या मनात करुणा होती. नुसते कोरडे ब्रह्माज्ञान ते सांगत नव्हते.
परउपकारी नेणें परनिंदा। परस्त्रिया सदा मायबहिणी।।भूतदया गाई पशुंचे पाळण। तान्हेल्या जीवन वनांमाजीं।।तुका म्हणजे हेचि आश्ामांचे फळ। परमपद बळ वैराग्याचे।।
एकदा असे घडले की, जिजाई स्नानास बसल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी एक वस्त्र भिंतीवर निऱ्या करून ठेवले होते. तुकोबाराय भजन करत ओसरीवर बसले होते. तेवढ्यात त्यांनी एक अत्यंत थकलेली व अंगावर जीर्ण वस्त्र असलेली ब्राह्माण स्त्री दारात उभी असलेली पाहिली. तिची केविलवाणी अवस्था व डोळ्यांतील करुणा पाहून मेणाहून मऊ असलेल्या विष्णुदासाचे चित्त दवले. त्या वेळेस तुकोबारायांनी त्या ब्राह्माण बाईला खुणेने तिला सांगितले, 'आजीबाई, आता काही न बोलता चटकन निघून जा.' आणि तुकोबाराय इंदायणीकाठी जाऊन भजन करत बसले.
स्नान झाल्यावर जिजाबाई येऊन पाहतात, तर भिंतीवरील लुगडे गायब! हे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या डोळ्यांदेखत लुगडे कसे गेले याचा त्या विचार करू लागल्या. घरात काम करणारी बाईसुद्धा शेण आणावयास बाहेर गेली होती. घरात दुसरे कोणीच नव्हते. लुगडे कोणी नेले असेल याचे कोडे काही सुटेना. तेव्हा जिजाबाईला आंघोळ करताना कोणीतरी ब्राह्माण स्त्री वस्त्र मागताना ऐकल्याचे आठवले. आपल्या पतिराजांनीच तिला आपले लुगडे दिले असेल, याची जाणीव होताच त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. आपले 'हे' लुगडे देऊन टाकून कुठेतरी तोंड लपवून बसले असतील हे जाणून त्यांना विशेषच राग आला. त्यातल्या त्यात ते लुगडे त्यांच्या पित्याने घेतले असल्याने, त्यांचा राग अनावर झाला व त्या म्हणू लागल्या की, थोरल्या रखुमाईचे सुकृत थोर होते म्हणूनच ती त्यांच्या तावडीतून सुटली!
याच वेळेस काही मंडळी दारात हाक मारू लागली. ते ऐकून जिजाबाईंच्या अंगाचा थरकाप झाला. आता त्या मंडळींसमोर कसे जावे, असा प्रश्न त्यांना पडला. घरात असल्यामुळे तोंड तर लपवता येत नाही आणि वस्त्र नसल्याने बाहेर तर जाता येत नाही, अशी जिजाबाईंची करुणाजनक स्थिती झाली. जिजाबाईंची वृत्ती मूळ पदावर आली. त्या म्हणाल्या, 'हे सर्व काम त्या काळ्याचेच आहे.' काळ्याचे स्मरण झाल्याबरोबर पांडुरंगाने आपल्या अंगावरचा पीतांबर, जिजाबाईंच्या अंगावर टाकला. अंगावरचे भरजरी वस्त्र पाहून जिजाबाई चकित झाल्या व मनोमन म्हणाल्या, 'ही करणीही त्या काळ्याचीच आहे. जाणूनबुजून अडचण तयार करतो आणि मग त्यातून सोडविण्याचा उपकार माझ्यावर करतो, त्याला वाटत असेल, असं करून मी त्याच्या भजनी लागेन. पण अजून त्याने मला ओळखलं नाही.'
जिजाबाई वस्त्र नेसून बाहेर आल्या, तर त्या लखलखीत पितांबराचा प्रकाश सर्वत्र आपोआप पसरला. ते महावस्त्र पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. घडलेल्या घटनेचा परिणाम जाणून, तुकोबाराय लांब निघून गेले व तिथे एकांतामध्ये बसून भजन करू लागले. इकडे पांडुरंगाने पितांबर नेसवला म्हणून जिजाबाई मोठ्या आनंदात होत्या. त्या आनंदाच्या भरात त्यांनी भाजी-भाकरी केली व मुलीबरोबर तुकोबारायांना पाठवून दिली. महाराजांच्या जीवनामध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्याबरोबरच परोपकार करण्याची वृत्तीही ठायी ठायी दृष्टीस पडते. एकदा एक अतिवृद्ध बाई काठी टेकत टेकत बाजाराला निघाली होती. त्या वयोवृद्ध बाईला बघून तुकोबारायांच्या मनात दया उत्पन्न झाली. तुकोबाराया त्या बाईला म्हणाले, 'माझ्या पाठीवर बसा. मी तुम्हाला बाजारात घेऊन जातो.' म्हातारी म्हणाली, 'एवढा त्रास करण्यापेक्षा माझे तेल संपले आहे, तेवढे मला आणून दे.' तुकोबारायांनी म्हातारीला आनंदाने तेल आणून दिले. जे तेल म्हातारीला आठ दिवस पुरत असे, ते तिला बरेच दिवस पुरले. म्हणून तिला आश्चर्य वाटले व तिने सर्वांना सांगायला सुरुवात केली. काही जणांना तोच अनुभव आल्यावर त्यांनी तुकोबारायांनाच तेल आणायला सांगायला सुरुवात केली. जिजाबाईंना हे कळताच त्या चिडल्या व लोकांवर खूप रागावल्या.
अशाच घटनांमधून तुकोबारायांचा नावलौकिक खूप वाढत होता
पिकलिये सेंदें कडुपण गेले
पंढरीनाथच्या कृपेने तुकोबारायांची अभंगवाणी शुद्ध आणि पवित्र अशा गंगेच्या ओघाप्रमाणे प्रसवू लागली. ती वाणी सहज जरी कानावर पडली , तरी शेकडो जीवांचा उद्धार होऊ लागला. गुलाबपुष्प उमलले , तर त्याचा परिमळ आजूबाजूस आपोआपच दरवळतो आणि त्या सुवासाच्या अनुरोधाने अनेक लहान-मोठे भ्रमर त्याच्याभोवती गुंजारव करू लागतात.
त्याप्रमाणे तुकोबारायांच्या वाणीच्या प्रभावामुळे देहू गावाच्या परिसरातील पारमाथिर्क आवडीची मंडळी त्यांच्याकडे आकृष्ट होऊ लागली. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रोज तुकोबारायांचे कीर्तन होऊ लागले. प्रभुप्रेमाने वाणी आकार घेऊ लागली व जीवनातील अनुभव कीर्तनातून प्रगट होऊ लागले. रोजच्या संसाराच्या कटकटीतून लोकांना सुखाचा मार्ग दिसू लागला.
साधनांचा आटापिटा न करता संतवचनातून प्रभूशी जवळीक साधता येऊ लागली आणि यामुळेच तुकोबारायांच्या कीर्तनाला गदीर् होऊ लागली. महाराजांच्या कीर्तनामध्ये वेदांताची शुष्क चर्चा नव्हती , तर भक्तिप्रेमाची उधळण होती. त्या समयासच मंबाजी ब्राह्माण चिंचवडहून देहू गावी आला व मठ बांधून मठाधिपती होऊन तिथे राहिला. तुकोबारायांची प्रतिष्ठा वाढलेली पाहून त्याच्या मनात द्वेष- मत्सर वाढू लागला.
मंबाजीची जी शिष्य मंडळी होती , ती सुद्धा तुकोबारायांचे गुणगान गाऊ लागली. तेव्हा मंबाजी द्वेष-मत्सराची गरळ टाकू लागला. तो लोकांना म्हणू लागला , ' याने आता तर आमच्यासमोर काही-बाही पाठ-पाठांतर केले. संस्कृतचा तर याला गंधही नाही. हा शूद असून गावातील प्रतिष्ठित मंडळी व ब्राह्माणही याच्या पाया पडतात. ' ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे , ' डोळे फुटती डुडुळाचे! ' तशी मंबाजीची अवस्था झाली. पूवीर् जी मंडळी मंबाजीकडे जात होती , ती आता फारच कमी झाली. त्यामुळे तर मंबाजीचा क्रोध आणखीनच उफाळून आला व त्याने तुकोबारांचा सूड उगवण्याचे मनोमन ठरवले. विशेष म्हणजे मनामध्ये एवढा द्वेष असून , लोकलज्जेस्तव तुकोबारायांच्या कीर्तनाला तो पुढे जाऊन बसत असे. मंबाजीचे वास्तव्य मंदिराला लागूनच होते.
तिथे त्यांनी बाग-बगीचा केला होता. एक दिवस तुकाराम महाराजांची म्हैस चुकून त्यांच्या बागेत शिरली व तिने झाडांची नासधूस केली. दुसरी कुणाची म्हैस असती , तर कदाचित मंबाजीने सहन केले असते , पण ती म्हैस तुकोबारायांची असल्याचे कळल्यामुळे नाना तऱ्हेचे अपशब्द वापरून त्यांनी भरपूर तोंडसुख घेतले. या घटनेमुळे मंबाजीच्या सूडबुद्धीला खतपाणीच मिळाले. पुढे आलेल्या एकादशीचा दिवस गाठून मंबाजीने देवळाच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर मुद्दाम काठ्या रोवून प्रदक्षिणेचा मार्ग बंद केला.
नित्याप्रमाणे तुकोबाराय देवदर्शन घेऊन प्रदक्षिणेकरता बाहेर पडले , तेव्हा त्यांना वाटेवरच्या काठ्या दिसल्या. तुकाराम महाराजांनी त्या काठ्या उपटून मार्ग मोकळा केला. मंबाजी गोसाव्याने हे बघितल्यावर त्याचा क्रोध ज्वालामुखीसारखा त्याच्यातून प्रगट झाला. सापाच्या शेपटावर पाय पडल्यावर तो जसा फणा काढतो , तसेच हा ब्राह्माण गोसावी तुकोबारायांवर द्वेषाचे फुत्कार टाकायला लागला व काठी घेऊन तुकोबारायांवर धावत गेला.
एवढेच नव्हे , तर त्याने तुकोबायांना सपासप मारायला सुरुवात केली. इतक्या जोर-जोराने मारले की , हातातल्या काठ्या एकामगोमाग पिंजल्या जात होत्या. तुकोबारायांवर प्रहार करण्यासाठी नव्या दमाने नव्या काठ्या उपटल्या जात होत्या. अशा दहा काठ्या मोडून पडल्या , पण मंबाजीचा हात थांबला नाही. तुकोबाराय म्हणजे धैर्याचा डोंगर , सहनशक्तीचे मेरू , मूतिर्मंत शांती-ब्रह्मा! ते जागेवरून हलले नाहीतच ; पण मुखातून एकही अपशब्द न काढता चित्तामध्ये व मुखामध्ये विठ्ठलाचे नाम होते व अंत:करणात मंबाजीबद्दल करूणाच प्रसवत होती. मंबाजी ब्राह्माण कुळामध्ये जन्माला आला होता , पण वृत्ती मात्र आसुरी होती.
तुकाराममहाराजांनी त्याला काहीही न बोलता निमूटपणे त्याचा अत्याचार सहन केला. शेवटी तो जेव्हा मारून मारून थकला तेव्हाच थांबला व आपल्या घरी निघून गेला. तुकाराम महाराज लंगडत , कण्हत तसेच देवाजवळ आले व म्हणाले , " पांडुरंगा , मला काठीने मारवलेस , हे फार बरं केलंस. माझी क्षमाशील वृत्ती जतन केलीस , याचा मला आनंद आहे. तसेच शिवीगाळी करून माझी खूप विटंबना झाली , तरी मला क्रोधापासून सोडवलेस , याबद्दल हे कृपासागरा , विठुराया तुझे किती गुणगान गाऊ ?" तुकोबारायांच्या अंगात काटे मोडलेले पाहून सज्जनांच्या डोळ्यांना धारा लागल्या. भक्तप्रेमळ तुकोबारायांना इतका त्रास देताना त्या दुष्टाला काहीच कसे वाटले नाही , असे त्यांना राहून-राहून वाटत होते. तितक्यात जिजाबाईंना ही बातमी कळली आणि त्या धावतच तेथे आल्या. तुकोबारायांच्या अंगावरचे वळ बघून त्यांना राग आला. मंबाजीवर तोफ न डागता थेट पांडुरंगाला शिव्या देत एक-एक काटा काढू लागल्या. पांडुरंगाने तुकोबारायांकडे प्रेम दृष्टीने पाहिले आणि त्यांच्या शरीराची सर्व क्षते नाहीशी होऊन सगळ्या व्यथा दूर झाल्या.
'स्वप्नी तेही नाहीं चिंता'
एकदा तुकोबाराय असेच मंदिरामध्ये कीर्तन करीत होते. जिजाई व सर्व मुलेबाळे घरात झोपली होती. ही वेळ साधून दोन चोर तुकोबारायांच्या घरात शिरले आणि गोठ्यामध्ये जी दुभती म्हैस बांधलेली होती , तिला सोडून ते ओढतच घेऊन निघाले. गावाबाहेरील थोड्या अंतरावर असलेल्या बोडक्याच्या वाडीजवळ आले.
तेव्हा श्रीहरीच्या लक्षात आले की , तुकोबाराय कीर्तनात रंगून गेले आहेत , तर जिजाई तुकोबारायांना बोलून त्रास दिल्याशिवाय राहणार नाही , असा विचार करून पांडुरंगाने अक्राळ-विक्राळ रूप घेतले व हातात दंडुका घेऊन चोरांचा रस्ता अडवून उभा राहिला. ते भयानक रूप पाहून चोर घाबरले.
त्यांच्या मनात आले , एवढे मोठे घबाड आपल्या हाती लागले असताना , हे भूत कुठून उपटले ? आता आपल्या नशिबाची काय गती आहे कोणास ठाऊक ? मग ते आपला जीव वाचवायला दुसऱ्या वाटेने जाऊ लागले , तर त्याही रस्त्यावर सोटा घेऊन पंढरीनाथ उभा राहिला. त्यांनी पळून जाण्याकरता ज्या दिशेला तोंड फिरवावे , त्या दिशेला हा काळपुरुष त्यांचा समाचार घेण्याकरता त्यांची वाट पाहत उभा ? त्यांनी असा विचार केला की , ' आता पहाट होण्याची वेळ आली , दिवस उजाडल्यावर तर आपल्यावरच भलतेच संकट येईल.
त्यांच्या मनात आले , तुकोबाराय पांडुरंगाचे भक्त आहेत , म्हणूनच हा दंडुकाधारी काळपुरुष आपल्या मागे लागला आहे. आपल्या हातून तुकोबारायांची म्हैस चोरून नेण्याचा अपराध तर घडला आहे. आता याला एकच उपाय आहे की , म्हैस तुकोबारायांच्या घरी परत नेऊन बांधावी. याशिवाय आपली सुटका नाही. म्हणून त्यांनी ती म्हैस नेऊन तुकोबारायांच्या वाड्यात बांधली आणि गावाबाहेर पळून जाण्याचा ते प्रयत्न करू लागले. तेव्हा त्यांना समोर आपला मृत्यू उभा राहिल्याचे दिसले. तेव्हा चोरांना , महाराजांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. म्हणून ते चोर देवळात तुकोबारायांच्या कीर्त-नात येऊन त्यांचे पाय धरून क्षमा मागू लागले व त्यांनी प्रांजळपणे तुकोबारायांना सांगि-तले , " आम्ही चोर आहोत , तुमची म्हैस आम्ही चोरून नेली होती पण एका अक्राळ-विक्राळ काळपुरुषाने दंडुका घेऊन आमची वाट अडवली. तो आम्हाला गावाबाहेर जाऊन देईना. आता आम्ही आपली म्हैस आपल्या घरी परत नेऊन बांधली आहे. तरीही तो आम्हाला गावाबाहेर जाऊ देत नाही म्हणून आपल्याकडे आम्ही धावत आलो आहोत. आता तुम्हीच आम्हाला यातून सोडवा. " तुकोबारायांना हा सर्वच प्रकार ऐकून खूप आश्चर्य वाटले. त्यांच्या संतहृदयामध्ये चोरांच्याबद्दल यत्किंचितही विकल्प आला नाही. तुकोबाराय डोळे झाकून पांडुरंगाची मूतीर् ध्यानात आणू लागले तो त्यांना कीर्तनात प्रभूची उपस्थिती काही दिसेना. हे जाणून तुकोबारायांनी श्रीहरीचा धावा सुरू केला व ते म्हणाले , " हे सख्या पांडुरंगा! आता मी तुला काय म्हणावे ?
आम्ही देवळात येऊन तुझ्यासमोर कीर्तन करावे आणि तू मात्र काठी घेऊन चोरांच्या पाठीमागे लागावे ? हे करूणाकरा! तुला जर देऊळ सोडून बाहेर फिरावंसं वाटतं , तर आम्ही इथे कोणासाठी कीर्तन करावं बरं ? तेव्हा आता पहाट होऊन तुमच्या आरतीची वेळ झालेली आहे , आता तरी लौकर देवळांत या. " तुकोबारायांचा धावा ऐकून पंढरीनाथ त्वरित देवळात आले. देव देवळात आलेले पाहताच तुकोबाराय चोरांना म्हणाले , ' आता देव इथे आले आहेत. तरी तुम्ही निवांत म्हैस घेऊन जा. ' आपले प्राण वाचले हेच फार झाले , असे म्हणून ते वाऱ्यासारखे तिथून पळत सुटले. भगवद्भक्ताचा लोक जसजसा छळ करतात किंवा त्याची निंदा करतात तसतशी त्यांची कीतीर् अधिकच वाढवत असतो. त्यामुळेच तर सत्याला महत्त्व प्राप्त होते. वाईटामुळेच तर चांगले या जगामध्ये उठून दिसते. तुकोबारायांचा नावलौकिकही अशा तऱ्हेने उलट-सुलट घटनांतून वाऱ्यासारखा चहूकडे पसरत होता. सज्जनांना त्याचा आनंद वाटत होता , पण मंबाजीसारख्या दुर्जनांना त्याचा विषाद वाटून त्यांच्या मनातील द्वेष , मत्सर मात्र फोफावत होता.
दंडवत चरणा तुमच्या देवा
श्रीतुकोबारायांनी आपले अभंग इंदायणीच्या डोहामध्ये बुडवावेत ही रामेश्वरभटांची जीवघेणी आज्ञा ऐकून जे आयुष्यभर जतन केले , त्या प्रेमजीवनाचा अंत आपल्या डोळ्यांनी पाहण्याचे दुर्भाग्य आपल्या वाट्याला आले , असेच तुकोबारायांना वाटले. आपल्याच मुलाच्या नरडीचा घोट आपणच घ्यावा , अशीच महाराजांची विव्हल अवस्था झाली.
रक्तबंबाळ झालेल्या अंत:करणाने वाघुलीहूनी देहूकडे वाटचाल करताना , प्रत्येक पावलागणिक तुकोबाराय विठुरायाची करुणा भाकत होते. तसा विचार केला , तर तुकोबारायांचे अभंग बुडवण्याची आज्ञा करण्याचा अधिकार रामेश्वरभटांना कुणी दिला होता ? ते उच्च कुळात जन्माला आले असतील , वेदशास्त्रसंपन्न असतील , पण याचा अर्थ असा नव्हे की , या जगामध्ये अध्यात्म प्राप्त करून घेण्याचा व ते लोकांना देण्याचा अधिकार केवळ त्यांच्याकडेच जातो.
ही दिली गेलेली आज्ञा चुकीची असूनसुद्धा तुकोबारायांनी देहूला येऊन , रामेश्वरभटांच्या आज्ञेप्रमाणे अभंगांच्या वह्यांना दगड बांधून त्या इंदायणी नदीच्या डोहामध्ये आपल्या हातांनी बुडवल्या. त्या वहीच्या पानापानावर तुकोबारायांचे जीवनानुभव चित्रित झाले होते. अभंगा-अभंगात त्यांनी आपला भाव ओतला होता. त्यातल्या शब्दाशब्दात त्यांच्या हृदयाची स्पंदने उमटली होती.
काय वाटले असेल तुकोबारायांना त्या वेळी ? ती कविता म्हणजे त्यांची अवघी सुखदु:खे आपल्या ठिकाणी सामावून घेणारी त्यांची परम सखीच होती! तिचाही त्याग करायचा ? केवढा घोर प्रसंग! मला तर असे वाटते की , तुकोबारायांच्या वह्या बुडवल्या नाहीत , तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने जगातला परमार्थच बुडवला- या घटनेने जे भाविक होते , त्यांचे मन मात्र हळहळू लागले.
कुटिलांना मात्र खूपच आनंद झाला. ते म्हणू लागले की , " मोठा कवित्व करायला निघाला. त्या जोरावर लोकांत स्वत:चे श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण बरे झाले रामेश्वरभटांनी योग्य वेळी त्याची चांगली खोड मोडली. रामेश्वरभट हे विद्वान ब्राह्माण आहेत. ते प्रतिसूर्य आहेत. त्यांच्यापुढे या काजव्याचा काय टिकाव लागतो ?"
मंबाजीला तर हर्षवायूच होणेच बाकी राहिले होते. तुकोबारायांनी मात्र जे घडले ती भगवंताची इच्छा म्हणून रामेश्वरभटांबद्दल यत्किंचितसुद्धा राग , द्वेष , मत्सर ठेवला नाही. तुकोबाराय देवाला म्हणाले , " प्रभू , रामेश्वरभटांच्या मुखाने तूच बोललास आणि माझ्या कवितेचा बोलवता धनीही तूच , त्यात माझे काहीच नाही , मग मी खेद तरी का करू ?" अशा प्रेमभावाने पाच दिवस अहोरात्र अन्नपाण्याशिवाय करुणावचनांनी त्यांनी प्रभूला आळवले.
त्या वेळी काही कुटिल ब्राह्माण मंडळी आणि इतर ग्रामस्थ मिळून तुकोबारायांना मुद्दाम भेटायला आले. हे भेटणे प्रेमापोटी नव्हे , तर दु:खावर डागण्या देण्यासाठी होते! तुकोबारायांची तऱ्हेतऱ्हेने निंदानालस्ती करून ते म्हणाले , " मागे सावकारीची खते बुडवली तेव्हा स्वत:च्या हातांनी तुम्ही प्रपंच बुडवला आणि मग अनुतापाने परमार्थ करू लागला आणि आता जे कवित्व केले तेही तुम्ही स्वत:च्याच हातांनी बुडवले.
तेव्हा आम्हाला असे वाटते की , आता तुमच्या जगण्यात तरी काय अर्थ आहे ?" या कुटिलांचे हेही मर्मभेदी बोलणे तुकोबारायांना योग्यच वाटले. तुकोबारायांचे अंत:करण इतके सरळ की ते म्हणाले , " होय मायबाप. तुम्ही म्हणता ते खरंच आहे. " आणि महाराजांनी अन्नपाणी र्वज्य केले. देवालयाच्या समोर एका शिळेवर ते धरणे धरून बसले आणि पांडुरंगाला आळवू लागले.
कोण आम्हा पुसे शिणले भागले। तुजवीण उगले पांडुरंगा।। कोणापाशी आम्ही सांगावे सुखदु:ख। कोण तहानभूक निवारील।। कोण या तापाचा करीत परिहार। उतरील पार कोण दुजा।। कोणापें इच्छेचें मागावें भातुकें। कोण कवतुकें बुझावील।। कोणावरी आम्ही करावी हे सत्ता। होईल साहाता कोण दुजा।। तुका म्हणे अगा स्वामी सर्वजाणा। दंडवत चरणा तुमच्या देवा।।
" पांडुरंगा , आमच्यासारख्या शिणल्या-भागल्या जीवांची तुझ्याशिवाय कोण विचारपूस करेल ? आमची तहान-भूक कोण निवारण करेल ? आमचे सुखदु:ख आम्ही तुझ्याशिवाय कोणाला सांगावे ? मायबापा , तुझ्याशिवाय आम्ही कोणाजवळ कौतुकाने काही मागावे ? आम्ही कोणावर सत्ता गाजवावी ? पांडुरंगा , तू जाणणारा आहेस. म्हणून मी तुझीच करुणा भाकत आहे , तुला दंडवत घालत आहे. "
तुकोबारायांची ही करुणार्त वचने पांडुरंगाच्या जिव्हारी जाऊन भिडली आणि तुकोबारायांच्या चित्ताचा जो असह्य दाह झाला. त्याची झळ मात्र आता हळूहळू रामेश्वरभटांच्या दिशेने सरकू लागली. एका परमपवित्र भक्तजीवनाचा अतोनात छळ केल्याकारणाने रामेश्वरभटांची जी पुण्याई होती ती मात्र संपुष्टात आली.
संतांचा महिमा तो बहु दुर्गम
तुकाराम महाराजांच्या लोहगावातील चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर ते देहूगावी परत आले. त्या काळातच चिंचवडचे श्री. चिंतामणी देव हे भीमाशंकराच्या यात्रेला निघाले असता , ते देहूगावी आले. तुकोबारायांनी चिंतामणी देवांचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. एकमेकांना परस्परांच्या भेटीने आनंद झाला.
तेव्हा चिंतामणी तुकोबारायांना म्हणाले , ' तुकोबाराया , आपण महान भगवत्भक्त आहात. तरी आपल्या हातून काहीतरी प्रसाद मिळावा अशी आमची इच्छा आहे. ' त्यांची इच्छा ऐकून तुकोबारायांनाही समाधान झाले आणि त्यांनी एका माणसापुरते जेवणाचे साहित्य प्रसादासाठी आणले. तुकोबारायांनी प्रसाद आणला हे पाहून बाकीचे यात्रेकरूही म्हणू लागले की , ' आम्हालाही प्रसाद द्या ,' प्राप्त प्रसंगाची जाणीव होऊन तुकोबारायांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला.
' पांडुरंगा , तूच या प्रसंगातून आता मला सोडव ,' तुकोबारायांवर सतत प्रेमाची पाखर घालून त्यांचे रक्षण करणारे विठुराय तेथे गुप्तरूपे आले आणि ' एकाचे साहित्य पदरी होते । ते वाटितां पुरे सकळांसी ।। ' ही अघटित करणी पाहून चिंतामणी देवांना विस्मय वाटला. ते मनात म्हणू लागले , ' या ठिकाणी रिद्धी-सिद्धी तर प्रकट झाली नाही. मग सर्व साहित्याची पुरवणी कशी झाली ?' हा सारा प्रताप तुकोबारायांचा हे जाणून त्यांनी तुकोबारायांना आलिंगन दिलं आणि दिलेल्या साहित्यातून पाकसिद्धी केली. महाराजांच्या पंक्तीचा लाभ घेतला. तुकोबारायांचे कीर्तन ऐकण्यासाठी तेथे मुक्कामही केला आणि दुसरे दिवशी भीमाशंकरकडे प्रस्थान केले. याच सुमाराला दुसरा एक ब्राह्माण अलकापुरीला गेला. त्याने ज्ञानोबारायांकडे दारिद्य निवारणार्थ धरणे धरले. तेव्हा ज्ञानोबारायांनी त्यांना स्वप्नामध्ये तुकाराम महाराजांकडे जाण्याची आज्ञा केली , ब्राह्माणाने तुकोबारायांकडे येऊन स्वप्नाबद्दल वृत्तान्त सांगितला. दारिद्याची चिंता ऐकून तुकोबारायांच्या चित्ताला फार त्रास झाला. ते पांडुरंगाला म्हणाले , " ही उपाधी तू माझ्या मागे का बरे लावलीस ? माझ्या अंगी काही रिद्धी-सिद्धीची कळा नाही. पण ही मंडळी मात्र सांसारिक अडचणी घेऊन सारखी माझ्याकडे येऊ लागली आहेत ," तुकोबाराय त्या ब्राह्माणाला म्हणाले , " तू शिवजी कासाराकडे जा आणि तो देईल ते घेऊन ये ," ब्राह्माणाची हकिकत ऐकून शिवजी कासार चकित झाले. त्यांनी ब्राह्माणाचा आदरसत्कार केला आणि लोखंडाच्या चार शिगा त्याच्या डोक्यावर ठेवल्या आणि त्या तुकोबारायांना दाखव असे सांगितले. ब्राह्माण ते लोखंडाचे ओझे घेऊन निघाला आणि मनात म्हणाला , आपण गरिबी घालवण्यासाठी अनुष्ठान केले काय आणि हे डोक्यावर लोखंडाचे ओझे आले काय ? चालता-चालता थकवा आला म्हणून त्याने ओझे कमी करण्यासाठी तीन शिगा वाटेतच टाकल्या आणि केवळ आज्ञा म्हणून एक सळी डोक्यावर घेऊन तुकोबारायांकडे आला आणि त्यांची एकांतात भेट घेतली. तुकोबारायांनी विचारले , " तुला शिवजी कासाराने काय दक्षिणा दिली ?" तेव्हा ती लोखंडाची सळी त्याने तुकोबारायांसमोर ठेवली आणि अघटित घडले. कारण ती सळी लोखंडाची नव्हती तर बावनकशी सोन्याची होती. तुकोबारायांनी त्याला म्हटले , ' बाबा , हा ज्ञानोबारायांचा प्रसाद आहे. कुणाला सांगू नकोस. तो तू घरी घेऊन जा. ' एका सळीचे सोने झालेले पाहून ब्राह्माणाला मात्र टाकलेल्या तीन सळ्यांची आठवण झाली. तो लगबगीने निघाला आणि जिथे सळ्या टाकल्या होत्या तिथे आतुरतेने आला ; पण पाहतो तो तिथे त्या सळ्यांची नामोनिशाणीही शिल्लक नव्हती. जेवढे प्रारब्धात होते तेवढेच मिळाले असे मानून तो अखेर माघारी परतला. तुकोबारायांच्या दृष्टीस्पर्शाने परिसासारखे या लोखंडाचे सोने केले. असे वाटते की , या अनुभवाने त्या ब्राह्माणाच्या संसाराचेही सोने झाले असेल , आणि त्या जड लोखंडाप्रमाणेच त्या ब्राह्माणाच्या जीवनाचे सोने झाले असेल. एकदा मुळा-भीवरेच्या संगमावर स्नान करण्यासाठी तुकोबाराय निघाले असताना , रस्त्याने जाताना एक पिसाळलेला कुत्रा त्यांच्या अंगावर धावून आला. त्या कुत्र्याने तिथे अनेकांना त्रास दिला होता. काही लोकांनी त्यांना याची कल्पनाही दिली होती पण तुकोबारायांचे चित्त निविर्कल्प आणि निवैर्र असल्यामुळे त्यांना त्या कुत्र्याची भीती वाटली नाही. ते कुत्र्याला म्हणाले , " आम्हापासी गुरुगुर नाही । तू आपुले देही धरिसी का " तुकोबारायांनी असे म्हणताच ते कुत्रे शांत झाले. काही वेळेला आपल्याला वाटते की हे असे कसे घडले असेल ?
संत तेचि संत
जगद्गुरू तुकोबारायांचा महिमा वाढवण्याकरता श्रीहरीने वह्या तारण्याचा चमत्कार घडवून आणला. निळोबा महाराज संतांची लक्षणे सांगताना म्हणतात ,
तेचि संत तेचि संत। ज्यांचा हेत विठ्ठलीं।नेणती कांहीं टाणाटोणा। नामस्मरणावाचुनी।।
टाणाटोणा करतात , अंगारा , धुपारा देतात , त्यांना वारकरी संप्रदायाच्या परंपरेत कोठेच स्थान नाही ; कारण इतर मंडळींची साधना ही केवळ रिद्धीसिद्धी प्राप्तीकरता असते आणि त्या रिद्धिसिद्धीच्या आधारे लोकांच्या वर वर्चस्व स्थापून त्यांचे शोषण करणे हाच त्यामागील हेतू दिसतो. त्यात लोककल्याणाचा अभावच दिसून येतो आणि म्हणूनच या रिद्धीसिद्धीचा उपयोग काही काळापर्यंतच होतो , मग त्यांचे सत्त्व कमी कमी होत जाते. पुण्याची पाउटी सरल्यानंतर जसे स्वर्गातून खाली हाकलून दिले जाते , तसे रिद्धिसिद्धीचा अनाठायी उपयोग केल्यामुळे त्यांचे सत्त्व कमी होते. मग लोकांना उलटे अनुभव येऊ लागतात. त्यामुळे ते म्हणू लागतात , महाराजांकडे पूवीर् ताकद होती. पण आता काही तसे शिल्लक राहिले नाही. म्हणून प्राप्त झालेल्या शक्तीचा कशासाठी उपयोग करायचा हे जर कळले नाही तर ज्या रिद्धिसिद्धीने त्यांना यश प्राप्त झाले , तीच रिद्धिसिद्धी त्यांच्या नाशाला कारणीभूत होते.
जारण-मारण , उच्चाटण करणारे मांत्रिक सूर्यग्रहण , चंदग्रहण या काळात खूप कठोर साधना करत असतात. त्यांच्या मनासारखा मोबदला त्यांना मिळाला की , ज्या व्यक्तीचा आपला संबंध नाही , त्याचे वाईट करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. पण अशा माणसांचा शेवट अत्यंत वाईट होतो , अशी कित्येक उदाहरणे पाहायला मिळतात. पण संत जी नामसाधना करीत असतात ती सर्वश्रेष्ठ असल्यामुळे रिद्धिसिद्धी त्यांच्या दारात हात जोडून उभ्या असतात.
आवडेल जीवा जीवाचिये परी। सकळा अंतरीं एक भाव।।तुका म्हणे कृपा केली नारायणें। जाणिजे तें येणें अनुभवें।।
रामेश्वरभटांनी तो अभंग हातात घेतल्याबरोबरच , त्यांची निम्मी व्यथा कमी झाली आणि अभंगातील ' होतील शीतळ अग्निज्वाळा ' हे चरण वाचल्याबरोबर त्यांच्या अंगाचा संपूर्ण दाह कमी झाला आणि त्यांना अंतर्बाह्य शीतलता प्राप्त झाली. हा आगळावेगळा अनुभव रामेश्वरभटांनी स्वत:च अतिशय प्रांजळपणे आपल्या अभंगात व्यक्त केला आहे. तो मुळातूनच पाहण्यासारखा आहे. ते सांगतात ,
माझी मज आली रोकडी प्रचित। होऊनि फजित दु:ख पावें।।कांहीं द्वेष त्याचा करितां अंतरीं। व्यथा या शरीरीं बहुत जाली।।ज्ञानेश्वरें मज केला उपकार। स्वप्नीं सविस्तर सांगितले।।तुका सर्वांश्रेष्ठ प्रिय आम्हां थोर। कां जे अवतार नामयाचा।।त्याची तुज कांहीं घडली रे निंदा। म्हणोनि हे बाधा घडली तुज।।आतां एक करी सांगेन तें तुला। शरण जाई त्याला निश्चयेशीं।।दर्शनेचि तुझ्या दोषा परिहार। होय तो विचार सांगितला।।तोचि हा विश्वास धरूनि मानसी। जाय कीर्तनासी नित्यकाळ।।म्हणे रामेश्वर त्याच्या समागमें। जालें हे आराम देह माझें।।
अंगाचा दाह अशा प्रकारे शमल्यानंतर रामेश्वरभट तुकोबारायांच्या दर्शनाला निघाले. तुकोबारायांना हे कळल्यानंतर महाराज स्वत: होऊनच त्यांना भेटण्यासाठी निघाले. महाराजांचे मन किती निर्मळ , मृदुमधुर , द्वेष-मत्सररहित होते याची साक्ष या घटनेतून सहज पटावी. महाराजांना वाटले रामेश्वरभट उच्चवणीर्य , विद्वान ब्राह्माण. मग त्यांनी आपल्यासमोर यावे आणि दहा माणसांत शरण येऊन आपले पाय धरावे हे योग्य होणार नाही. तेव्हा आपणच गावाबाहेर जाऊन त्यांना भेटावे.
अर्ध्या रस्त्यांतच रामेश्वरभटांची व तुकोबारायांची भेट झाली. महाराजांना पाहून त्यांचा सूक्ष्म असा जो वर्णाभिमान तोही पूर्ण नाहीसा झाला आणि त्यांनी महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातले. तेव्हा ते म्हणाले , " तुकोबाराय , आपण पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त असून , महावैष्णव आहात. " तुकोबाराय म्हणाले , " मला काही कळत नाही. मी हीन यातीमध्ये , हीन कुळात जन्माला आलो. " त्या वेळी रामेश्वरभट म्हणाले , " वैष्णवाची याती वाणी जो आपण। भोगी तो पतन कुंभपाकीं। ' ते पुढे म्हणतात ,
उंच निच वर्ण न म्हणावा कोणी। जें का नारायणीं प्रिय जालें। चहूं वर्णांसी हा असे अधिकार। करिता नमस्कार दोष नाहीं। आणि शेवटी सांगतात , ' म्हणे रामेश्वर नामीं जे रंगले। स्वयेंचि ते जाले देवरूप। ' त्या वेळेस तुकोबारायांचे चरण धरून रामेश्वरभटांनी त्यांची खूप स्तुती केली व उर्वरित आयुष्य तुकोबारायांच्या संगतीतच काढण्याचा निश्चय त्यांनी केला.
पिठाच्या मुठीने कोटमा भरला
आपण दिलेल्या शापामुळे रामेश्वर भटांच्या अंगाचा जो दाह झाला , तो त्यांचा दाह तुकोबारायांच्या अलौकिक अभंगवाणीने व प्रसादाने शमला आणि ते शापमुक्त झाले , हे ऐकून अनगडशहाला विस्मयही वाटला आणि रागही आला. अनगडशहाला रिद्धिसिद्धी प्राप्त होती ; पण तुकाराम महाराज रिद्धिसिद्धीच्या वाऱ्यालाही कधी उभे राहिले नाहीत. ज्याच्या घरामध्ये अध्यात्माच्या खाजिन्यातली अनमोल रत्ने खच्चून भरली होती , तो क्षणभंगूर चमकणाऱ्या काचेच्या खड्यामागे का लागेल ? काही माणसांच्या जवळ स्वत:पुरतेच सोन्याचे , हिरे-मोत्यांचे अलंकार करण्याची श्रीमंती असते ; पण तुकाबारायांजवळ एवढी श्रीमंती होती , की ते तर नखापासून केसापर्यंत त्या प्रभूप्रेमाच्या राजैश्वर्याने लखलखत होतेच ; पण त्याबरोबरच ती तोलामोलाची रत्ने , हिरे , माणिके लाखो लोकांना दान करून , त्यांना तसेच अलंकृत करण्याचे सार्मथ्य त्यांच्यात होते. संसाराच्या परिपूर्ततेकरता त्यांनी रिद्धीसिद्धीसारख्या साधनांचा कधीच उपयोग केला नाही. काही वेळा असे मात्र घडत होते की , त्यांच्या स्मरणाने आणि त्यांच्यावर असलेल्या दृढ श्रद्धेमुळे सामान्य जीवाची आधी-व्याधी दूर होत होती.
आपल्याला शरण न येता रामेश्वरभटांचा दाह परस्पर ज्या तुकारामबुवांच्यामुळे शमला , त्यांचे दर्शन घ्यावे आणि हा काय प्रकार आहे ते एकदा समक्ष पाहावे , असे अनगडशहाला वाटले. लगेचच तो फकीर पुण्याहून देहूला जायला निघाला. जाता-जाता चिंचवडगावी प्रख्यात असे गणपतीचे ठिकाण आहे , तेथे जाऊन तो थांबला. तेथे त्याने देवाच्या द्वारी भिक्षा मागितली. आपला कोटमा पुढे करून तो भरून शिधा द्यावा , अशी मागणी केली. कोठीवरील कारभाऱ्याने पुष्कळ शिधा आणून त्यांच्या कोटम्यात घातला , तरी तो कोटमा भरेना. देवस्थानचे प्रमुख चिंतामणी देव यांना , सेवेकऱ्याने वस्तुस्थिती सांगितली. भरपूर शिधा वाढूनही , कोटमा भरत नाही , हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. तेव्हा चिंतामणी देवांनी , आपल्या सिद्धीच्या बळावर अनगडशहाचा कोटमा भरून दिला.
त्यानंतर अनगडशहा थेट देहू-मुक्कामी तुकाराम महाराजांच्या घरी पोहोचले. त्यांना आता तुकोबारायांची सत्त्वपरीक्षा घ्यायची होती. त्यांचे श्रेष्ठत्व जोखून त्याचे मोजमाप करण्याच्या पवित्र्यात ते होते. अनगडशहा जेव्हा तुकोबारायांच्या दारात येऊन उभा राहिला , त्यावेळी जिजाबाई स्वयंपाकघरात काम करीत होत्या. अनगडशहाची हाक ऐकून , जिजाबाई संतापून म्हणाल्या , " या मेल्या भिकाऱ्यांनी त्रास आणलाय. आम्हालाच आमच्या घरात भरपूर खायला नाही ; मग त्यांना कुठून भीक वाढावी ?" त्यावेळी त्यांनी आपली धाकटी कन्या गंगाबाई , हिला हाक मारली आणि सांगितले. " गंगा जा. त्या भिकाऱ्याला मूठभर पीठ वाढ. " आता ते लहानगे लेकरू. तिचे चिमुकले हात , इवलीशी मूठ ? तिच्यात पीठ ते किती मावणार ? पाची बोटांतून पीठ गळत गळत दारात फकिरापर्यंत जाईतोवर , चिमूटभर पीठच त्या हातात शिल्लक राहिले.
अनगडशहा बाहेर उभा राहून , हे सारे पाहात होता. गंगाबाईने कशीबशी आपली मूठ उघडून अनगडशहाच्या त्या पात्रामध्ये घातली आणि काय आश्चर्य ? अनगडशहाचा कोटमा संपूर्ण भरून , त्यातील पीठ ओसंडून बाहेर सांडू लागले. हा अलौकिक अनुभव घेऊन अनगडशहा विस्मित झाला. तो तुकोबारायांना धडा शिकवायला आला होता ; पण त्याला स्वत:लाच धडा मिळाला. तोही तुकोबारायांच्या भेटीपूवीर्च आणि तोही तुकोबारायाच्या लेकराकडून ? आता तो गंगाबाईला विचारू लागला. " अगं , तुझेच नाव तुकोबा काय ?" गंगाबाई म्हणाली , " असे वेड्यासारखे काय बडबडतोस ? मी तुकोबा नाही , मी तुकोबारायांची मुलगी आहे. माझे बाबा , आताच स्नान करून पांडुरंगाच्या देवळात गेले आहेत. " अनगडशहाला वाटले , कन्येचे सार्मथ्य एवढे , तर पित्याचे सार्मथ्य केवढे असले पाहिजे. या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे , की हा काही तुकोबारायांनी केलेला चमत्कार नव्हे ; पण गंगाबाईनी घातलेल्या पिठाच्या चिमटीने , कोटमा भरला हे तर सत्य आहे. या सर्वांतून एवढाच आशय निघातो की , संतांचे श्रेष्ठत्व व थोरपण जगाच्या लक्षात विशेषत्वाने यावे , यासाठी देवच हा खेळ खेळत होता.
तुकोबारायांना देवळात तरी येऊन पाहावे म्हणून अनगडशहा तेथे गेले. त्यांना त्या ठिकाणी परब्रह्मास्वरूप तुकोबारायांचे दर्शन घडले. तुकोबारायांची भक्तिप्रेमाने डवरलेली सगुण मूतीर् पाहून अनगडशहाला प्रेमाचे भरते आले. साष्टांग दंडवत घालून त्याने दोन दिवस तेथे मुक्काम केला आणि तुकोबारायांच्या संगतीमध्ये हरीकीर्तनाचा आनंद लुटला. तुकोबारायांशी सुख-संवादाचा आनंद घेऊन अनगडशहा आपल्या आश्रमी परत गेले.
म्हणोनि प्रीतीं नमस्कारिलें
तुकोबारायांच्या दर्शनाला सारा गाव लोटलेला पाहून दादोजी कोंडदेवही पूजेचे ताट घेऊन तुकाराम महाराजांच्या दर्शनाला लगबगीने निघाले. त्यावेळी फिर्याद दाखल करणारे दोन्ही संन्यासी त्यांना आडवे आले आणि म्हणाले , ' जिथे तुम्हीच दर्शनाला निघाला , तिथे आता न्याय मिळणे कठीणच. ' तेव्हा दादोजी म्हणाले , ' जर सर्व गावच तिकडे निघाला , तर आम्हालाही जाणे उचित आहे , क्रमप्राप्त आहे. आम्ही त्यांना तेथून बोलावून आणू. तुम्ही तुकोबारायांशी प्रतिवाद करा. तुम्ही हरलात तर तुमचीही गय केली जाणार नाही , याबद्दल तुम्हीही विचार करून ठेवावा. ' एवढे बोलून दादोजी तुकोबारायांकडे गेले , त्यांचे दर्शन घेऊन त्यांच्या कीर्तनालाही बसले. तुकोबारायांचे कीर्तन भक्तिप्रेमरसाने ओथंबलेले होते. त्यातून श्रीहरिच्या गुणलीलांचे वर्णन सर्व बारकाव्यांसह प्रगट होत होते. कीर्तनात रंगता-रंगता तुकोबारायांचा कंठ सद्गद्ति होऊन त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्रू पाझरू लागले. भक्तिप्रेमाला पूर येता-येता ही प्रेमरसाची गंगा दुथडी भरून वाहू लागली आणि कैलासपती गंगाधरच मूतीर्मंत स्वरूपात त्या कीर्तनात प्रकट झाले. महिपती त्यांचे वर्णन करतात , ' तेजें लखलखीत दिव्य कांती। त्यावरी चचिर्ली दिव्य विभूती। ' अशा त्या दिगंबर मूतीर्ने तुकोबारायाला प्रेमाने अलिंगन दिले व तुकोबारायाला म्हणाले , ' आपल्या दर्शनाची खूप इच्छा होती. ते मनोरथ आज पूर्ण झाले. ' असे प्रेमादराने बोलून कैलासपती निघून गेले. श्रोतेमंडळीत कोणी म्हणू लागले , हा दत्तात्रेय आहे. त्या दोन संन्याशांनी हा अनुभव घेतला आणि त्यांचीही मती थक्क झाली. तुकोबारायांच्या कीर्तनाचा रंग चढत , वाढतच होता. त्यात निखळ ब्रह्मारसच ओतलेला होता.
सर्व श्रोते त्या आनंदसमुदात न्हाऊन निघत होते. ' धन्य! धन्य! ' म्हणत होते. आनंदाच्या परमोच्च शिखरावर असताना ' जय विठ्ठल ' चा घोष करत कीर्तनाची सांगता झाली. आरती झाली. दादोजी कोंडदेव या अपूर्व अनुभवाने इतके प्रभावीत झाले की , त्यांनी तुकोबांनी नगरात यावे , अशी त्यांना विनंती केली. संन्याशांना वाटले , तुकोबारायांचा अपमान करावा , म्हणून हे केले. पण घडले उलटेच. तुकोबारायांची कीतीर्च दशदिशा पसरू लागली. दादोजींनी नगरात नेऊन त्यांची मोठ्या हवेलीत व्यवस्था केली.
दोन हजार लोकांची जेवणाची व्यवस्था केली. दुपारच्या कीर्तनाला सुरवात झाली. संन्याशांना प्रतिवाद करायला सांगितले. जो हरेल त्याला रासभावर बसवू , असे ठरवण्यात आले. संन्याशी म्हणाले , ' त्यात काय अवघड! तुकोबारायांना तात्काळ गाढवावर बसवू. त्यांनी काही कुटील मंडळींना पुण्याहून बोलावून घेतले. तुकोबारायांचा उत्कर्ष ज्यांना सहन होत नव्हता , अशी मंडळी तेथे जमू लागली.
पंडित आणि आध्यात्मिक वाद करण्यात निपुण असणारी मंडळी मुद्दाम बोलवण्यात आली. दोघे संन्याशी या समुदायाच्या आघाडीवर होते. तुकोबारायांच्या मनात मात्र ना द्वेष ना विकल्प. संन्याशांनी मात्र आपल्या संकुचित वृत्तीने आणि क्षुद वर्तनाने , होते ते पुण्यही गमावले. तुकोबाराय कीर्तनात हरिनामाची महती सांगत होते आणि विठ्ठल नामाचा गजर करीत होते आणि त्या दुथडी भरून वाहणाऱ्या भक्तिप्रेमरसाच्या पुरात संन्याशांच्या मनातली खोलखोल मूळ धरून बसलेली अहंकाराची झाडे कुठल्याकुठे वाहून गेली. ज्ञानाचा गर्वही त्याबरोबरच वाहून गेला. तुकोबारायांबद्दलच्या द्वेष , मत्सरांचा आता तिथे मागमूसही उरला नव्हता. दादोजी कोंडदेव म्हणाले , तुम्हीचि कैसे पायां पडतां। तरी मी शिक्षा लावीत आतां।। खोटेपण आलें तुमच्या माथां। न्याय विचारिता आम्हांसी।। त्यावर संन्यासी प्रांजळपणे म्हणाले , तुकयाच्या ठिकाणी आम्ही ' प्रत्यक्ष देखिली चतुर्भुजमूतीर्। म्हणोनि प्रीतीं नमस्कारिलें '. एवढे सारे घडले. हत्ती गेला तरी शेपूट उरलेच होते. कारण या साऱ्या प्रकारात मोकाशी मात्र संन्याशांवर संतप्त झाले आणि ' तुम्ही दुर्बुद्धी तुम्ही वेषधारी ' म्हणून त्यांची निर्भत्सना करू लागले. कारण दोन गाढवे आणण्यासाठी काही दव्य देण्या-घेण्याचा करार त्यांनी आधीच करून ठेवलेला होता. म्हणून ' मसाला लेवविला माझे करी ' तो कशासाठी ? असा रोकडा सवाल त्याने टाकला.
इतकेच नव्हे , तर पूर्तता करण्यासाठी अखेर दोन गाढवे त्याने आणून उभीच केली. संन्याशांच्या शिरी पाच पाट काढा आणि गाढवावर बसवून त्यांना नगरात हिंडवा , असा हट्टही त्यांनी धरला. आता सगळ्यांचीच पंचाईत झाली. पण या प्रसंगातही तुकोबारायांचे अमानित्व , त्यांची माणुसकी , त्यांची समदृष्टी नेहमीप्रमाणेच उचंबळून आली आणि या प्रकाराला त्यांनी निपटूनच टाकले. ते म्हणाले , ' संन्याशाच्या या वेषाची विटंबना होता कामा नये. माझ्या पंढरीरायाला हे मुळीच आवडणार नाही. ' या साऱ्या प्रकरणाचा असा गोड शेवट झाला आणि झाले गेले गंगेला मिळाले.
धन्य तुका वैष्णव प्रेमळ
एकदा तुकोबाराय चैत्र महिन्यात यात्रेला निघाले. कोथळेश्वर पर्वतावर शंकराचे जागृत देवस्थान होते , त्याच्या पायथ्याशी सिंगणापूर हे क्षेत्र होते. शिवशंकराला आधी नैवेद्य दाखवावा , भोजन घालूनच त्याचे दर्शन घ्यावे , अशी तुकोबारायांची इच्छा. त्यांच्या सोबत गंगाजी मवाळ आणि संताजी तेली होते.
चौघांचा स्वयंपाक केला. तोच मस्तकी जटाभार , अंगी विभूती , हातात तुंबा असे अतिथी झाले आणि ' आम्ही अतिशय भुकेलेलो आहोत , आम्हाला भोजन दे ' असे म्हणू लागले. अतिथी हा देव या श्रद्धेने त्यांचे ताट वाढले. अन्न गोड , त्याहीपेक्षा तुकोबारायांची सप्रेमभक्ती गोड. अतिथीने म्हणूनच सगळ्याच्या सगळ्या पाकसिद्धीचे आवडीने सेवन केले आणि ' होईल कल्याण तुकड्या तुझें ' असा आशीर्वाद दिला. सगळे अन्न संपलेलेे , आता पुन्हा स्वयंपाक करण्यासाठी गावातून शिधासामुग्री आणली. स्वयंपाक करावा लवलाहे। गंगाजी भांडी घेऊनि उघडिताहे।। तों अन्न तयांत भरिलें आहे। अवघेचि ठाव परिपूर्ण।। असा अद्भुत अनुभव आला. स्वयंपाक केलेली रिकामी भांडी , पूर्णतया भरलेली पाहून सर्वांनी खुणगाठ बांधली , ' अतिथीरूपें जेविला कैलासपती। साक्षात् दर्शन झाले निश्चिती. ' तो जेवून तृप्त झालेला अतिथी म्हणजेच कैलासपती याचा आनंद तुकोबारायांच्या सोबत्यांना झाला आणि हे फळ संतांची संगत धरल्याचे हेही त्यांना पटले. अशा लहान- मोठ्या किती घटना सांगाव्यात ? एक ब्राह्माण भाविक तुकोबारायांच्या कीर्तन-प्रवचनांनी इतक भारावला , की तो प्रपंचत्याग करतो की काय अशी त्याची अवस्था झाली. त्याच्या देखण्या पत्नीच्या मनात यामुळे तुकोबारायांबद्दल द्वेष निर्माण झाला. ' ज्याने माजा पती वेडा केला त्याचीच परीक्षा मी घेणार ', असे तिने ठरवले. पती परगावी गेला असताना तुकोबारायांना भोजन घालण्यासाठी तिने मुद्दाम कडू भोपळा रांधला आणि मंदिरातच तुकोबारायांना भोजन दिले.
इकडे तुकोबारायांची वृत्तीच जगावेगळी. ' रसना जिंतोनी वैष्णवभक्त। इंदिया नेम केला निश्चित। कडू गोड न कळेचिं त्यातें। विदेहस्थिती म्हणोनी। ' तिने ते कडू अन्न पुन्हा पुन्हा वाढावे आणि तुकोबारायांनी ते खावे हे पाहून पंढरीनाथ मात्र क्षुब्ध झाले. त्याचा परिणाम म्हणजे ' तिच्या सर्वांगासी भलीं आवळ्यां ऐसीं गुलमें आली. ' ते फोड कोणत्याही औषधाने जाऊच नयेत अशी तिची दशा झाली. याच गावात सोमवारव्रत करणाऱ्या एका ब्राह्माणाने तुकोबांना भोजनाला बोलावले. ऐन भोजनप्रसंगी तिच्या घरातल्या दिव्यातील तेलच संपल्यामुळे ती चिंताक्रांत झाली. त्या वेळी प्रेमळ भक्त तुकोबा म्हणाले , " तुमच्या घरात बुधला रिकामा आहे म्हणता ? जरा पाहा. त्यात तेल असेल. तिने पाहिले तर ' स्नेह आंत बहु दिसे ' बुधल्यात भरपूर तेल होते , असे नवल वर्तले. ज्या व्यक्तीने तुकोबारायांचा स्नेह प्राप्त केला त्याचा बुधलाच काय त्याचे अवघे आयुष्यच स्निग्ध होऊन जाई. लोहगावात एका म्हाताऱ्या ब्राह्माण स्त्रीने तुकोबांना आपल्या घरी भक्तीभावाने जेवायला बोलावले. तिचा भाव पाहिला आणि तुकोबांनी ते आमंत्रण स्वीकारले. तिने दहा ब्राह्माणांच्या घरी काबाडकष्ट करून पैसा पैसा साठवला त्यातून भोजन. सामुग्री जमवली , पण भोजनाच्या दिवशीच मोठे संकट आले. धो धो पाऊस आला आणि शेजारच्या खोपटाची भिंत तिच्या घरावर कोसळणार अशी आणीबाणी ओढवली.
पाकसिद्धी झाली ; पण तुकोबारायांना अशा परिस्थितीत घरी बोलावणे धोक्याचे झाले. केवढा आटापिटा करून बेत केला. त्यावर पाणी पडणार म्हणून तिच्या डोळ्यांतूनच पाणी पाझरू लागले. ती भरल्या डोळ्यांनी तुकोबारायांकडे आली. त्यांनी तिला अभय दिले आणि आम्ही जेवल्याशिवाय भिंत पडणार नाही , असे नि:शंकपणे सांगितले आणि घडलेही तसेच! ' भिंत लवंडली। न पडेचि सत्य ' हे पाहून गावचे लोक मात्र आश्चर्य करू लागले. ती भिंत कोसळली ती तिने चीजवस्तू बाहेर काढल्यानंतरच. तुकोबारायांनी या अनिकेत म्हातारीला गावकऱ्यांना सांगून दुसरे घर देवविले. इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी रात्री मोठ्या आवडीने कीर्तनही केले. संत जाती ज्याचे घरीं। त्याची विघ्नें पळती दुरी।। सूदर्शन घेऊन श्रीहरि। नानापरी रसितसें।। धन्य तुका वैष्णव प्रेमळ। वैकुंठपाळ साह्य त्यासी।। असा अनुभव देणारे हे प्रसंग. त्यातून तुकोबारायांच्या जीवनातले अद्भुत समजते. त्याहीपेक्षा सर्व प्राणिमात्रांवर प्रेमाचा वर्षाव करणारे समदृष्टीने ओथंबलेले , कीर्तन- भजनात रंगलेले , देही असुन विदेही असणारे , लोकांचा आनंद वाढवून त्यांचे दु:ख निरसणारे , भक्तीची वाट दाखवून सर्वसामान्यांचाही प्रापंचिक आणि पारमाथिर्क उद्धार करणारे , लोकांत राहून , लोकांचा छळ सोसत , लोककल्याणासाठी तळमळणारे आणि लोकांवर लाभावीण प्रेम करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व उमजते हेही महत्त्वाचे!
उठोनि बैसे हरि कीर्तनीं
एकदा तुकाराम महाराज लोहगावला गेले. लोहगावकरांना तुकाराम महाराजांचे प्रेम असल्यामुळे कीर्तनासाठी भव्य मंडप उभारला. त्यांचा नावलौकिक जबरदस्त असल्यामुळे हजारो मंडळी कीर्तनाला उपस्थित राहिली. त्या गांवचे जोशी अत्यंत भाविक. तो तुकोबारायांच्या कीर्तनाला नित्य नियमाने उपस्थित राहत असे. त्याचा पुत्र मरणशय्येवर असतानाही ' जे होणार ते होणारच ' आपण कीर्तन का चुकवावे ? या निष्ठेने तो नेहमीप्रमाणे कीर्तनाला गेला आणि इकडे त्याच्या मुलाची प्राणज्योत मावळली.
ब्राह्माणाच्या पत्नीने आपल्या मुलाचे प्रेत कीर्तनात आणून ठेवले. ती म्हणाली , ' माझ्या मुलाला जिवंत करशील तरच तू खरा विष्णुभक्त. नाहीतर तू दांभिकच ठरशील. माझा पती तुझ्या भजनी लागला तेव्हापासून प्रपंचाची हानीच होत गेली. तुम्ही ' आपुल्या संसाराशी घातलें पाणी। तैशाचिवाणी आम्हां केलें ' ।। ' आपल्या संसाराच्या पाठोपाठ आमच्याही संसाराचे याने वाटोळे केले '. पक्वान्नात विष कालवावे तसे कीर्तनात विघ्न आले. श्रोत्यांच्या रंगलेल्या वृत्तीतही विक्षेप आला , भजनात विक्षेप हेच आमचे मरण , असे म्हणत तुकोबाराय भगवंताची प्रार्थना करू लागले. ' सुदर्शन चक्र घेऊन तू लवकर ये आणि संकटाचे निवारण कर नाहीतर मलाच इथे प्राण ठेवावे लागतील. ' असा धावा करताना त्यांचे नेत्र पाझरू लागले.
धावा ऐकताच पांडुरंग प्रगट झाले आणि म्हणाले , ' तुझ्याजवळ जी अमृतसंजीवनी आहे , तिचा कीर्तनात उच्च उच्चार कर , म्हणजे या मुलाचे प्राण वाचतील. ' आणि तुकोबारायांनी सर्व श्रोत्यांसह त्या अमृतसंजीवनीचा , त्या विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. प्रत्यक्ष नादब्रह्माच तिथे प्रगट झाले. देहभान विसरून सर्वच विठ्ठलमय झाले.
या नामाचा महिमा असा की , मृत बालकाचा श्वासोच्छ्वास सुरू झाला इतकेच नाही , तर ते बालक ' उठोनि बैसे हरि कीर्तनीं। भजन करी सप्रेमें करूनी ' आता ती माऊली तुकोबारायांच्या चरणाला लागली आणि सर्वांनीच विठुरायाचा आणि तुकोबारायांचा जयजयकार सुरू केला. तुकोबारायांचा नावलौकिक ऐकून त्यांच्या कीर्तनाच्या ठिकाणी दोन संन्याशी दाखल झाले. कीर्तनात तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला. नामच सर्व साधनांचे सार होय , नाम परात्पर परब्रह्माच होय. विवाहमंगल असो , की श्राद्धप्रसंग असो , नामस्मरण केल्याशिवाय त्याची सांगता नाही , असे निरूपण करीत त्यांनी पुन्हा विठ्ठल नामाचा गजर केला. त्या वेळी श्रोत्यांत बसलेल्या दोन्ही संन्याशांची कुश्चितपणे कुजबूज सुरू झाली , ' शूद मुखातून हरिनाम ऐकणे , हेही अशास्त्र आहे , म्हणून ते तेथून उठून निघाले. संन्यास स्वीकारताना मस्तकावरील शेंडी काढली खरी ; पण मनातला अहंकार मात्र दसपट वाढला होता. शिखा टाकीली बोडोनि। परी अहंता वाढली दशगुणी ' - महिपती हे संन्याशी तुकोबारायांबद्दल तक्रार घेऊन थेट पुण्यात दादोजी कोंडदेव यांच्याकडे गेले आणि त्यांनी तेथे फिर्यादच केली. दंड-कमंडलू जमिनीवर टाकून , मस्तक आपटून , आकांड-ंतांडव करून त्यांनी तुकोबारायांविरुद्ध तक्रारीचे गरळ ओकावयाला सुरुवात केली. ' तुका शुद जातीचा आहे , त्यांनी भाविक लोकांना मोहिनी घालून , नाममहात्म्य सांगून , सर्वांना नाम घ्यायला लावले आहे. भक्तिमार्गाचा प्रसार करून , त्यांनी कर्ममार्ग बुडवला आहे.
हा जातीचा शूद , पण ब्राह्माण त्याला नमस्कार करतात. ' ते दादोजींना म्हणाले , ' तुम्ही या प्रांताचे अधिकारी आहात. तुमच्याशिवाय आता आपल्या धर्माचे रक्षण दुसरा कोणी करू शकणार नाही , तुम्ही जर हे केले नाहीत तर आम्ही इथेच प्राण देऊ. ' त्यांचा तो निग्रह पाहून दादोजी कोंडदेव म्हणाले , ' तुम्ही स्वस्थ चित्ताने येथे बसा. तुकाराम महाराजांना मी येथे बोलवून घेतो. तुमचा त्यांचा प्रतिवाद होऊ द्या. जो हरेल त्याला आम्ही शिक्षा करू. ' लगेचच त्यांनी तुकोबारायांना बोलवायला दूत पाठवले. दादोजी कोंडदेवांचा निरोप मिळाल्यानंतर तुकाराम महाराज दिंडी समारंभाने दादोजी कोंडदेवांना भेटायला निघाले. त्या वेळी काही ब्राह्माण मंडळीही तिथे काय होते , ते प्रत्यक्षच पाहावे म्हणून निघाली. सर्वजण पुण्याला संगमावर येऊन थांबली व संध्याकाळी कीर्तनासाठी जमली.
तुकोबारायांचे कीर्तन आहे , हे कळताच पुण्यातील असंख्य लोक कीर्तनासाठी येऊ लागले. संगमावर जणू सैन्यच उतरले की काय , असे वातावरण दिसत होते. दादोजी कोंडदेवांनी म्हणूनच विचारले , ' हे सैन्य कोणाचे आहे ?' चौकशी करताच त्यांना कळले की , तुकोबारायांच्या कीर्तनाला आणि दर्शनाला आलेल्या लोकांची ही गदीर् आहे. हे कळताच दादोजी कोंडदेवांनाही आश्चर्य वाटले व तेही तुकोबारायांच्या दर्शनाला जाण्यास निघाले.
या वैष्णवांच्या घरी
आपल्याच हातांनी बुडवलेल्या आपल्या अभंगाच्या वह्या पांडुरंगाने जशाच्या तशा आपल्या पदरी घातल्या. या अनुभवाने तुकोबारायांचे हृदय थरारून गेले. ' हे देणे पांडुरंगाचे ' ही रोकडी प्रचिती त्यांना आली. हे आपले कर्तृत्व नसून ' मज विश्वंभर बोलवितो ' अशीच त्यांची अढळ श्रद्धा होती.
अभंगाच्या वह्या तरल्या म्हणून तुकोबारायांचे डोळे आनंदाश्रूंनी भिजले , पण तिकडे अलंकापुरीत अनुष्ठान मांडून बसलेल्या रामेश्वरभटांच्या अंगाचा दाह काही कमी होईना. ज्ञानेश्वर महाराजांची परोपरीने स्तुती करून ते त्यांची करुणा भाकत होते. त्यावेळेला त्यांना ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत देऊन सांगितले की , ' सर्व भक्तांमध्ये नामदेवराय हे श्रेष्ठ वैष्णववीर आहेत. तुकोबाराय हे त्यांचाच अवतार असून ते जगोद्धारासाठी येथे आले आहेत. त्यांची निंदा द्वेष हातून घडल्यामुळे तुझे सर्व सुकृत नष्ट झाले आहे. आता तुझ्या चित्तात अनुताप होऊन तू जर त्यांना शरण जाशील तरच तू या महाव्यथेतून मुक्त होशील!
माऊलींच्या अशा दृष्टांतामुळे रामेश्वरभटांचे डोळे खाडकन उघडले. त्याच वेळी वह्या तरल्याचीही वार्ता रामेश्वरभटांच्या कानी आली. त्यामुळे त्यांचे अपराधी मन त्यांना तुकोबारायांच्या समोर जाण्याचे धाडस करू देईना. मग प्रत्यक्ष समोर जाण्याऐवजी त्यांनी एक पत्र लिहून ते आपल्या विद्यार्थ्याजवळ दिले. तो विद्याथीर् तुकोबारायांना भेटला आणि रामेश्वरभटांच्या अंगाचा दाह कसा झाला त्याचा संपूर्ण वृत्तान्त त्याने महाराजांना सांगितला. ही करुण कहाणी ऐकून तुकोबारायांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी त्वरित रामेश्वरभटांना एक अभंग लिहून पाठवला.
चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती। व्याघ्रही न खाती सर्प तया।।विष ते अमृत आघात तें हित। अकर्तव्य नीत होत त्यासी।।दु:ख ते देईल सर्व सुख फळ। होतील शीतळ अग्निज्वाळा।।
ऋषीमुनींना जशी तपश्चयेर्ने वाचासिद्धी प्राप्त होत असते तशी साधूसंतांनासुद्धा नामसाधनेने आणि प्रभूच्या प्रेमभक्तीने तशीच वाचासिद्धी आणि अलौकिक सार्मथ्य प्राप्त होते. रिद्धीसिद्धीमध्ये लोकांच्या सांसारिक अडीअडचणी दूर करण्याची ताकत एकवेळ असेलही पण भक्तीप्रेमामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार करण्याची ताकत आहे. ' ऋषीमुनींनी वाणीचे सार्मथ्य प्राप्त झाल्यानंतर जसे आशीर्वाद दिले तसे अनेकांना शाप देऊन त्रास दिल्याचेही अनेक दाखले आहेत , पण संतांच्या बाबतीत संतांनी छळ करण्याऐवजी संतांचा छळ झाल्याचे दाखले आहेत. लोक मात्र ऋषीमुनींच्या क्रोधाला व शापवाणीला अत्यंत घाबरत होते. संतांच्याजवळ ऋषीमुनींच्या सारखेच सार्मथ्य असूनसुद्धा त्यांनी त्या सार्मथ्याचा उपयोग कुणाला त्रास देण्यासाठी कधी केला नाही. संतांच्या दारात तर रिद्धीसिद्धी हात जोडूनच उभ्या आहेत , असे तुकोबाराय लिहितात ,
या या वैष्णवांचे घरी। प्रेमसुख इच्छा करी।रिद्धीसिद्धी द्वारीं। कर जोडुनी तिष्ठती।।
' मी रिद्धीसिद्धीच्या मागेही लागलो नाही आणि वेदशास्त्रांचा अंकितही नाही , असे ते म्हणतात , कारण ते या सर्वांच्या पलीकडे गेले होते. तुकोबाराय स्वत:बद्दलच म्हणतात , ' तुका अणुरेणुया थोकडा होता पण त्याबरोबरच तो आकाशाएवढाही होता. ' मग एवढी उंची गाठलेला महामानव किरकोळ रिद्धीसिद्धीच्या मागे का लागेल ? रिद्धीसिद्धीच्या मागे लागणे म्हणजे काही ना काही चमत्कार करण्याच्या नादी लागणे हे ओघाने आलेच.
या चमत्काराच्या रहस्याच्या मागे एक महत्त्वाचा संशोधनाचा विषय असा राहील की असे चमत्कार करणाऱ्याला खरोखरच रिद्धीसिद्धी प्राप्त झाल्या आहेत की जादूगार जशी हातचलाखी करतो , तसा हा काही प्रकार आहे ? तुकोबारायांच्या अभंगातील ' टाणाटोणा ' या उपहासगर्भ शब्दातून तरी हाच भाव सूचित होत नाही काय ? आमच्या दृष्टिकोनातून तर अशा नव्व्याण्णव टक्के घटनांत रिद्धीसिद्धी असण्यापेक्षा तिथे जादूच्याच खेळाचा भाग जास्त आहे. केवळ हातचलाखी आणि नजरबंदी करणे एवढाच प्रकार जर संत म्हणून घ्यायला पुरेसा असेल तर जादूगाराला संत का म्हणू नये ? अशा थोतांडालाच अंधश्रद्धा असणारी माणसे बळी पडतात. आजकाल कोणी अंधश्रद्धा निर्मूलन करताना दिसतात. पण साधुसंतांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य शेकडो वर्षांपूवीर्पासूनच सुरू केले आहे. त्यांनी अंगारा-धुपारा यांना जागा न देता , आचार-विचाराने पवित्र आणि ज्ञानभक्तीनेयुक्त असा समाज घडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे आणि त्यात त्यांना लक्षणीय यशही प्राप्त झालेले आहे.
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती
शिवाजीराजांच्या मनात रामदासस्वामींबद्दल आस्था आहे, हे ध्यानी घेऊन निर्मळ अंत:करणाचे उदारराणा तुकोबाराय किती मोलाचा उपदेश करून जातात.
सद्गुरू श्री रामदासाने भूषण।तेथें घाली मन चळों नको।।
बहुता ठायीं वृत्ति चावळली जेव्हां।रामदास्य तेव्हां घडे कैसें।।
म्हणून तुम्ही आत्मारामी मन ठेवून राहा आणि रामदासी आपल्याला पाहा. गुरूनिष्ठेचे पावित्र्य, गुरूश्रद्धेचे बळ, गुरूसेवेची दृढता याचे महत्त्व या अभंगात्मक पत्राच्या ओघात ते सांगून जातात. त्याचप्रमाणे भक्त, देव आणि सद्गुरू यांतील तत्त्वत: असणारी एकरूपताही ते इथे उच्चारतात.
या अभंगावलीमध्ये जाता जाता ते शिष्यधर्माबरोबर राजधर्माबद्दलही काही जाणिवा व्यक्त करतात, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. राजधर्म हाही एक योगच. तेव्हा भल्याचा वीट मानू नका. ज्यामुळे तुमच्याकडे दोष येईल असे कर्म करू नका. तुमच्या लोकसंग्रहात निंदक-दुर्जनही असतील, त्यांच्यापासून सावध राहा. राज्याचे खरे रक्षक कोण, याचा नीरक्षीरविवेक करा. पत्राचा समारोप करताना ते म्हणतात,
'सांगणे न लगे सर्वज्ञ तू राजा।अनाथांच्या काजा साह्य व्हावे।।
तुमचा असा राज्यकारभार आम्हाला ऐकायला मिळाला की, सगळे समाधान पावले आणि अखेर
'राजा धन्य जन्म क्षिती।त्रैलोक्यीं हे ख्याती कीतीर् तुझी।।
असे आशीर्वचन देऊन पत्रसमाप्तीची प्रसन्न मुदा उमटवतात.
या पत्रातून दृगोचर होणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानी घेण्यासारखी आहे. समकालीन संत रामदासस्वामींच्या तुकोबारायांची दृष्टी निकोप आणि वृत्ती अत्यंत निर्मळ होती. दोघांचे संप्रदाय भिन्न, कार्यक्षेत्रे भिन्न. पण गुरूपद गाजवण्याचा लोभ किंवा उत्तमोत्तम शिष्य मिळवण्याचा किंवा फोडण्याचा मोह अथवा सांप्रदायिक विद्वेष, स्पर्धा या दोषांपासून तुकोबाराय सर्वस्वी दूर होते, या दृष्टीनेही हे पत्र बोलके ठरते.
हे अभंगरूप पत्र म्हणजे तुकोबारायांचे चालतेबोलते स्वरूप! ते पाहून तुकोबारायांच्या भेटीची शिवाजीराजांना अधिकच उत्कंठा लागून राहिली आणि न राहवून राजे तुकोबारायांना भेटायला स्वत: लोहगावी आहे. वस्त्रे-प्रावरणे, अलंकार-भूषणे, होन-मोहरा हा सरंजाम त्यांच्यासोबत होता, तसाच प्रधान आणि अन्य अधिकारी यांचा लवाजमाही त्यांच्यासमवेत होता. प्रभुनामाने आणि वारीसेवेने पवित्र झालेल्या त्या पुण्यपुरुषाच्या दर्शनाने छत्रपतींची काया पुलकित झाली. त्यांनी तुकोबारायांच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घातला, त्यांच्या गळ्यात मनोभावे तुळशीहार घातला. अबीर लावून महाराजांची पूजा केली आणि सुवर्णमोहरांचे ताट विनम्रपणे समोर ठेवले. तेव्हा तुकोबाराय म्हणाले,
कासया पाहिजे दव्यठेवा।एक विठ्ठलचि आम्हां व्हावा।।
त्याजवांचूनि आमुच्या जीवा।आणिक हेवा नसेचि।। महिपती
ते राजांना म्हणाले, 'सोने आणि माती। आम्हां समान हे चित्तीं.' तुम्ही जे धन समोर ठेवले, ते आम्हाला गोमांसासमान आहे. विठ्ठल-रखुमाईच्या रूपाने अवघ्या विश्वाची संपत्ती आमच्या दारी आहे. तुकोबारायांचे राजैश्वर्य, ज्ञानभक्ती वैराग्याचे ऐश्वर्य, त्यांच्याजवळच्या शब्दरत्नांच्या खाणी आणि पांडुरंगाने आधाराचे सतत डोक्यावर धरलेले छत्र पाहून छत्रपती नतमस्तक न होतील तर आश्चर्य! तुकाराम महाराजांच्या चरणी अर्पण केलेली ही धनसंपदा राजांनी गोरगरीबांना वाटून टाकली. जो सर्व राजैश्वर्याने मंडित झालेला राजा संतचरणांशी नतमस्तक होतो, त्या संतांच्या बोधाच्या ऐश्वर्याचे काय वर्णन करावे?
त्यानंतर तुकोबारायांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. 'रामकृष्ण हरी' नामाचा गजर होऊन, विठ्ठल नामाच्या घोषाने कीर्तनाचा पूर्वभाग संपला आणि तुकोबारायांनी विठ्ठलाचे आणि आपले नाते किती निकटचे आहे, हे मोठ्या भक्तिभावाने आणि रसाळपणाने मांडले. तुकोबारायांचे जीवनच विठ्ठलरूप झाल्यामुळे त्यांना प्रत्येक व्यक्तीत विठ्ठलच दिसत होता. ते अंतर्बाह्य विठ्ठलच झाले होते. ते म्हणतात,
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती। विठ्ठल हा चित्तीं बैसलासे।।विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया।विठ्ठल हे छाया माझी मज।।बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां।न वदे अन्य आन दुजे।।सकळ इंदियां मन एक प्रधान।तेंही करी ध्यान विठोबाचे।।तुका म्हणे या विठ्ठलासी आतां।नये विसंबता माझे मज।।
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती
जगदगुरू तुकोबारायांच्या अभंगवाणीचे पडसाद जसे जसे आजूबाजूच्या परिसरात घुमू लागले , तसे तसे ज्यांचे चित्त श्रद्धावान होते , त्यांना आनंद वाटू लागला. पण ज्यांच्या अंत:करणामध्ये उच्चनीच भावापोटी द्वेष , मत्सर भरला होता , त्यांना मात्र तुकोबारायांची अभंगवाणी म्हणजें सनातन धर्मावर आलेले संकटच वाटू लागले.
महाराजांच्या अभंगातून परमार्थातील गृह्यज्ञान आपोआपच प्रगट होत होते. संतांच्या प्रेमधर्मामध्ये समदृष्टी हा आचार-विचाराचा स्थायीभाव असल्यामुळे , परमार्थाचा अधिकार सर्वांनाच आहे , हा भाव तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीमध्ये पुन्हा पुन्हा ठासून व्यक्त केलेला आहे , ' सकळांसी येथे आहे अधिकार ' असे त्यांचे आश्वासक शब्द आहेत. पण त्या काळात संस्कृत भाषा हीच तत्त्व प्रतिपादनाची भाषा. आध्यात्मिक विषय संस्कृत भाषेतच मांडला गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. बहुजन समाजाला , जर पारमाथिर्क अधिकाराची जाणीव झाली , तर बहुजन समाज ज्ञानी होईल , उच्चवणीर्यांचे प्राधान्य कमी होईल , अशी भीतीही मनात असावी.
नामाचे , भक्तीचे महत्त्व वाढले , तर आयुष्यभर जे वेदाध्ययन केले , ते निष्प्रभ होऊन धर्मसत्ता सामान्यांच्या हातात जाईल , असे कुणाला वाटू लागले. उच्चवणीर्यांनाच अध्यात्माचा अधिकार , ही कल्पना समाजमनात बिंबवण्यात आली होती. वेदांनी ज्ञान देण्याचा अधिकार , फक्त ब्राह्माणांनाच दिला आहे , समाजाचे गुरुपद केवळ ब्राह्माणच भुषवू शकतात , या वैदिक परंपरेच्या विरुद्ध जर कोणी वागत असेल , तर तो महान अपराध होय अशीच रुढी जनमनात रुजवली गेली.
अशा दृढ अहंकाराने ग्रासलेल्या प्रवृत्तीला तुकोबारायांच्या अभंगवाणीने जबरदस्त धक्का दिला. तुकोबारायांच्या भक्ती , ज्ञान , वैराग्याने संपन्न झालेल्या वाणीकडे लोक आकृष्ट होऊन त्यांना गुरुस्थानी मानून दर्शन घेऊ लागले. त्यामध्ये उच्च वणीर्य ब्राह्माण मंडळीही होती. या सर्व बदलत्या वातावरणाची हकिकत वाघुलीकर रामेश्वरभट यांना कळली.
एक शुद आपल्या प्राकृत भाषेमधून वेदांचे गुह्य प्रगट करतो , हे धर्मबाह्य वर्तन असून आता आपल्या धर्माचे रक्षण करण्याकरता तुकोबारायांवर बंधन आणले पाहिजे अशा इराद्याने रामेश्वरभट पुढे सरसावले. त्यांना वाटले की आपण तुकोबारायांना विरोध केला , की त्यांचे महत्त्व कमी होईल. म्हणून त्यांनी थेट राजदरबारी तुकोबारायांच्या या पावित्र्याबद्दल तक्रार नोंदवली.
रामेश्वरभटांचे राजदरबारी वजन असल्याकारणाने ग्राम-अधिकाऱ्याने ताबडतोब देहूच्या पाटलाला आदेश पाठवला की , तुकाराम महाराजांना तात्काळ देहूगावातून बाहेर घालवून द्यावे. पाटलाने दाखवलेला हुकूमनाम्याचा कागद पाहून महाराजांना अतिशय दु:ख झाले. ती व्यथा त्यांनी एका अभंगातून व्यक्त केली. काय खावे आतां कोणीकडे जावें। गावांत राहावें कोण्या बळें।। कोपला पाटील गावींचे हे लोक। आतां घाली भीक कोण मज।। भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा।। तुका म्हणे यांचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठल जाऊं आतां।। एकूण प्रतिकूल परिस्थितीची जाणीव झाली आणि तुकोबारायांनी वाघुलीला जाऊन रामेश्वरभटांची भेट घेण्याचा निश्चय केला. तुकोबाराय रामेश्वर भटांकडे गेले , तेव्हा ते स्नानसंध्या करण्यात मग्न होते. त्यांना दंडवत घालून तुकोबारायांनी नामाचा गजर सुरू केला आणि पाठोपाठ त्यांच्या मुखातून श्ाीहरिने प्रगट केलेली अभंगवाणी आपोआपच स्त्रवू लागली.
ते कवित्व ऐकून रामेश्वरभटांना वाटले की , तुकोबाराय प्रत्यक्ष वेदवचनेच बोलत आहेत. रामेश्वरभट तुकोबारायांना म्हणाले , " तू शूद असून कवित्व केलेस तेव्हा संतमहंताच्या पंक्तीला जाऊन बसण्याचा घोर अपराध तुझ्या हातुन घडला आहे. त्यावर तुकोबाराय अत्यंत लीनतेने म्हणाले , ' महाराज , माझ्या योग्यतेची जाणीव जर मला करून दिलीत , तर फार बरे होईल. ' रामेश्वरभटांचा तुकोबारायांना शूद म्हणून विरोध होता , पण ज्ञानेश्वर महाराजांच्यावर त्यांची भक्ती होती. म्हणजे ज्या माऊलींच्या परंपरेचे तुकोबाराय वर्णन करीत होते , प्रचार करीत होते ते तुकोबाराय उच्चवणीर्य असते तर कदाचित रामेश्वरभटांना खपले असते. पण उचवणीर्य नसलेल्या तुकोबारायांनी अभंगाच्या माध्यमातून केलेला प्रचार मात्र त्यांना पटला नाही.
रामेश्वरभट म्हणाले , " माऊलींनी स्वत:च्या सार्मथ्याने रेड्याच्या मुखातून वेद वदवले. तुझ्याजवळ असे काही सार्मथ्य आहे का ?" तुकोबाराय म्हणाले , पंढरीनाथ व नामदेव रायांनी स्वप्नात येऊन आज्ञा केल्याप्रमाणे मी हे कवित्व केले आहे. " हे सारे ऐकूनही रामेश्वरभटांनी असा आव आणला , की तुकोबारायांच्या अभंगवाणीमुळेच महाराष्ट्रातला सनातन धर्म बुडत आहे. तो बुडत असलेला धर्म वाचवायचा असेल तर तुकोबारायांचे अभंगच बुडवावेत असा निश्चय रामेश्वरभटांनी केला व तुकोबारायांना इंदायणीच्या डोहामध्ये अभंग बुडवण्याची त्यांनी आज्ञा केली.
वह्या निघाल्या जळावरी
जगद्गुरू तुकोबारायांचा छळ करून रामेश्वरभट पुणे मुक्कामी नागनाथाच्या दर्शनाला आले. त्या वेळेला पुण्यामध्ये अनगडशहा नावाचे फकीर अनुष्ठान करीत होते. त्यांच्या बागेतल्या विहिरीतले स्वच्छ आणि निर्मळ पाणी बघून रामेश्वरभटांनी त्या पाण्यामध्ये बुडी मारून स्तोत्र म्हणण्यास सुरुवात केली.
अनगडशहाच्या कानी ते शब्द पडले आणि ते धावतच त्या ठिकाणी आले आणि म्हणाले , ' का रे , माझ्या नमाजाच्या पवित्र पाण्यामध्ये मला न विचारता बुड्या मारतोस ?' रामेश्वरभट म्हणाले , ' तुला अधिकार नसताना तू मला विचारणारा कोण ?' आणि नवल घडले. तंव सिद्ध कोपोनी शाप वदत। ऐसाचि राहे तू उदकांत।। जळा वेगळा होता किंचित। भस्मभूत होशील।। अनगड गेला आपुल्या स्थळा। द्विज निघता बाहेर जळा।। तात्काळ आंगीं झोंबल्या ज्वाळा। उडी जळांत घातली।। अनगडशहाचा शाप इतका प्रखर होता की , रामेश्वरभट बुडी मारून बाहेर येताक्षणीच त्यांच्या अंगाचा दु:सह दाह होऊ लागला. तुकोबारायांच्या चित्ताचा दाह अनगडशहाच्या शापवाणीतून प्रगट झाला. यावर काय उपाय करावा , हे रामेश्वरभटांना कळेना काही , काही सुचेना. त्यांच्याबरोबर त्यांचे दोन शिष्य होते.
ते म्हणाले , ' आपण त्या फकिराला शरण जाऊन त्याची क्षमा करावी. ' त्यावर रामेश्वरभट म्हणाले , ' मी उत्तम जातीत जन्मलेला द्विज आहे आणि हा तर हीन जातीचा यवन आहे. मी त्याला कदापि शरण जाणार नाही. ' या निश्चयाने चार घटिका ते उदकात तसेच राहिले. ते बाहेर आले , ओला पंचा त्यांच्या अंगावर घालून शिष्यांनी पाणी ओतायला सुरुवात केली ; पण शरीराची लाही-लाही अंशमात्र कमी झाली नाही.
आता रामेश्वरभटांना वाटू लागले की , या व्यथेतून आपली काही सुटका होणार नाही. आतापर्यंत आपण जे अनुष्ठान केले ते सर्व व्यर्थ गेले. काहींना वाटले , फकिराने काही जादूटोणा केला असावा ; पण जे जाणते होते ते म्हणाले की , ' तुकोबारायांच्या अभंगांच्या वह्या रामेश्वरभटांनी बुडवल्या , म्हणून अनगडशहाला पुढे करून पांडुरंगाने त्याला शिक्षा दिली आहे. ' जाणत्या लोकांनाही या घटनेचे आश्चर्य वाटू लागले. शेवटी शरीरव्यथेने जर्जर होऊन रामेश्वरभटांनी आळंदीकडे धाव घेतली आणि अजानवृक्षाला गळती बांधून त्या खाली बसून रात्रंदिवस अनुष्ठान करायला सुरुवात केली.
तुकोबारायासारख्या भगवंताच्या परमभक्ताचा द्वेष मत्सर केल्यामुळे तिकडे रामेश्वरभटांचा दाह वाढत होता आणि इकडे देहूमध्ये पंढरीनाथ यांनी एक अलौकिक लीला घडवून आणली , बालरूप घेऊन श्रीहरि तुकोबारायांच्या निकट गेले. त्यांच्या अंगावरून श्रीहरिने हात फिरवला. गालावर गाल ठेवला आणि ते महाराजांना म्हणाले , ' बा तुका! मी तुझा पाठीराखा असताना कशाची चिंता करतोस ? आजपर्यंत अंबरिषाला कसे सांभाळले , प्रल्हादाचे रक्षण कसे केले.
या चरित्रकथा तूच गायल्या आहेस ना ? अरे , तुझ्या वह्या पोटाशी धरून मी तेरा दिवस झाले , पाण्यात बसून आहे ,' असे कानामध्ये सांगून देवाने त्यांना पोटाशी धरले आणि हृदयाला हृदय एक झाले. जीवीची खूण प्रभुस्पर्शाने हृदयामध्ये प्रगट झाली. तुकोबारायला असा आधार देऊन भगवंत अंतर्धान पावले. त्या वेळी तुकोबारायांचा श्वासोच्छ्वास अत्यंत मंदपणेच चालला होता. काहींना वाटले , त्यांच्या कुडीमधून प्राणच निघत आहे ; पण अनेकांना वाटले हा मंद श्वासोच्छ्वास चालू आहे , म्हणजे प्रत्यक्ष देवच या संकटकालात तुकोबांचे रक्षण करीत आहे. तेरा दिवस लोटल्यानंतर पांडुरंगाने तुकोबारायांना जसे दर्शन दिले , तसे त्यांच्या शिष्यांनाही देवाने रात्री दृष्टांत देऊन सांगितले की , ' तुकयाचे अभंग जळामध्ये जसेच्या तसे मी रक्षण केले आहेत. आता पाण्यावर तरंगणाऱ्या त्या अभंगांच्या वह्या तुम्ही काढाव्या. ' हा दृष्टान्त होताच , निघाले हरिदास तात्काळ। लाउनि मृदंग टाळ घोळ। सवें वैष्णवांचे मेळ। पाळे सकळ तुकयाचे।। महिपती तुकोबारायांजवळ येऊन त्यांनी सांगितले की , ' पांडुरंगाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही वह्या काढण्यासाठी इथे आलो आहोत. ' ते सगळे इंदायणीच्या डोहाजवळ आले त्या वेळी तेथे डोहांतुनी सत्वरी। वह्या निघाल्या जळावरी।। उड्या घालुनी पोहणारी। काढुनी बाहेरी आणिल्या।। अणुमात्र स्पर्शलें नाहीं जळ। सांगती तुकयासी सकळ।। म्हणती स्वामी तुमचा नकळे। पार केवळ ब्रह्माादिकांसी।। जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला. तुकोबारायांचे श्रेष्ठत्व जाणून त्यांच्या चरणांवर सर्वांनी लोळण घेतली. पांडुरंगाची आपल्यावर किती कृपा आहे , तो आपले कसे रक्षण करतो आहे याची जाणीव होऊन तुकोबारायांचे अंत:करण भरून आले.
विलक्षण सामर्थ्य तुकोबाचे
शिवजी कासाराने मुंबईला कथिल खरेदीसाठी 36 बैल पाठवले. गुमास्थांनी कथिलाच्या गोण्या गावी आणल्या तर कथिलाऐवजी गोणी गोणीत रुपेच रुपे दिसले , सत्संगाचे हृदय परिवर्तन झालेल्या शिवजी कासाराने मालाचा घोटाळा झाला हे ओळखून , त्या रूप्याच्या गोण्या चोखट वृत्तीने परत पाठवल्या , तर त्या व्यापाऱ्यानेही अतिशय प्रांजळ वृत्तीने ' हे रूपे आमचे नव्हे ' म्हणून छत्तीसच्या छत्तीस बैलांना रूप्याच्या अवघ्या गोण्यासह कासाराकडे पाठविले , ते रुपेरी ओझे जसेच्या तसे त्या कासाराने तुकोबारायांकडे नेले.
सद्गुरू म्हणती ते क्षणीं। तुज्या दैवें आले घडोनी।तुज पावले चक्रपाणी। सत्कारणी लावी का।।
तुकोबारायाची आज्ञा शिरसावंध मानून त्याने गावात उत्तम विहीर बांधली आणि अन्नदान करून हजारो लोकांना तृप्त केले. त्या घटनेनंतर शिवजी कासार विरक्तच झाले व जगद्गुरुंच्या संगतीत भजन कीर्तनात ते रंगून गेले.
या कारणामुळेच शिवजी कासाराची पत्नी तुकोबारायाचा खूपच द्वेष मत्सर करू लागली. शिवजी कासाराला कळू न देता त्याच्या पत्नीने एकदा गोड गोड बोलून , पण पोटी कपट बाळगून तुकोबारायांच्या घरी बोलवून घेतले. तुकोबारायांना स्नान घालण्याचे निमित्त करून कडकडीत पाणी तुकोबारायांच्या अंगावर ओतले. त्यामुळे सर्व अंगाचा दाह होऊन तुकोबारायांना अतिशय कष्ट होऊ लागले. त्यावेळी तुकोबारायांनी पांडुरंगाचा मोठ्या आर्ततेने धावा सुरू केला.
जळे माझी काया लागला वोणवा। धाव रे केशवा मायबापा ।।पेटली सकळ कांती रोमावली । नावरे हे होळी दहन जालें।।फुटोनिया दोन्ही भाग होऊं पाहे। पाहतोसी काय हृदय माझें।।घेऊनि जीवन धावें लवलाही। कवणाचें कांही न चले येथे।।तुका म्हणे माझी तूं होसी जननी। आणीक निर्वाणी कोण राखे।।
सर्व विश्वाला शीतलता देणारा श्ाीहरी त्वरित धावून आल्यामुळे , तुकोबारायांचा आपोआपच अंतर्बाह्य गारवा वाटू लागला. या ठिकाणी विशेषत्वाने जाणवते ते हे की , आपल्या देहाच्या रोमरोमाची लाही लाही झाली , तरी तुकोबारायांची जी मूलभूत मन:शांती होती , ती अंशमात्र ढळली नाही. देहाशी संबंध असल्याकारणाने त्याची आग देहाला जाणवली. त्याची झळ हृदयापर्यंत पोहोचली ; पण त्यामुळे सात्विक भाव लोपला नाही , की कोमल वृत्ती करपली नाही की प्रेमाचा झरा आटला नाही. हृदयाच्या तळाशी आत्मशांती तर स्थिरच होती. म्हणूनच जय दुष्ट कपटी व्यक्तीमुळे त्यांना एवढी शारीरिक पीडा झाली तिच्याबद्दल मनात अंशमात्र राग-द्वेष निर्माण झाला नाही , यातूनच ' देहीच विदेही भोग दशा ' हा त्यांचा सहजोद्वार साक्षात सिद्ध होऊन गेला.
त्यांना स्वसार्मथ्याने हा दाह शांत करणे काही अशक्य नव्हते. रामेश्वरभटांच्या शरीराचा दाह जर त्यांच्या अभंगाने दूर झाला होता , तर आता स्वत:च्या देहाचा दाह शांत करण्यासाठी देवाचा धावा करण्याची काय आवश्यकता होती ? त्यंाच्या देहाला या प्रसंगी तीव्र वेदना झाल्यानंतर वेदना ज्या सत्तेतून प्रकट झाली त्या सत्ताधीश प्रेमप्रभूला त्यांनी कळवळून हाक मारली , एरव्ही जरी आई बाळाला जवळ घेत असली तरी दु:खाच्या प्रसंगी आई आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट कवटाळून धरते. खरे तर बाळाच्या दु:खापेक्षा आईलाच जास्त दु:ख होते. तुकोबारायांनाही या दु:खाच्या प्रसंगी प्रभूचे अत्यंत उत्कटतेने स्मरण झाले आणि मग निकट असणाऱ्या प्रभूचे अधिकच निकटत्वाने आलिंगन घडले , या आनंदाच्या तळ्यात तुकोबाराय डुंबत असल्यामुळे देहाचा दाह नाहीसा झाला. माणसाची मानसिक व्यथा , अशांतता ती प्रभूच्या नावाने , संत्संगतीने आणि संतकृपेनेच कमी होते. एवढे घडूनही शिवजी कासाराच्या बायकोबद्दल तुकोबारायांच्या मनात करुणाच होती.
सुखाचीच ओतली। मूतिर् यांची ठसावली।।अविच्छिन्न भगवत बुद्धी। सर्वाभूतीं निरवधी।।
असेच त्यांचे स्वरूप होते. संतनिंदा आणि अवहेलना घडल्यामुळे शिवजी कासाराच्या बायकोच्या अंगावर नखशिखान्त कुष्ठ उठून ती कासावीस झाली. बाहेर गेलेले शिवजी कासार घरी येऊन पाहतात , तर त्यांना व्यथेने व्याकुळ होऊन पडलेली आपली बायको दिसली. घरापुढील मांडवाला कीर्तन प्रसंगीचा तुकोबांच्या गळ्यातला टांगलेला हार शिवजीच्या नजरेतून निसटला नाही , त्यावरून शिवजीने ताडले की आपल्या बायकोने आपल्या माघारी तुकोबारायांना बोलवून त्यांचा छळ केला आहे. या संकटाच्या प्रसंगी रामेश्वरभट्ट म्हणाले की , " ज्या ठिकाणी तुकोबारायांनी स्नान केले , तेथील चिखल घेऊन तिच्या अंगाला लावला तर तिची व्याधी दूर होईल. " तेव्हा घडलेही तसे , रामेश्वरभटांनी सांगितले तसे केले. त्यामुळे तिची शारिरिक व्याधी तर दूर झालीच ; पण ती तुकोबारायांची एकनिष्ठ भक्तही झाली.
मंबाजी , रामेश्वरभट , शिवजी कासार आणि त्याची बायको यांच्या जीवनपटाचे हे ताणतणाव पाहिल्यानंतर ध्यानी येते की जरी तुकोबारायांच्या संदर्भात हे सारे निर्माण झाले असले तरी त्याचे पीळ , त्याच्या गाठी , तुकोबांच्या जीवनाला कधी स्पर्श करू शकल्या नाहीत. उलट तुकोबारायांनी त्यांच्या गाठी भक्तीशी घातल्या आणि भेटी विठ्ठलाच्या घडवल्या. तुकोबारायांचे समार्थ्यच लोकविलक्षण होते. ' कामक्रोध बंदीखानी। तुका म्हणे दिले दोन्ही। इंदियांचे धनी। आम्ही झालो गोसावी।। ' ही अवस्था त्याच्या मुळाशी होती.
कोणाही जीवाचा न घडो मत्सर
आपल्या चित्तामध्ये जर विकार असतील , तर तसेच ते इतरांकडून आपल्याकडे प्रक्षेपित होतात. आपल्या चित्तामध्ये जर करुणा , प्रेम जिव्हाळा असेल तर तेच आपल्याकडे इतरांच्याकडून परावतिर्त होत असतात.
तुकाराम महाराजांच्या मनात अवघ्या भूतमात्रांबद्दल नितांत प्रेम आणि करुणा असल्याकारणाने आणि सर्वांना सामावून घेणारी वृत्ती असल्याकारणाने पिसाळलेल्या कुत्र्यावर एवढा अनुकूल परिणाम झाला की , तो कुत्रा आपोआपच शांत होऊन तुकोबारायांच्या चरणाशी विसावला. त्या कुत्र्यात एवढा आमूलाग्र पालट झाला , तर तसा बदल समाजात का होऊ शकणार नाही ?
' कोणाही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सवेर्श्वर पूजनाचे ' हे तत्त्व त्यांच्या वृत्तीत बाणल्यामुळे यासारखे अनेक अनुभव त्यांना वारंवार येत राहिले. यानंतर तो कुत्रा ज्या धनगराचा होता , तो म्हणाला की , हा कुत्रा काही आता माझ्या उपयोगाचा नाही , तुम्हीच त्याला आपल्याबरोबर न्या. तो कुत्रा तुकोबारायांच्या संगतीत राहून त्यांचे कीर्तन-भजन ऐकू लागला आणि एकादशीचा उपवासही करू लागला. सत्संगाचा प्रभाव असतो तो असा! तुकोबाराय हे खऱ्या अर्थाने भावकवी होते. त्यांचे अभंग म्हणजे उत्कट भावनेचा सहज उदेक! आणि त्यांचा भाव अखंड पांडुरंगाच्या ठिकाणी जडलेला! या प्रेमभक्तीतून तुकोबारायांनी कृष्णाच्या बालक्रीडा सहजरम्यतेने गायल्या. गाता गाता ' श्ाीकृष्णाचे मुख मलिन। कडिये घेतला यशोदेने ' अशी बाळकृष्णाची माती खाण्याची बाललीला त्यांनी सांगितली. तुकोबारायांच्या नित्य सान्निध्यात असणाऱ्या रामेश्वरभटांनी हा अभंग वाचला , आणि त्यांना त्यातील ' मलीन ' हा शब्द खटकला.
' मुख म्लान जगजेठी। गीवार्ण गोष्टी मोडिली ' असे या वेदशास्त्र संपन्न पंडिताला वाटले. मराठमोळ्या अपदिक तुकोबारायांनी ' म्लान ' या शुद्ध शब्दाऐवजी ' मलीन ' हा अशुद्ध शब्द योजून संस्कृत भाषेच्या शुद्धतेला तर धक्का लावलाच ; पण त्यामुळे अर्थहानीही झाली , असे त्यांना वाटले. म्हणून रामेश्वरभटांनी आपल्या हाताने ' मलिन ' या शब्दाचे ' म्लान ' करून चुकीची दुरुस्ती केली. खरे तर ' आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें ' हा तुकोबारायांचा सार्थ आत्मविश्वास होता आणि ते तर भावार्थाचेही स्वामी होते. त्यांच्या शब्दांच्या मागून अर्थ धावत यावा , असे त्यांचे कवित्व होते. त्यांच्या काव्यातून , त्यांच्या हृदयातून उचंबळलेला विठ्ठलभक्तीचा जिवंत झरा वाहत होता. म्हणून तर खुद्द रामेश्वरभटांनी बुडवायला लावलेल्या अभंगांच्या वह्या स्वत: पांडुरंगाने तारलेल्या होत्या , हे रामेश्वरभटांना माहीत नव्हते काय ? किंबहुना त्यामुळेच तर रामेश्वरभट तुकोबारायांचे एकनिष्ठ अनुयायी बनले होते. रामेश्वरभटांच्या मनात तुकोबारायांच्या सत्संगामुळे हळूहळू भक्तीचा रंग स्थिरावू लागलेला होता ; पण अजूनही शब्द चिकित्सकतेच्या , शब्दपांडित्याच्या खुणा पुसल्या नव्हत्या. म्हणून ' मलिन ' या शब्दातील भाव त्यांच्या दृष्टिआड झाला. या सर्व खाडाखोडीची तुकोबारायांना काही खंत वाटली असती , तर ते स्वाभाविक झाले असते ; पण याबद्दल पंढरीनाथाला मात्र निश्चितच खेद वाटला. म्हणून ते रामेश्वरभटांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले , ' तुवां तुकयाचें वचन मोडूनि निश्चित। आपुलें मत स्थापिले। ' तुकोबारायाचे वचन मोडले की एक चूक आणि तिथे आपले मत लादले ही दुसरी चूक , असेच पंढरीनाथांनी त्यांना खडसावून सांगितले.
त्यातही जे मत त्यांनी सांगितले ते पांडुरंगाच्या मूळ चिदानंद स्वरूपाला बाधा आणणारे. म्हणून पंढरीनाथ म्हणतात , ' म्लानमुख व्हावयासी तत्त्वतां। आम्हा कायसी होती चिंता। ' आणि आपले बालपण आठवून ते मिष्किलपणे म्हणतात , ' अरे! बाळपणी माती खादली असता। यास्तव मलिनता सहजचि। ' तुकोबारायांनी त्या अवतारात आम्हाला जसे पाहिले तसेच ते बोलले , अशी या स्वप्नाची सांगता झाली. स्वप्नातून जागे होताच रामेश्वरभटांना ' मलिन ' शब्दाबरोबरच स्वत:चीही जागा कळली. त्याच दिवशी पहाटेच रामेश्वरभट तुकोबारायांच्या घरी आले. भल्या पहाटे रामेश्वरभटांना बघून तुकोबारायांना आश्चर्य वाटले. रामेश्वरभटांनी त्यांची क्षमा मागितली. तुकोबाराया संभ्रमित होऊन म्हणाले , " आम्ही तुम्हाला मागेच क्षमा केली , आता पुन्हा क्षमा कसली ?" तेव्हा अपराधी मनाने ' मलिन ' शब्द दुरुस्त त्यांनी ' म्लान ' शब्द कसा लिहिला आणि त्या चुकीसाठी पांडुरंगाने त्यांना स्वप्नात येऊन कसे खडसावले हा वृत्तान्त कथन केला.
' तुकोबारायांचे वचन खोडणारा तू कोण ?' असे विचारून पांडुरंगाने माझी चूक मला दाखवली , म्हणून मी तुमची क्षमा मागत असल्याचे रामेश्वर म्हणाले. आपल्या मुखातील शब्द पांडुरंग किती जतन करतो , आपल्यामुळे पांडुरंगाला किती त्रास होतो या जाणिवेने तुकोबारायांचा कंठ सद्गदित झाला आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमाश्राू वाहू लागले.
सांभाळिले कृपाळें
लोहगावच्या भेटीनंतर तुकाराम महाराजांची पंढरीची आळंदीची वारी होती. पण शिवाजी महाराजांनी मात्र तुकोबारायांच्या भेटीची वारी अधूनमधून चालू ठेवली. संत संगतीमध्ये सांसारिक दु:ख वारतात , म्हणून तुकोबारायांकडच्या वारीची त्यांची प्रीत वाढू लागली. जेव्हा संधी मिळेल तेव्हा , राज्यकारभाराच्या जबाबदारीतून सवड काढून , प्रापंचिक आणि राजकीय ताणतणावातून शिणलेल्या मनाला विसावा म्हणून ते तुकोबारायांकडे मोठ्या आस्थेने , ओढीने जात आणि आवर्जून कीर्तन ऐकायला बसत. एकदा पुण्यामध्ये तुकोबारायांचे कीर्तन असल्याचे शिवाजी महाराजांना कळले आणि ते त्या कीर्तनासाठी पुण्याला आले , ही वार्ता चाकणमधील यवनांना कळली आणि त्यांनी टाकोटाक दोन हजार सैन्य घेऊन पुण्याकडे मोर्चा वळवला. जिथे कीर्तन चालले होते. त्या मंदिरालाच या पठाणांनी अभेद्य वेढा घातला. इथे कीर्तनाला रंग चढला होता , पण बाहेर परचक्राने थैमान घातले होते. राजांना हे कळले आणि त्यांनी कीर्तनातून बाहेर जाण्याची अनुज्ञा मागितली.
तुकाराम महाराजांना हे ऐकून धक्काच बसला. पण बाहेर जाण्याचे कारण कळले आणि तुकोबारायांनी विश्वाचा चालक , कनवाळू-कृपाळू जो पांडुरंग त्याची धीरग्ंाभीरपणे प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ते प्रभूला म्हणाले , " आम्ही तुझ्या नामाची कीतीर् सांगावी. तुझ्या नामाने मोठी मोठी संकटेही टळतात म्हणून सांगावे आणि असे घडावे ? ज्या ठिकाणी तुझी सत्ता आहे , तिथे इतरांची सत्ता चालावी , हे तुला आणि आम्हालाही लांच्छन नाही काय ? ज्या ठिकाणी प्रभूचे कीर्तन चालू आहे , तिथे तुझेच अस्तित्व आहे , अशा कीर्तनात तुझ्याच साक्षीने जर अशी दुर्घटना घडली तर काय म्हणावे ?
राजाचाच जर घात झाला , तर कोणत्या तोंडाने ' मागे पुढे उभा सांभाळिसी ' असे म्हणावे ? कोणत्या तोंडाने नामाचा गजर करावा ? कोणत्या वाणीने तुझे गुणवर्णन कराव ? े देव भक्तांचे रक्षण करतो , असे सांगायला आम्हाला तोंड कुठे आहे ? जर राजाचाच घात झाला , तर आम्ही कीर्तन तरी कसे करावे ? आमच्या श्ाोत्यांनी तरी निश्चित कसे बसावे ? तेव्हा प्रभो , आमची लाज राख. राजाच्या केसालाही धक्का लागणार नाही , असे काही कर. " तेव्हा प्रभू म्हणाले , " तुकया , काही काळजी करू नकोस. सगळे निविर्घ्न पार पडेल. तू कीर्तन चालू ठेव. भजन-नामघोष चालू ठेव. " याचवेळी पठाणंनी आणखी भक्कम वेढा घातला. ते म्हणू लागले , " या समुदायात जर तो शिवबा आम्हाला ओळखता आला नाही , तर आम्ही सर्वांनाच कापून काढू. " दुष्टबुद्धी यवनांनी जेव्हा अशी धमकी दिली , तेव्हा पांडुरंगाने लीलालाघव केले.
' आपण होऊन शिवाजी-सत्वर गती पळतसे ' यवनांच्या सेनेतले हेर म्हणाले , ' हाच शिवाजी , पकडा रे पकडा त्याला ?' असे म्हणून ते मायालाघवी जगजेठीच्या मागे लागले. क्षणभर इथे दृष्टीला पडावे , तर पुन्हा दुसरीकडे दृष्टीला पडावे , पळता पळता सापडला असे वाटावे , तो आणखी दूर दूर जावे-असा लपंडाव झाला , एका प्रहरात त्याने सैन्याला कित्येक कोस दूर दूर नेले. " आम्हां सहस्त्रापुढें काय हे बापुडे पळें कोणीकडे नेणोंची हे । " महिपती , इकडे तुकोबारायांचा धावा आणि कीर्तन चालूच होते. रात्रीचा अंधार सरला आणि उष:कालची सोनेरी प्रभा उजळली. कारण परचक्र वादळासारखे अचानक आले आणि दूरदूर निघून गेलेही. तुकोबारायांनी सप्रेमरसाने , सद्गदित कंठाने आणि साश्ाू नयनांनी पांडुरंगाची करुणा भाकली , त्याची फलश्ाुती सर्वांनाच इतकी कल्याणकारक आणि आनंददायक झाली. परचक्र गेलें आपुले मती । म्हणोनि विस्मित झाला भूपती म्हणे मरण चुकविलें आजिचें रात्रीं। बैसतां संगती संतांचे।। महिपती संतसंगतीत बसल्यामुळे आपला मृत्यू चुकला या अनुभवाने संतांचे ठायी , कीर्तनभक्तीचे ठायी शिवाजी महाराजांची श्ाद्धा अधिकच दृढ झाली. शिवाजी महाराज तेथून निघाले ते सिंहगडी जाण्यासाठी! पण सिंहावलोकन करताना मात्र छत्रपतींच्या दृष्टीपुढे कीर्तनरंगात रंगलेली वैष्णववीराची , तुकाराम महाराजांची मूर्ती स्थिरावलेली होती. संततेज पाठीशी वागवीत हे क्षात्रतेज अधिक देदिप्यमान व्हायला निघालेले होते.
अद्वैतीं तो माझें नाहीं समाधान
तुकाराम महाराजांचा नावलौकिक ' वाऱ्याहातीं माप। चाले सज्जनाचे ' या स्वरूपात जिकडे तिकडे झाला. भोळ्या भाविक समाजाची महाराजांवर श्रद्धा जडली होती. त्याप्रमाणे जाणता ब्राह्माणवर्गही आपण जो परमार्थ करतो , तो योग्य आहे किंवा नाही , ते त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याकडून पारखून घेऊ लागले. असाच एक आध्यात्मिक विषयाचे अध्ययन करणारा ब्राह्माण होता.
त्याने ' विवेकसिंधु ' हा आध्यात्मिक ग्रंथ स्वत:च्या हस्ताक्षरांत संपूर्ण लिहून काढला होता आणि मोठ्या आवडीने तो त्या ग्रंथाचे पारायण करीत असे. तुकोबारायांची कीतीर् त्याच्या कानी पडली खरी , पण तो मनोमन धि:कार करू लागला. ' हृदयस्थ देव असोनी। रानोरानी कां जावें ' या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याला मिळत नव्हते. तेव्हा त्याच्या मनाने घेतले की , तुकोबारायांना ' विवेकसिंधु ' ग्रंथ ऐकवावा. म्हणजे ' समजेल अंतर तुकयाचे '. या हेतूने तो देहू गावी आला. तुकोबारायांना भेटून म्हणाला , ' श्रीमुकुंदराज विरचित विवेकसिंधु अध्यात्मग्रंथ। मी पारायण करितों येथ। करा श्रवणार्थ निजप्रीती '. तुकोबारायांची मनोवृत्ती कुणालाही न दुखवणारी. मग ती नळा अडकवणारी म्हातारी असो की , काठ्या मारणारा मंबाजी असो , वह्या बुडवायला लावणारा रामेश्वरभट असो किंवा मनात प्रेम असून सतत विरोधात चालणारी आवली असो. महाराज कुणालाही न दुखवता आपल्या चालीनेच चालत होते. आता ग्रंथश्रवण म्हणजे आपल्या नामस्मरण व्यत्यय हे जाणूनसुद्धा त्यांनी ' विवेकसिंधु ' चे पारायण ऐकण्यास संमती दिली आणि आपले सर्वांग गोधडीने झाकून घेतले. ते ब्राह्माणाला म्हणाले , ' हे चराचर पाहताना उगीचच मन फाकायला नको म्हणून डोळे झाकून घेण्यासाठी गोधडी पांघरली आहे. तुम्ही पारायण सुरू करा '. ब्राह्माणाने पारायणाला सुरुवात केली. अधूनमधून त्याने अर्थ विवरणसुद्धा सुरू केले. तुकोबारायांसारखा श्रोता मिळाल्यामुळे त्या अतिउत्साही ब्राह्माणाला अर्थ विवरण करताना भलताच जोर आला. पण तुकोबाराय हालेना , तुकोबाराय बोलेना , त्या ब्राह्माणाला काही उमजेना. आपण एवढे जीव तोडून कंठरवाने एक प्रहरभर पारायण अर्थ विवरण करीत आहोत आणि तुकोबारायांकडून साधी हालचालींचीसुद्धा प्रतिक्रिया नाही ? त्या ब्राह्माणाची सहनशीलता संपली आणि ब्राह्माणाने तुकोबारायांच्या डोक्यावरची गोधडी हळूच काढली , तर जे दिसेल ते विपरीतच. तुकोबारायांनी ' दोनीं बोटें घातलीं कानीं ' आणि ते ' नामस्मरणीं डुल्लत ' होते. आपण मांड मांडला काय आणि घडले काय , म्हणून ब्राह्माणाचा विरस झाला. एवढे दूर चालून येण्याची पायपीट केली , एक प्रहरभर वाचन विवरणाचा कंठशोष केला. हे सारे श्रम व्यर्थ गेले. म्हणून न राहवून तो म्हणाला , असे वाटले होते की , तुमच्या संगतीत पारायण केले की , ' अर्थ अन्वय कळेल काही '. पण तुम्हाला तर साधी श्रवणाचीसुद्धा इच्छा नाही. म्हणून तुम्ही ' कान बुजोनि झाला विदेही '. याला तुकोबारायांनी उत्तर दिले ते उत्स्फूर्त अभंगातूनच. याजसाठी वनांतर। जातो सांडोनिया घरा।। माझें दिठावेल प्रेम। बुद्धि होईल निष्काम।। अद्वैताची वाणी। नाहीं ऐकत मी कानीं।। तुका म्हणे अहंब्रह्मा। आड येऊ नेदी भ्रम।। वारकरी संप्रदायाच्या आचारविचाराचा गाभाच तुकोबारायांनी या अभंगात व्यक्त केला. वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानची बैठक ही प्रेमभक्तीवर , सगुण भक्तीवर अधिष्ठित झालेली आहे. वेदान्तशास्त्राने ज्याला ज्ञान मानले , त्याला संतांनी भ्रम ठरवला. चार वेदांची चार महावाक्ये आहेत. ' अयं आत्मा ब्रह्मा प्रज्ञानाम् ब्रह्मा ', ' तत्त्वमसि ', ' अहं ब्रह्माास्मि '. त्यातले ' अहं ब्रह्माास्मि ' याला इथे तुकाराम महाराज भ्रम ठरवतात. ' मीच ब्रह्मा ' म्हटल्यावर मिळवायचे काय शिल्लक राहिले ? अद्वैत म्हटल्यावर प्रेम करायला भक्त कुठे राहिला आणि ज्याच्यावर प्रेम करायचे तो देव तरी कुठे उरला ? आपल्या प्रेमभक्तीला अशी दृष्ट लागणे नको , असे त्यांना वाटते. दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात , अद्वैती तो माझें नाही समाधान। गोड हे चरणसेवा तुझी।। नको ब्रह्माज्ञान आत्मस्थितीभाव। मी भक्त तूं देव ऐसें करी।। आत्मस्थिती मज नको हा विचार। देई निरंतर चरणसेवा।। वारकरी संतांनी सगुणोपासना , देवाच्या सगुण स्वरूपाचे- नामाचे स्मरण आणि त्यातून अनुभवायला मिळणारे प्रेमसुख याचा आनंद स्वत: लुटला आणि ही आनंदाची वाट इतरांसाठीही सोपी करून ठेवली. तुकाराम महाराजांनी समजून सांगितले की , " बाबा! ब्रह्माज्ञानाच्या कोरड्या गोष्टी चालत नाहीत. घटापटादी नुसत्या पढिक चर्चा करून वृथा शीणच होतो. अनुभूतीश्विाय हे सारे व्यर्थच होय. " तथाकथित विद्वान मंडळी ब्रह्माज्ञानाची चर्चा करतात. सर्व ब्रह्मारूप असा सिद्धान्त मांडतात , पण त्यांच्या चित्तातला अहंकार गेला नाही आणि भ्रमच निर्माण झाला , तर त्या पांडित्याचा काय उपयोग ? निगुण भक्तीच्या अवघड वाटेकडे न जाता सगुण भक्तीवरच आपली निष्ठा केन्दित करावी , असा प्रेमबोध तुकोबारायांनी त्या ब्राह्माणाला केला. ती गोड वाणी ऐकून ब्राह्माणही प्रेमभक्तीच्या वाटेने चालू लागला.
संगती पंगती देवासवे घडे
तुकोबारायांची कीर्ती ऐकून अनेक लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. प्रत्यक्ष पांडुरंगही त्यांच्या पंक्तीस जेवायला बसत असत. तुकोबारायांचा नावलौकिक चिंचवडच्या देवापर्यंत जाऊन पोहचला. त्यांनी ठरवले की , तुकोबारायांना आपल्याकडे बोलवून घ्यावे व काही प्रचिती येते का ते पाहावे. चिंतामणी देवांनी त्या वेळी तुकोबारायांना चिंचवडला भेट घेण्याकरता बोलावले.
त्यांचे मनोगत जाणून तुकोबाराय स्वत: होऊनच त्यांन भेटायला निघाले. अर्ध्या रस्त्यातच चिंतामणी देवांचा दूत त्यांना भेटला. चिंचवडला येऊन त्यांनी गजाननाला वंदन केले. त्या वेळी चिंतामणी देव पूजा-अर्चा करावयास बसले होते. चिंतामणी देवांनी मानसपूजा सुरू केली ; पण त्यांचे चंचल मन त्यांना आवरेना. त्या वेळी जो प्रसंग घडला तो असा- चिंतामणी देव मानसपूजेला बसले असताना त्यांना बाग-बगीचाची आठवण झाली. ' वृक्षवेलींची फार आबाळ झाली आहे. केरकचरा पडला आहे.
तेहा आता माळ्याला बोलावून दम दिला पाहिजे ', असे त्यांच्या मनात आले ; पण पुन्हा त्यांनी गजवदनाचे स्मरण करत मानसपूजेला सुरुवात केली. पूजा आटपून ते बाहेर आले. तुकोबारायांनी त्यांना पाहून साष्टांग दंडवत घातले , देवांच्या मनात असा विचार आला की , ' तुकोबाराया तर शूद आहेत. आपण त्यांना का नमस्कार करावा ?' मग ते एवढेच म्हणाले , ' आपण केव्हा आलात ' त्या वेळी तुकोबाराय त्यांना म्हणाले , ' तुम्ही मानसपूजा करत असताना पुष्पवाटिकेत गेला त्याच वेळी मी आलो. ' ऐकोनि तयाची वचनोक्ती। देवासी आश्चर्य वाटलें चित्ती।। म्हणे परचित्त परीक्षक निश्चित। हे सत्यची बोलती जनवार्ता।। भगवान यांच्याबरोबर जेवतात , ब्राह्माणही त्यांना वंदन करतात , असे ऐकून आहोत , तेव्हा याची प्रचिती खरी आली तर ठीक नाहीतर शिक्षा करू , असे देवांच्या मनात आले. भोजनाचे वेळी तुकाराम महाराजांचे पान ब्राह्माणांच्या पानापासून चार हात दूरच वाढले. तुकोबाराय म्हणाले , ' आणखी दोन पाने वाढा. ' त्या वेळी देवांनी ' हो ' म्हटले व ज्यांच्याकरता पात्रे वाढली त्यांना जेवायला पाचारण करण्यास सांगितले. तुकोबाराय म्हणाले , ' एक पात्र पांडुरंगाला व दुसरे पात्र गजाननाला , तरी तुम्ही त्यांना जेवायला पाचारण करा. ' हे ऐकताच चिंतामणी देवांनी डोळे झाकले व गायत्री मंत्र म्हणून गजाननाला आवाहन केले. त्या वेळी तुकोबाराय त्यांना म्हणाले , ' गजाननाचा एक भक्त समुदात बुडत आहे. त्याला काढायला ते तिकडे धावत गेले आहेत. तेव्हा आपण नैवेद्य कुणाला दाखवत आहात ? माझ्या बोलण्याबद्दल संशय असेल तर प्रचिती पाहावी. ' अर्धघटिका लोटता जाण। तो तात्काळ आले गजवदन।। पीतांबर पिळूनि पाहता जाण। तो क्षारजीवन लागतसे।। तुकोबाराय म्हणाले , ' आता गजाननाला जेवायला बोलावा. ' तेव्हा देव म्हणाले , ' प्रत्यक्ष मूर्ती कशी जेवेल ? नैवेद्य दाखवला की , त्यांना सुवास लाभतो. ' तेव्हा तुकोबाराय म्हणाले , ' येथे प्रत्यक्ष गणपती जेवले तरच चित्ताला समाधान होईल नाहीतर उपासना व्यर्थ होय. ' चिंतामणि देवा गणपतीसी आणा। करवावें भोजना दुजे पात्री।। देव म्हणती तुक्या एवढी कैची थोरी। अभिमानाभीतरी नागवलो।। वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न। तटस्थ ब्राह्माण बैसलेती।। त्या वेळी देव म्हणाले , ' तुकोबाराय तुम्ही स्वत:ला वैष्णववीर म्हणवता , तुम्ही पांडुरंगाला स्वाधीन केला असे म्हणतात , तेव्हा आता तुम्हीच त्याला जेवायला आणा. तो जर आला नाही तर आम्ही अन्न ग्रहण करणार नाही. ' देवांचा हा निग्रह पाहिला आणि तुकोबाराय गजाननाला प्रार्थना करू लागले , तू जया पाहसी कृपादृष्टी। विघ्ने पळती बारा वाटीं।। भक्तांसी रक्षिसी महासंकटी। भवबंध फांसाटी तोडूनियां।। ' देवा , चिंतामणीसाठी तुम्ही वांझ गाई दोहविल्या , मी तसे तर काही मागत नाही ना ? अन्न आयते वाढले आहे , तेवढे जेवा. ' त्याबरोबर गजानन भोजनाला आले. पाठोपाठ पांडुरंगही प्रार्थना ऐकून भोजनास आले व भोजन होताच तृप्त होऊन अंतर्धान पावले. तुव्हा तुकोबारायांची ही भक्ती पाहून देवांनी त्यांना प्रीतीने आलिंगन दिले आणि दंडवत घातले. ' विष्णूभक्त म्हणो नये हीनयाती ' हेच खरे. देव म्हणाले , ' तुम्ही हरि-कीर्तन करून पुढे काया ब्रह्मारूप कराल याचीही खात्री पटली. आज तुमच्यामुळे मला गजाननाचे दर्शन घडले. ' तेव्हा तुकोबाराय म्हणाले , ' आमचा पंढरीनाथ भृगूची लाथही हृदयी वागवणारा आहे , तिथे माझे काय आहे ? हा असलाच तर तुमच्या कृपेचा महिमा आहे. '
Comments
Post a Comment