Posts

संत तुकाराम

संत तुकाराम तुका तोचि हा परब्रह्मा ठेवा तुका भासला मानवी वेषधारी।परि हा लिला विग्रहीनिविर्कारी।।स्वयें श्रीहरी व्यापकु सर्व जीवा।तुका तोचि हा परब्रह्मा ठेवा।। संतश्रेष्ठांचे सांसारिक व आध्यात्मिक जीवन सामान्य माणसाला मार्गदर्शक व सन्मार्गाकडे घेऊन जाणाऱ्या दीपस्तंभासारखे असते. ज्यांचे जीवन सर्वांगीण अनुभवांनी समृद्ध होते, अशा जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या चरित्राचा अल्पसा मागोवा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपा प्रसादाने आपण करू या. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज भागवत संप्रदायाच्या मंदिराचा कळस झाले, त्या कळसाच्या उंचीपर्यंत जाणे आम्हाला अनेक जन्म घेतले, तरी अशक्य आहे. तरीपण या जन्मी त्या तेजोमय कळसाचे दुरून जरी दर्शन घेता आले, तरी 'घेतलिया जन्माचे सार्थक झाले' असे आपण मानू. ज्ञानेश्वरीमध्ये भगवान म्हणतात, तेणेंसी आम्हां मैत्र। एथ कायसें विचित्र।परि तयाचें चरित्र। ऐकती जे ।। 12/226तेही प्राणा परौते। आवडती हें निरुते।जे भक्त चरित्रातें। प्रशंसिती।। 12/227पै प्रेमळाची वार्ता। जे अनुवादती पांडुसुता।ते मानूं परमदेवता। आपुली आम्ही।। 12/228 असे भक्त आमचे परममित्र ...